प्रेग्नन्सी (गरोदरपणातील ) मधील सेफ आणि अनसेफ औषधे .
आपण काही औषधे सवयीने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतले जातात उदारणार्थ डोकेदुखी वगैरे साठी कोम्बिफ्लेम सर्रास घेतली जाते . पण जेव्हा हे नक्की होतं की तुम्ही गर्भवती आहात तेव्हा मात्र हीच औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे धोकादायक ठरू शकते .
या लेखात आपण कुठली औषधे सेफ आहेत आणि कुठली अगदी निषिद्ध आहेत हे बघूया
कमी धोकादायक औषधे
खोकल्यासाठी वापरले जाणारे बेनीड्रिल (अँटीहिस्टामाइन)
सिट्रिझिन
ऑट्रिव्हिन ( सर्दीसाठी नाकात टाकला जाणारा स्प्रे )
पॅरासिटोमोल
आयमोडीम जुलाबासाठी वापरले जाते पण डिलिव्हरी नंतर मात्र अजिबात घेऊ नये .
ऍसिडिटी साठी वापरली जाणारी जेलुसील /गॅव्हिस्कॉन
zantac
duphalac (लॅकटोज )
वरील औषधे जरी कमी धोकादायक असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात घेऊ नये . पहिल्या तिमाहीत जास्त काळजी घ्यावी
जास्त धोकादायक औषधे .
आयब्रुफेन
कोम्बिफ्लेम (यात असलेले आयब्रुफेन गर्भातील बाळाच्या मेंदूवर परिणाम करते म्हणून अजिबातच नाही )
सल्फा ड्रग्स
एड्स साठी घेतली जाणारी औषधे
प्रॉलिक्सिन वगैरे सारखी स्किझोफ्रेनियात वापरली जाणारी औषधे
ऍस्पिरिन (पण डॉक्टर ने सांगितले असल्यास घ्या )
अल्बुट्रोल
यातील अनेक औषधे प्रिस्क्रिप्शन शिवाय जनरली घेतली जातात पण प्रेग्नन्सी मध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात घेऊ नये .
फॉलिक ऍसिड , कॅल्सीमॅक्स , दुफास्टन वगैरे डॉक्टरांकडून दिली जातात लॅकटोज घ्यायला सांगितले जाते . ते लिहून दिलेल्या मात्रेत न चुकता घ्यावे .
आमच्या वेळेस नव्हते असे काही औषधे या बिनडोक सल्ल्याकडे साफ दुर्लक्ष करावे .
हे सुद्धा वाचनीय आहे :