अकराव्या आठवड्यातील प्रेग्नन्सी

 


आई ये आई ऐकतेस ना ? आई !!!  तुझी गोडुली तुला आतून आवाज देत असेल आणि तू म्हणत असशील थांब ग सोने , खूप मळमळ होतेय !! 

अन गोडुली सांगत असेल ती चार सेंटीमीटर ची झालीय , टपोऱ्या लालबुंद अंजिरा एवढी . मनुष्य प्राण्याच्या तोंडावळ्याचा आकार घेतेय !! आमच्या दाजींसारखी हँडसम दिसतोय की तुझ्यासारखी रुपगर्विता याची ठेवण बनतेय . आयुष्यभर याच चेहऱ्याकडे बघून मकडायचं आहे आता . हिरड्यांच्या आत दातांसाठी सगळी उपाययोजना तयार होते आहे .  त्याच्या बोटावर आधीच लहान नखे वाढू शकतात.

बाळाच्या नसा आणि रक्तवाहिन्या विकसित होत आहेत आणि त्या त्याच्या त्वचेच्या पातळ थरात दिसू शकतात. त्याचे डोळे अद्याप बंद असले तरी, बबडीला झोप कुठं आहे !! . ती तर पोटात दणादण लाथा  मारून आणि स्वतःला  ताणून आपल्या स्नायूंना लवचिक करण्यात व्यस्त आहे आणि कदाचित त्याचा श्वासपटल अधिक मजबूत झाल्यामुळे तुझ्या आठवणीत उचक्या पण लागत असतील . बाहेर असती तर हकाक हकाक आवाज आला असता . पण हे सगळं इतकं नाजूक आहे की १८ ते २० आठवडे लागतात बाळाची हालचाल जाणवायला . पहिलटकरणीला तर अधिक दिवस !!

आपल्या बाळाचा बहुतेक महत्वाच्या अवयवांचा विकास पुढच्या काही आठवड्यांत संपेल. सोनोग्राफी लवकरच नियोजित करावी लागेल . म्हणजे बाळाचा विकास व्यवस्थित झाला आहे की नाही ते कळेल . या टप्प्यावरील सोनोग्राफी खूप महत्वाची असते म्हणून टाळू नये . थोडी महागही असते . यानंतर मात्र  पुढील सहा महिन्यांत त्याचे मुख्य कार्य मोठे आणि मजबूत होणे हे असेल. या काळात त्याचा मेंदूही वेगाने वाढेल.

बाळ आता असं दिसत असेल 


श्वासपटल म्हणजे काय 





No comments:

Post a Comment