चौदावा आठवड्यातील प्रेग्नन्सी

14 week pregnancy 

 आई मी मोठ्ठया आकाराच्या लिंबाएवढा  झालोय ग , माझी उंची कित्ती आहे माहितीये ? ९ सेंटीमीटर , ४३ ग्राम वजन आहे .  

हो खरं सांगतेय तुजी बबडी , आता वेगाने वाढतेय ,  डोक्यापेक्षा खाली जास्त वाढतेय . आता पूर्ण मानव दिसतेय आता . मांसाचा गोळा आता आकार घेतोय . सगळ्या अंगावर लव येतेय . शरीरावर आणि डोक्यावर . ही लव साधारणपाने आठव्या आठवड्यात गळून जाते ,   आणि प्राण्यांपासून माणूस वेगळा होतो    इतकेही नाही गाळून जावे की साहेबांसारखे डोक्यावर विमानतळ होईल .  ही लव लेकराच्या शरीराचे तापमान नियंत्रण करण्यात मदत करते . कारण नवजात अर्भकाच्या अंगावर पांढरट थर असतो मेणासारखा त्याला व्हर्निक्स म्हणतात तो शरीरावर चिकटून बसावा म्हणून ती लव मदत करते . व्हर्निक्स म्हणजे जेव्हा तोंडावर आपल्या तारुण्य पिटिका येतात त्याचे नंतर ब्लॅक हेड होतात तो पदार्थ . नवजात अर्भकाचे तापमानापासून संरक्षण करतो !! 



व्हर्निक्स 


चौदावा आठवड्यातील बाळाची अवस्था 




उलट्या मळमळ खूप त्रास सहन केला ना ? आता त्यापासून तुझी सुटका होण्यास सुरुवात होईल . आता तुमचं गुपित जगजाहीर झालंय !!! पोट दिसायला लागलंय , नाही दिसत असेल तर  काय लगेच गर्भाची वाढ व्यवस्थित नाही असे अनुमान काढून मोकळी होऊ नको . डॉक्टारांनी सांगितलंय ना , बाळ व्यवस्तीत आहे ....  संपलं  मग . ब्लॉग वरची माहिती ही लोकांच्या अनुभवावरून घेतलेली असते आणि प्रेग्नन्सी मध्ये प्रत्येकाच्या शरीराची ठेवणं एकसारखी बदलत नाही तेव्हा डॉक्टरचं वाक्य ब्रह्मवाक्य 
गर्भाशायाचा आकार वाढत आहे आणि म्हणूनच ब्लॅडर वर जास्त दबाव येण्यास सुरुवात होईल . ज्यामुळे वारंवार लघवीला जायला लागू शकते . नाकातून क्वचित रक्त येऊ शकते . गर्भावस्थेतील हार्मोन्स मुळे रक्तवाहिन्या कमकुवत होतात . रक्ताचा दाब वाढला की कमकुवत वाहिन्यांमधून रक्त बाहेर येते . नाकाच्या आतली त्वचा कोरडी झाली की रक्तवाहिनांमधून रक्त बाहेर येऊ शकते . त्यासाठी भरपूर पाणी पी . मस्त रहा खुश रहा  !! नाही नाही मधुराच्या रेसिपी जास्त  बघू नको . बेबी रागवेल . आई फक्त बघते , करत काहीच नाही म्हणून 









No comments:

Post a Comment