सातवा आठवडा

अर्रे पिंट्या आता गावरान बोरा एव्हढा झालाय !!! बाळाचे हात जे तुला कवेत घेण्यासाठी लवकरच पसरत आणि पाय जे खंबीरपणे उभे राहतील ते तयार होण्यास सुरुवात झालीय . हम्म अगदी तुमच्यासारखेच बोटं आहेत हो बाळाचे , पायाची बोटे तर मामांजी वर गेलेय इतके नाही झालेय हो डेव्हलप...  जसं बी पासून झाड अंकुरत मोठं होतं तसंच हळू हळू तुझं बाळ मोठं होतंय !! तुला माहिती आहे का तुझ्या बाळाला शेपूट आहे म्हणून ??? माकड हाड म्हणतात ना त्याचा वाढीव हिस्सा आहे तो ..   तेव्हढाच भाग फक्त छोटा होत जाणार आहे बाकीचे वाढत जाणार आहेत डोळ्यांच्या पापण्या अर्धवट तयार होऊन छोटुकले डोळे झाकण्यास तयार होत आहेत . बाळाचा मेंदू विकसित होतोय. बाळाचे बोन म्यारो तयार होऊन लाल रक्तपेशी तयार करत नाही तोपर्यंत लिव्हर ती जबाबदारी घेते.
बाळाला पनक्रिया पण आहे जे लवकरच इन्सुलिन तयार करायला सुरुवात करील
 तुमचे गर्भाशय आता जवळजवळ दुप्पट झाले असेल , खाण्या पाण्यावरून वासना उडाली असेल , मॉर्निंग सिकनेस मुळं हे सगळं होतं. 14व्या आठवड्या पर्यंत हे सगळे सहन करावं लागेल नंतर त्याची तीव्रता कमी होते.
 गर्भाशयाच्या दाबामुळे तसेच शरीरातील रकताचे प्रमाण वाढल्यामुळे लघवीला लागण्याचे प्रमाण वाढते . सध्या तुमच्या शरीरात नेहमीपेक्षा 10 % जास्त रक्त आहे हे लक्ष्यात असुद्या , प्रेग्नन्सीच्या शेवटच्या टप्प्यात ते 45 % पर्यंत वाढलेले असेल .
 डॉक्टर ला भेटायला जातांना तुमचया सगळ्या शंका कुशंका कागदावर उतरून घ्या. डॉक्टर काय सांगताय हे काळजीपूर्वक ऐका डॉक्टर विषारी शंका असल्यास लगेच दुसऱ्या डॉक्टरकडे जा पण ज्या डॉक्टरकडे जाल तिथे एकाच डॉक्टरकडे  सगळी ट्रीटमेंट घ्या.  वेळोवेळी डॉक्टर बदलल्याने मोठे नुकसान होते. त्यामुळे विश्वास पटेल अश्याच डॉक्टरकडे जा . त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा. पैस्यासाठी डॉक्टर आपल्याला अमुक सांगतात , तुमच्या आईच्या वेळेस सासूच्या वेळेस असं नव्हतं , हे करत बसू नका. काळ बदलला आहे तेव्हा डॉक्टर सांगेल तेच ब्रह्मवाक्य समजा .
  अल्कोहोल घेत असाल , सिगारेट घेत असाल किंवा कुठल्याही प्रकारे अंमली पदार्थांचे सेवन करत असाल तर तात्काळ बंद करा. 

No comments:

Post a Comment