संभोग प्रणय की सेक्स

कामजीवनात मराठी भाषेत दोन  सुरेख शब्द आहेत संभोग , प्रणय .
पुरुषाचे प्रेम हे शरीर प्रधान असते तर स्त्री चे प्रेम हे फक्त शरीरावर नसून पूर्ण व्यक्तिमत्वावर असते .
संभोगाच्या आधी प्रणय येतो .प्रणयाच्या आधी प्रेम .  कामशास्त्रात स्त्री ही संभोगाच्या दुसऱ्या टोकाला असते तिला साद घालून रुंजी घालून , प्रणयाच्या साधनाने संभोगापर्यंत आणावे लागते . सर्व दैवत शास्त्र कामजीवन आणि पर्यायाने पुनर्जीवन याच विषयाशी संबंधित आहे . त्यामुळे कामजीवनाला जसं सांसारिक महत्व आहे तसच अध्यात्मिक शाश्त्रातही महत्व आहे . स्त्री पुरुष मिलन हीच सगळ्या संसाराच्या पुनर्निर्मितीची व्याख्या आहे . वनस्पती , प्राणी या  दोहोंमध्ये जर काही साम्य असेल तर ते स्त्री आणि पुरुष तत्वाचे मिलन आणि त्यातून पुनरुत्पत्ती हेच आहे .
त्यामुळे कामजीवन त्याज्ज नाही तर पुज्ज्य आहे .

   हे सुद्धा वाचनीय आहे : नैसर्गिक गर्भधारणा कशी होते ?

कामभावना ही परमेश्वराचीच देणगी आहे तिचा तिरस्कार करण्याचं मुळीच काही कारण नाही . उलट याचे शिक्षण जागृती न केल्याने उगाच एखाद्या स्त्रीच्या अंगचटीला येणे , गर्दीचा फायदा उचलून स्पर्श करणे असे प्रकार होतात . कारण लैंगिकता हा विषय तुम्ही कितीही लपवला तरी विविध माध्यमांनी मुलांच्या संपर्कात येतो आणि कुतूहलापोटी योग्य अयोग्य चे मार्गदर्शन नसल्याने  चुकीची पावले त्यांच्याकडून उचलली जातात .
सेक्स हा विषय लग्नानंतरचा , त्याआधी त्याविषयी बोलणे हा सुद्धा असंस्कृतपणाचा विषय होतो .
मासिक पाळी हा सुद्धा एक समाजाच्या दृष्टीने भयानक विषय , खरं तर मासिक पाळी सुरु होण्याआधी मुलींना याबद्दलची कल्पना देणे आवश्यक असते पण काहीच कल्पना नसताना अचानक मासिक पाळी सुरु होते तेव्हा मानसिक धक्का मुलींना बसू शकतो , ईश्वराच्या  सर्वोच्च देणगीला अपवित्र म्हणायचे महापातक का करता ?
४५-५० मध्ये मासिक पाळी हळू हळू बंद होते तेव्हा स्त्री चा स्वभाव चिडचिडा बनतो काळजी , उदासीनता वैराग्य अश्या भावना वारंवार उमटतात झोप येत नाही भूक मंदावते , अश्या वेळी स्त्री ला समजून  घेणे आवश्यक असते . नवऱ्याचा सहवास अश्या कालखंडात खूप मोलाचा असतो .

    हे सुद्धा वाचनीय आहे : मासिक पाळी आणि जननचक्र

तरुणांना हस्तमैथुन म्हणजे वाईट कुणीतरी सांगितलेलं असतं , त्यामुळं नपुंसकत्व येतं , शक्ती कमी होते असेही सांगितलं जातं पण हस्तमैथुन ही नैसर्गिक बाब आहे हे तरुणांनी लक्ष्यात घ्यावं आणि नपुंसकत्व येतं , शक्ती कमी होते हे निव्वळ भ्रम आहेत . हस्थमैथुन फक्त आपणच करतो हे मनातून काढून टाकणे आवश्यक आहे . बुद्धिमत्ता समरणशक्ती , कुस्तीगिरांची ताकद यापैकी कशावरच हस्थमैथुनाचा फरक पडत नाही .
योग्य वयात लग्न योग्य वयात संतती हे आवश्यक आहे


No comments:

Post a Comment