पाचवा आठवडा

अले तुम्हाला कल्पना आहे का तुमची गोडुली केवढी झालीय ? तीळाएवढी !!!  3 ते 4 mm एवढी , लय झपाझप मोठी होतेय !! गोदुलीचे शरीर (शरीर म्हणावे का ?) तीन प्राथमिक भागात विभागलेय इक्टो डर्म (त्वचा व मज्ज्यासंस्था ज्यापासून निर्माण् होतात असा वाढण्यार्‍या गर्भाचा बाहेरचा थर)  मेसोदर्म हृदय आणि रक्ताभिसरण संस्था हाडं स्नायु    इंडोदर्म लिव्हर आतडे फुफ्फुसे उत्सर्जन संस्था थायरॉईड या तीन प्राथमिक पेशींपासून बाळाचे शरीर तयार होईल .
तुमचा मात्र परीक्षेचा कालावधी सुरू झालाय बरं का
तुमचे स्तन दुखत असतील , मळमळ तर नित्याचीच झालेली असेल ,सतत लघवी लागणं, थकल्या सारखं वाटणं हे सगळं नॉर्मल आहे .  बाहेरच्यांना अर्थात तुमच्या सासूला नवऱ्याला नानंदेला कल्पनाही नसेल तुम्ही एवढ्या का वैतागल्या आहात आतमध्ये केवढी उलथापालथ चालू आहे . कारण त्यांना एवढ्यात बाहेर तुमच्यात कुठलाही बदल दिसणार नाही .
व्यायाम हा प्रेग्नन्सी मध्ये हवाच , कारण यामुळे तुम्हाला जे वजन तुमचे आत्ता वाढणार आहे त्याला सांभाळण्यास मदत होईल , पण तुमच्यासाठी योग्य व्यायाम कुठला हे तज्ज्ञांना विचारल्याशिवाय स्वतःच ठरवू नका , हे दिवस खूप नाजूक असतात . कुठलाही निर्णय तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नाका . 

No comments:

Post a Comment