आयुर्वेद व सौंदर्य

आयुर्वेद व सौंदर्य

सौंदर्य म्हणजे सुन्दरता .सुंदरतेचा भाव म्हणजे सौंदर्य. सौंदर्यामुळे शरीराला व मनाला सुख व आनंद होतो .

   असे हे सौंदर्य  , शरीराचे आणि मनाचे असे दोन्ही प्रकारचे असावे लागते . केवळ दिसावयास सुंदर असणे ,

 एवढयाने  सौंदर्य प्राप्त होत नाही तर गीतेत सांगितल्याप्रमाणे योग्य आहारविहार किंवा वागणूक ही सौंदर्य प्राप्त

करून देणारी मुख्य साधने आहेत . आयुर्वेदात स्वस्थ किंवा सुस्थितीत असलेल्या व्यक्तीसच  सुंदर म्हटले आहे

व ही सुंदरता किंवा सौंदर्य प्राप्त होण्यासाठी शरीराचे मूळ घटक दोष (वात,पित्त ,कफ), धातु (रसादि) व

मळ( स्वेद , मूत्र, मल ,आदि) या घटकांचे योग्य तऱ्हेने परिवर्तन पोषण करणारा अग्नी या सर्वांची योग्य  सातत्याने

होत राहणे व ते सुस्थितीत असणे तसेच त्या व्यक्तीचे मन ,आत्मा आणि सर्व बुद्धीं द्रिये व कर्मेंद्रिये प्रसन्न असणे

 आवश्यक आहे .  यामुळेच व्यक्तीचे सौंदर्य खुलते व वाढते .

     शरीराचे सौंदर्य म्हणजे केवळ गोरेकाय शरीर असणे हे नव्हे तर शरीराचे सर्व अवयव रेखीव असणे .

शरीराचा एकूण बांधा सुडौल असणे (समसुविभक्त )हे फार महत्त्वाचे आहे.

     मनाच्या दृष्टीने व्यक्तीचे सौंदर्य हे सत्व वृत्तीचे किंवा प्रकृतीचे मन असणे, हे सौंदर्य वाढविते .

सतत आनंदी, हसतमुख असणे , सुखदुःख ला सहजपणे सामोरे जाणे ,(लोभेषांरागमत्सयादि ) राग  ,

लोभ ,मत्सर नसणे .प्रियवादीत्व ,सहिष्णुत्व,पावित्र स्मृतीवान  वगैरे असणे. या मानसिक सौंदर्य खुलविणारी

गोष्टी आहेत .अशा तऱ्हेने शारीर - सौंदर्य असणारी व्यक्ती ही उत्तमोत्तम सौंदर्य असणारी समजली जाते .

   शरीराचा हा व्यापक विचार लक्षात घेतल्यावर सौंदर्य राखण्यासाठी प्रत्येक स्त्री-पुरुषाने नित्य

नियमाने काळजी घेतली पाहिजे. ही काळजी घेताना आपल्या शरीराचे सर्वसामान्य आरोग्य राखणे

याबरोबरच खास करून सातत्याने केश, स्वतःचा चेहरा, डोळे ,दात  स्तन , नखे वगैरेची निगा राखणे व

खुलून दिसणे अगर सुंदर दिसणे याबाबत सतत जागरूक राहणे आवश्यक आहे .यायोगेच प्रत्येकाला सौंदर्य

प्राप्त होईल व त्यायोगे स्वतःला तसेच सभोवतालच्या

व्यक्तीलाही सुखकर व आनंददायी असे होईल .

      आयुर्वेद शास्त्राचे मुख्य ध्येय स्वस्थत्स स्वास्थरक्षणम् ।  हे सांगितले आहे या स्वास्थ्यरक्षणासाठी

शरीराचे आरोग्य कशाप्रकारे उत्तम राखता येईल याचे वर्णन केलेले आहे .अशा तऱ्हेने शरीराचे पर्यायाने

शरीर अवयवांचे स्वास्थ राखताना त्यांचे सौंदर्य कसे वाढेल व कसे टिकेल याचे मार्गदर्शन या आयुर्वेद

ग्रंथातून सापडते .नाक डोळे इत्यादी अवयव हे चांगले व सौंदर्यपूर्ण असणे हे आपल्या हातात नसते .

पण ते आरोग्यपूर्ण राखणे हे मात्र सर्वस्वी आपल्याच हातात असते .त्यामध्ये शरीराची त्वचा ही अत्यंत

महत्त्वाची .आपण त्वचेचा विचार करताना चेहर्‍याच्या त्वचेचा विचार अधिक करतो परंतु सार्वदेहिक

त्वचाही विचारात घेतली पाहिजे .आपल्या सर्व शरीरात मज्जेचा स्नेह सर्व त्वचेवर असतो .हा मज्जेचा स्नेह

आपण अनेक प्रकारचे साबण ,शाम्पू , क्रीम वगैरे वापरून घालवितो .त्यामुळे त्वचेला जास्त रुक्षता येते .

परंतु प्राचीन ऋषींनी आपल्याला या आयुर्वेदशास्त्र द्वारा त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी अनेक औषधी सांगितल्या

आहेत तसेच काही नियमही सांगितले आहेत. रोज शरीरास तेलाचा अभ्यंग करावा त्यात सुद्धा विशेष करून

डोके ,कान आणि पाय (तळपाय )ह्यांना विशेष . त्यामुळे दृष्टी स्वच्छ होते ,त्वचा सुकुमार होते व शरीर कणखर

 होते. याशिवाय अभ्यंगाने झोपही व्यवस्थित होते .पूर्वी स्नान करण्याआधी अंगाला नेहमी उटणे लावण्याची

पद्धत होती.  उटणे लावल्याने कांती  तेजस्वी होते आणि शरीरातील मेदही त्याने झडतो .

        अशाच प्रकारचे स्नानाचे गुणही त्वचेच्या दृष्टीने फारच उपयुक्त असतात . डोक्यावरून स्नान करताना

कधीही फार गरम पाणी वापरू नये त्यांनी डोळ्यास इजा पोहोचते .अशा तऱ्हेने दिनचर्या मध्ये रोज कसे

वागावे हे सांगितले आहे आणि निरोगी राहण्यासाठी या दिनचर्येला अतिशय महत्त्व असून पर्यायाने निरोगी

शरीर असणे हेच सौंदर्याचे मूळ आहे. निरोगी शरीर असेल तर त्या मानसाची त्वचा ही तेजस्वी सुकुमार

आपोआप दिसते .

 रषोघ्न  द्रव्यांमध्ये वेखंड हे मौल्यवान औषध असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे त्वचेचे रक्षण करते .

हल्लीच्या ब्युटीपार्लरमध्ये सध्या जे हर्बल पँक ( फेशियल साठी) वापरतात ते फार पूर्वीपासून या शास्त्रात

 सांगितले आहे उदाहरणार्थ अनंता , मंजिष्ठा , हरिद्रा ,चंदन ,कमळ, ज्येष्ठमध , दूर्वा , विदारीकंद या वनस्पतीचे

वर्णन केवळ वर्ण्य द्रव्य म्हणून केलेले आहे . आयुर्वेद शास्त्रात त्यासाठी घरच्या घरी करण्यासारखे उपचार

सांगितलेले आहेत . त्यामध्ये

१)रक्तचंदन

२)जायफळ

३) मिरी

४)चंदन

५)मसूरडाळ

    या द्रव्यांचा लेप तोंडावरील मुरूमे नाहीशी करतो.

 त्वचेनंतर आवडता विषय म्हणजे केस .आता केसांचे विकार कोणते ते पाहू .१)केस गळणे ,२)केस पिकणे,

३)कोंडा होणे, ४)चाई पडणे इत्यादी विकार आपणास व्यवहारात रोज पाहण्यात येतात. त्यांचे कारण म्हणजे

हाडातील शक्ती कमी होते. मीठ जास्त खाल्ल्याने सुद्धा केस पिकतात खूप घाम येतो, आजारपणाने ,स्थूल

प्रकृतीने ,मानसिक कारणाने त्याशिवाय आम्लपित्त जास्त असणे ,जास्त विचार करणे ,मासिक पाळीच्या

तक्रारी असणे ,कृत्रिम सेंट ,तेल लावणे इत्यादी कारणे घडतात केसांच्या रक्षणासाठी शिकेकाई, रिठे ,

गव्हळा ,कचोरा ,मुस्ता, आवळकाठी इत्यादी द्रव्ये सांगितली  आहेत .







डॉ. ज्योती गणेश पवार  
आयुर्मंत्रा हेल्थ क्लिनिक स्त्रीरोग ,
त्वचा व केस तज्ञ ,
शिवगणेश चौक, 
पिंपळे गुरव ,पुणे ६१