चौथा आठवडा

बाळाची साईज महितीय का किती आहे या आठवड्यात ? मोहरीच्या दाण्या एवढी या आठवड्यात बाळाची सर्वांगीण विकासाची प्रक्रिया सुरू झाली आहे ,पुढचे दहा आठवडे बाळाचे सर्व अवयव एक एक करून डेव्हलप होण्यास सुरूवात होईल. काहींचे कार्य सुद्धा करणं चालू होईल . वार (प्लासेंटा) सुद्धा या काळात यूटरस वर नळी सारखा भाग ज्याला आपण नाळ म्हणणार आहोत ते तयार होण्यास सुरुवात होतेय ज्या द्वारे बाळाला ऑक्सिजन आणि अन्नद्रव्ये मिळतील , पुढची नऊ महिने ज्याद्वारे बाळाला तुम्ही खाऊ घालणार आहेत त्याची तयारी चालू झाली आहे
Yolk sac म्हणजे जसं अंड्यात पिवळं बलक असतं तसं तयार झालं आहे याच्यापासूनच  बाळाच्या लाल रक्त पेशी तयार होतील .  जोपर्यंत नाळ पूर्ण तयार होत नाही आणि आपले कार्य चालू करत नाही तोपर्यंत बाळाच्या पोषणाची जबाबदारी yolksac घेते. या आठवड्यात तुम्हाला प्रेग्नन्सी काळूनच जाईल , नाही कळली तरी पुढच्या आठवड्यात नक्कीच कळून जाईल.
प्रेग्नसी राहिलीय हे नाक्की कळलं की तुमच्या डॉक्टर , नर्स ताई किंवा आशा यांच्याकडे संपर्क साधा . तुम्हाला आधी कुठल्या गोळ्यांचा कोर्स चालू असेल तर त्या गोळ्या पुढे घेतल्या तर चालणार आहे का त्याचे काही साइड इफेक्ट नाही आहे ना हे विचारून घ्या मल्टी व्हिटॅमिन आणि कमीत कमी 400 mg फॉलीक ऍसिड च्या गोळ्यांचा कोर्स डॉक्टरच्या सल्ल्याने चालू करा . पुढचा दीड महिना अतिशय संवेदांशील आहे बाळासाठी . नाळ आणि वार यांच प्राथमिक विकास झालेला आहे , आणि नालेद्वारे तुमच्या बाळाला तुमच्या रक्तातून थेट संबंध येत असल्याने तुम्ही काय खाल ते सगळे बाळाशी संबंधित होऊन जाईल त्यामुळे विचारपूर्वक खा . 

No comments:

Post a Comment