खरंच गर्भसंस्कार होतात का?

मला विचाराल तर मी सांगेन गर्भसंस्कार असे काही अभिमन्यूसारखे होत नाहीत . फक्त गर्भावस्थेत तुम्ही आनंदी राहावं उत्साही राहावं आणि तुम्हाला रिल्याक्स वाटावं म्हणून तुम्ही संगीत वगैरे ऐकू शकता  त्यातही देवाधर्माचेच ऐकले पाहिजे असं काही नाही तुमच्या आवडीचे कुठलेही संगीत जे मनाला शांती देईल ते ऐकावे . गर्भसंस्काराचे सीडी वगैरे फक्त मार्केटिंग बागुलबुवा आहे / काहींना अथर्वशीर्ष ऐकल्याने प्रसन्न वाटते काहींना संदीप खरे किंवा स्वप्नील कुणाला अजय अतुल यांचं तसेच काहींना लता रेहमान आशा यांचं गाणं संगीत ऐकल्याने प्रसन्न वाटतं तेव्हा तेच ऐकावे उगाचच मन मारून रटाळ संगीत ऐकत बसू नये आणि नवरेबुवा तुम्ही आता बाबा होणार आहात तर सक्ती करणं वगैरे टाळा . करू द्या तिला मनाजोगं .मग कुणी म्हणेल अगदी रॉक वगैरे ऐकलं तर चालतं  का ? मन प्रसन्न करायचं असेल तर उन्मादी गाण्यांपासून दूर राहिलेलं कधीही चांगलं , विनाकारण शरीरातील हालचालींचा आणि पर्यायाने रक्ताभिसरणाचा वेग वाढण्याची शक्यता असते .
बाळाची प्रत्येक हालचाल अनुभव त्याचं पण वेगळं संगीत आणि एक वेगळा ह्रिदम असतो , त्याच्याशी एकरूप व्हा .
आपण प्रसन्न चित्त राहून आणि सकारात्मक विचार केला तर गर्भसंस्कार आपोआप होतात त्याला वेगळे असे काही करावे लागत नाही . गर्भावस्थेत चिडचिड होणं स्वाभाविक आहे आणि त्याचा बाळाच्या स्वभावाशी काही संबंध नसतो  कुठल्या पुस्तकात वाचून कॉम्प्लेक्स मनात ठेवू नका .
उत्तम आणि सकस अन्न घ्या .  डॉक्टरवर विश्वास ठेवा . आणि त्यासाठी योग्य त्या डॉक्टरकडे जा . (फसवणारेही असतात नाहीच असं नाही ) , त्यांनी सांगितलेला गोळ्या औषधांचा कोर्स पूर्ण करा .