दुसरा आठवडा

आज तुमच्या मासिक पाळीचा शेवटचा दिवस आहे . त्यामुळे खरं   सांगायचं तर अजूनही तुम्ही प्रेग्नन्ट नाही आहात पण या आठवड्यात किंवा मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून साधारण १६-१७ दिवसापर्यंत स्त्रीबीज अंडाशयातून बाहेर येतं . काही गर्भसंस्कार पुस्तके सांगतात की  २१ २२ व्या दिवशी आलेले स्त्रीबीज चांगले नसते , पण डॉक्टर चा सल्ला खूप महत्वाचा ठरतो , शक्यतो काही होत नाही .
मागच्या आठवड्यात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ची पातळी शरीरात वाढली असल्याने गर्भाशयाभोवती पेशींची बारीक लायनिंग तयार होण्यास सुरुवात झालेली असेल
एकदा अंडाशयातून स्त्रीबीज रिलीज झालं की २४ तासांत ते फलित होईल , त्यासाठी  लाखो स्पर्म्स मधून एकाचे मिलन होणे आवश्यक आहे
साधारण त्या अगोदर २-३ दिवस किंवा रिलीज झाल्यानंतर २४ तासाच्या आत संबंध राहिले तर गर्भधारणा होऊ शकते.
या दिवसांत शक्य तितके आनंदी राहा एकमेकांना वेळ द्या , डेस्टिनेशन ठरवून निवांतपणा मिळवला तर उत्तमच !!  स्त्रीबीज रिलीज होण्याआधी संबंध होणे आवश्यक आहे नाहीतर cycleफेल जाते , PCOD/PCOS प्रॉब्लेम असेल आणि हार्मोन्स रेग्युलेट करण्याची इंजेक्शन घेत असाल तर स्त्रीबीज रिलीज होण्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे , सोनोग्राफी च्या माध्यमातून लक्ष ठेवून राहता येतं

सेक्स संभोग की प्रणय हा विशेष लेख वाचू शकता


सौजन्य विकीपेडिया 

No comments:

Post a Comment