सतरावा आठवडा


राजे चक्क १५० ग्रॅम वजनाचे झालेय बरं का !! आणि चांगले मोठ्या कांद्यांएवढे दिसत आहेत !! (१४ सेंटीमीटर )

या आठवड्यात आपल्या बाळाच्या चेतासंस्थेत nervous system बदल होत आहेत . मायेलिन नावाच्या एक फॅटी पदार्थाने तिच्या मज्जारज्जू spinal chord भोवती वाढायला लागलाय  . हे आपल्या शरीरातल्या मज्जातंतूतील संदेशांना मेंदूमध्ये घेऊन जाण्यास मदत करते.

तुमचे बाळ चांगले ऐकू शकते. तुझ्या बाळाला संगीत कळतंय बरं का !! गाणं ऐकून पोटात नाचेलसुद्धा (पोटात हालचाल करील ). बाळाच्या हालचाली आता जाणवायला लागतील .  बहुतेक 18 आणि 20 आठवड्यांच्या दरम्यान बाळाच्या हालचाली जाणवायला लागतील.

पोटावर बेंबीच्या वर एक गडद रंगाची उभी रेष आली असेल , तिला linea niagra म्हणतात . प्रत्येकीलाच येते असे नाही पण बऱ्याच जणींना येते , आणि प्रसूती झाल्यावर हळूहळू नाहीशी होते
मानेवर चेहऱ्यावर हातावर काळे व्रण दिसू शकतात . तुम्ही गौर वर्णाच्या असाल तर स्पष्ट दिसण्याची शक्यता अधिक . असं होतं कारण तुमचं शरीर जास्त मेलॅनिन तयार करतंय सूर्याच्या किरणांपासून तुमचं संरक्षण करण्यासाठी !!  ६५ टक्के महिलांच्या बाबतीत असं घडतं म्हणून काळजी करू नका प्रसूतीनंतर आपोआप सर्व व्यवस्तीत होईल
निप्पल ची साईझ वाढेल रंग सुद्धा डार्क व्हायला लागेल. याचं कारण अधिकचा रक्तप्रवाह सध्या तुमच्या स्तनां मध्ये आहे
बाळंतपणानंतरही डार्क झालेला निप्पलचा रंग तेवढा कायम राहतो 

No comments:

Post a Comment