वजन कमी कसे करू ?


आज तरुण तरुणी लहान मुले माध्यम वयीन सर्वांमध्ये आढळत असलेली समस्या म्हणजे वजन
यावर सर्वसमावेशक काही उपाय शोधात येईल का यावर खूप दिवस विचार केला तज्ज्ञांना भेटून
पाहिलं आणि त्यातून हा लेख
वजन वाढीची करणे
 महिलांमध्ये यात खूप कॉम्प्लिकेशन आढळतं , प्रेग्नन्सी मध्ये वजन वाढणं ही कॉमन गोष्ट आहे ,
तसेच हार्मोन्सचे असंतुलन हे पण आहे यावर उपाय करता येणं कठीण आहे पण अशक्य नाही
महिलांमध्ये याव्यतिरिक्त वजन वाढण्याचं मोठ्ठ कारण म्हणजे सगळ्यांच्या शेवटी जेवण करणं ,
शेवटी उरलेलं सगळं पोटात रिचवायचं कारण उष्ट पडायला नको , ओला कचरा त्याचा वास , हे
अव्हॉइड करायच असेल तर उरलेलं आपण खाल्लंच पाहिजे नाही का ?
खरं तर हार्मोन्स च संतुलन योग्य असतांना गरजेपेक्षा जास्त खाल्लं की वजन वाढणारच  मग तो
पुरुष असो कि महिला !!
बैठे काम करणार्यांचा मेंदू थकतो पण शरीराचे काय?
पिझ्झा, बर्गर, साखर, चहा , मैदा तळलेले पदार्थ चॉकलेट मटण (चिकन नव्हे )वजन वाढण्यासाठी ही साधनं फार उपयुक्त आहेत .जेवढं खाल्लं तेवढं जिरवलं जातं म्हणून प्राण्यांना वजन वाढीचा अभिशाप नाही , तो माणसांना . उदरभरण नोव्हे जाणिजे यज्ञकर्म हे विसरलो की संपलंच , खाण्यासाठी जगायचं की जगण्यासाठी खायचं हा मोठाच प्रश्न आहे.
असो .. प्राप्त परिस्तिथीत  वजन कमी कसं करायचं याची माहिती घेऊया
१) जेवणाचे व्यवस्थापन
    तुम्ही अनेक प्रकारचे डायट प्लॅन ऐकले असतील . तुम्ही ट्राय पण केले असतील!! पण पूर्ण नाही करता आलं !!!
   माझ्याकडे सोप्पा  डायट प्लॅन आहे , जो तुम्ही कुठलाही लोड न  घेता करू शकता
     १) सकाळी उठल्यावर मनुके खावे ३-४ आणि अंजीर किंवा आलू बुखारा खावा पोट साफ होण्यासाठी मदत होते नाही खाल्लं तर काही फाऊल होत नाही
     २) चहा ( जास्तीत जास्त एक चमचा साखर घातलेला ) आणि दोन मारी बिस्कीट खावी
     ३) थोडा अंतराने पोहे उपमा कमी साखरेचा शिरा घावन किंवा आवडेल तो नाश्ता घ्यावा अंडी घेत असाल तर खूप उत्तम
     ४) १२:३० दरम्यान १ चपाती आणि शेंगदाणे कमी घातलेली भाजी खावी सोबत काकडी गाजर वगैरे असले तर उत्तम
     ५) ३:३० दरम्यान काहीतरी खावं( भूक लागली तर ) , खूप हेवी नाही आणि कंपलसरी पण नाही
     ६) तुम्ही जिम ला वर्क आऊट करण्यासाठी ७:३० ला जाणार असं मी गृहीत धरतो ,त्या आधी २ तास स्लो ऍबसॉरबिन्ग कार्बोहायड्रेट (चपाती वगैरे  ) खावे
     ७) रात्री जेवणात १ चपाती आणि भाजी तसेच  १ कप दूध घ्यावं
 २) घाम येईस्तोवर व्यायाम करावा / फिरायला जावे / दोरीवरच्या उड्या माराव्या [pcod मध्ये दोरीवरच्या उड्या चांगली मदत करतात ]/ झुंबा /डान्स
 ३) टेन्शन घेऊ नका अगदी वजनाचे सुद्धा पॉसिटीव्ह राहा
४) स्वतःशी प्रामाणिक राहा
५) सगळे पदार्थ खात जा .
६) शिळे अन्न खाऊ नका , मोजकं शिजवा , आणि संपवायचं म्हणून खाऊ नका
७) श्रद्धा ठेवा देवावर स्वतःवर आईवडिलांवर कुठल्या आवडत्या महाराजांवर थोडक्यात कुणावर तरी