बहुगुणी शेवगा



आयुर्वेदिक दृष्ट्या शेवग्याची पाने ही औषधी असून यामध्ये अ, ब, क ही जीवनसत्त्वे, लोह कॅल्शियम सारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. आयुर्वेदात शेवग्याच्या पानांची पावडर करून त्याचा उपयोग कुपोषण रोखण्याकरिता पोषक आहारात केला जातो.

तोंड आल्यास शेवग्याची पाने चावून-चावून खावीत. तसेच शेवग्याची मुळे जंतनाशक असतात. शेवग्याच्या पानांच्या पावडरीचा उपयोग खरुज, उलटी होणे इ.वर होतो. तसेच जखमेवर पानांचा लगदा बांधल्यास आराम पडतो. कोवळ्या पानांच्या रसात मिरे घालून लेप लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो. पानंाच्या रसाने केसांतील कोंडा नाहीसा होतो.

शेवग्याचा पाला काहीसा तुरट असतो परंतु भाजी केल्यास उत्तम लागते. बरेच दिवसांच्या तापातून उठल्यास भ्ाूक पूर्ववत व्हावी म्हणून भाजी खावी तसेच शेवग्याच्या पानाचे पोषणमूल्य अनन्यसाधारण आहे. त्यामध्ये दुधापेक्षा चौपट पटीने अधिक कॅल्शियम आढळते. सहा ते सात संत्र्यांमध्ये जितके जीवनसत्त्व ‘क’ आढळते तितकेच या पानांमध्ये आढळते. शेवग्याच्या पानातील प्रथिने पाचक असतात. ३ केळ्यांपासून जितके पोटॅशिअम आपल्याला मिळेल तितकेच १ बाऊल भाजीत आपल्याला आढळते.

शेवग्याच्या शेंगा

शेवग्याच्या पानाइतकेच शेवग्याच्या शेंगानासुद्धा महत्त्व आहे. शेवग्याच्या शेंगेला वेगवेगळी नावे आहेत. जसे मोरंगा;म्हणजे आपला मुंगणा, इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक. आपल्याकडे काही भगात शेवगा देखील म्हणतात. याचेच बॉटनिकल नाव मोलिंगा ओलेयेरा असे आहे. मुंगण्याच्या किंवा शेवग्याच्या शेंगेत व त्याच्या बियांमध्ये व्हिटॅमीन ए, बी, बी २, बी ३, आणि सी, फोलिक ऍसिड, ऍस्कॉर्बिक ऍसीड; बीटाकॅरेटीन इत्यादी शरीर स्वास्थ्याचे घटक असल्यामुळे ‘बहुमूल्य’ आहेत.

याची खासीयत अशी आहे की भारताच्या कुठल्याही भौगोलिक ठिकाणी हे उपयोगी गुणी झाड सहजच उगवते. कुपोषणासारख्या राक्षसावर मात करण्यास हे बहुगुणी झाड ग्रामीण भागातील लोकांना आधारभ्ाूत आहे.

अफ्रिकेसारख्या देशात भ्बळीविरुद्ध लढा देण्याकरिता उत्कृष्ट आहार म्हणून शेवग्याच्या शेंगा, पाने, बिया यांचा समावेश करण्यात येतो. तसेच या व्यतीरिक्त एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की एचआयव्ही, एड्‌स यासारख्या रोगांवर रोगसंहारक व प्रतिबंधक म्हणून उपयोगही केला जातो.

वरील बाबींशिवाय शेवग्याची फळं म्हणजेच बिया पिण्याचे पाणी शुद्ध करतात. बियांचा लगदा गढूळ पाण्याला निर्जंतुक करून स्वच्छ करतो. तसेच बियांचा उपयोग तेल काढण्यासाठी होतो. त्याला ‘ब्रेन ऑईल’ असे म्हणतात.

शेवग्याच्या शेंगांच्या काही पाककृती

शेवग्याच्या शेंगांची काठीयावाडी भाजी –

ही भाजी काठीयावाड लोकांमध्ये जास्त प्रमाणात बनते.

साहित्य :- शेवग्याच्या ४ शेंगाचे काप, २ ते ३ टोमॅटो, ५ ते ६ लसूण कळ्या, १ इंच आलं, २ ते ३ हिरव्या मिरच्या, २ कांदे, १ चमचा धने पावडर, १ चमचा तिखट १/२ चमचा हळद, १ चमचा गोडा मसाला, फोडणीकरिता तेल, मोहरी, जिरे आणि हिंग, चवीनुसार मीठ, साखर.

कृती :- सर्वप्रथम कांदा बारीक चिरून घ्यावा, २ टोमॅटोची प्युरी करून घ्यावी व १ टोमॅटो बारीक चिरून घ्यावा, लसूण + आलं+ हिरवी मिर्ची ठेचून घ्यावी. कढईत फोडणीकरिता तेल घालून त्यात मोहरी, जिरे, हिंग घालून बारीक चिरलेला कांदा घालावा व परतून घ्यावा नंतर त्यात लसूण मिर्ची पेस्ट घालावी व परतून घ्यावी व सर्व मसाले एक-एक करीत घालावे व खमंग भाजून घ्यावेत व त्यांत चिरेलेल टोमॅटो व टोमॅटो प्युरी घालून शेवग्याच्या शेंगा घालाव्यात व चवीपुरते मीठ घालून भाजी परतवून घ्यावी व गरज भासल्यास पाण्याचा हबका देवून मंद आचेवर शिजवून घ्यावी. कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी.

शेवग्याच्या शेंगांचा वर्‍हाडी रस्सा –

साहित्य :- शेवग्याच्या शेंगा ४ ते ५, कांदा १ मोठा, लसूण ८ ते १० कळ्या, आलं २ इंच, हिरव्या मीर्च्या ३ ते ४, टोमॅटो १ मोठा आकाराचा, तेल फोडणीकरिता, मीठ चवीनुसार.

वाटण्याच्या मसाल्याचे साहित्य :- खसखस १ टे. स्पून, मोठी विलायची १, छोटी विलायची २ नग, जायफळ पाव तुकडा, जायपत्री १ नग, लवंग ५ ते ६, मिरे ७ ते ८, लाल मिर्च्या ५ ते ६, सुके खोबरे १ स्टे. स्पून, २ टे. स्पू. धने पावडर, २ टे. स्पून गरम मसाला, २ टे. स्पून तिखट, १ टी. स्पून हळद, फुटाण्याच्या डाळ्या १ चमचा, कर्णफूल १/२ (अर्धे), तेजपान १-३.

कृती :- सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगांचे काप करून घ्यावेत व स्वच्छ पाण्यात घालावे, कांदा चिरून थोड्या तेलावर परतवून घ्यावा व बारीक वाटून घ्यावा, लसूण मिर्ची अद्रक वाटून घ्यावे व टोमॅटो प्युरी तयार करून घ्यावी. वाटणाचा सर्व मसाला थोड्या तेलावर एक-एक करीत भाजून घ्यावा व त्याची पाणी घालून मिक्सरमध्ये मुलायम पेस्ट करून घ्यावी.

कढईत तेल घालून त्यात तेजपान घालावे व लगेचच त्यात वाटलेला कांदा व वाटलेले लसूण अद्रक घालून परतवून घ्यावे व नंतर त्यात मसाल्याचे वाटण घालावे (वाटण जास्त वाटत असल्यास थोडे बाजूला करावे)

वाटण चांगले परतून घ्यावे तेल सुटल्यावर त्यात हळद, तिखट, धनेपावडर, गरम मसाला घालून परतवून घ्या व पाण्याचा हबका मारून मंद आचेवर वाफ घ्या व नंतर जेवढा रस्सा हवा असेल तितके भाजीत गरम पाणी घाला व भाजी शिजवून घ्या. कोथिंबीर घालून सर्व्ह करा. गरमा गरम भाजी, भाकरी किंवा पोळीसोबत उत्तम लागते.

शेवग्याच्या शेंगांचं पिठलं –

साहित्य :- शेवग्याच्या शेंगा २ ते ३ साधारण काप करून, डाळीचे पीठ (बेसन), १/२ वाटी, ५ ते ६ हिरव्या मीर्च्या, कांदा -१, १ टोमॅटो बारीक चिरलेला, १ वाटी आंबट दही , हळद, तिखट, मीठ, चवीनुसार, तेल फोडणीकरिता.

कृती- थोड्या पाण्यात शेवग्याच्या शेंगा वाफवून घ्याव्यात. कढईत तेल फोडणी घालून त्यात मोहरी हिंग, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या घालून परतवून घ्या. त्यात हळद, तिखट, टोमॅटो बारीक चिरून घाला व फोडणी खमंग करून घ्या.

पाण्यातून शेंगा बाहेर काढून फोडणीत घाला व परतवून घ्या. परतल्यावर उरलेले पाणी त्यात घाला. बेसन आणि दही चंागले एकत्र घोटून घ्या व सरसरित करा. पाण्याला उकळी आल्यावर त्यांत चवीनुसार मीठ घालून बेसन आणि दह्याचे मिश्रण घाला व वाफ घेऊन शिजू द्या. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

फोडणीच्या वरणात देखील शेवग्याच्या शेंगा घालून वरण करतात तेही उत्तम आणि पौष्टिक असतं.

शेवग्याच्या पानांच्या काही पाककृती

शेवग्याच्या पानांची भाजी –

साहित्य :- शेवग्याची कोवळी पाने (साधारण १ जुडी होईल एवढा पाला) मुगाची डाळ १/२ वाटी, कांदा १, हिरव्या मिर्च्या ३ ते ४, लसूण पाकळ्या ५ ते ६, फोडणी साठी तेल, मोहरी, हिंग, कोथिंबीर.

कृती – मुगाची डाळ स्वच्छ धुऊन एक ते दीड तास भिजत घालावी व नंतर निथळून घ्यावी. शेवग्याची पाने निवडून स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर बारीक चिरावीत. १ कांदा हीरवी मिर्ची चिरून घ्यावे. एका कढईत तेल घालून त्यात मोहरी, हिंग हळद घालून फोडणी तयार करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, बारीक केलेले लसूण घालून परतून घ्यावा. खमंग परतल्यावर त्यंात मुगाची डाळ, शेवग्याची पाने व मीठ घालून परतून घ्या व झाकण ठेवून वाफेवर भाजी शिजू द्यावी. गरज वाटल्यास पाणी घालावे व एक वाफ घ्यावी. गरमा गरम भाजी सर्व्ह करताना किसलेले ओले नारळ आणि कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी.

शेवग्याच्या पानांचे सूप –

हे सूप दक्षिण भारतात करतात. अतिशय रुचकर आणि लोहयुक्त असते.

साहित्य – शेवग्याची पाने २ वाट्या, शेवगा शेंगेतील दाणे १/२ वाटी, लिंबू , मीठ, साखर, काळीमीरी पावडर चवीनुसार.

कृती – शेवग्याची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत व त्यात शेवग्याचे दाणे आणि सात वाट्यया पाणी घालून उकळून व गाळून घ्यावे. पाणी थोडे आटल्यावर चवीनुसार मीठ, साखर, लिंबू, काळेमीरे पावडर घालून सर्व्ह करावे.

शेवग्याच्या पानांच्या वड्या –

साहित्य :- शेवग्याचा पाला, बेसन, तांदूळ पीठ, रवा, हिरवी मिरची पेस्ट, ओवा, मीठ , हळद, तेल दही.

कृती :- शेवग्याचा पाला बेसन, तांदूळ पीठ, रवा ओवा, हळद तेल मीठ हिरव्या मिर्चीची पेस्ट घालून दही घालून भिजवून घ्यावे. तेलाचा हात लावलेल्या थाळीत थापावे व कुकरमध्ये वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर वड्या कापाव्यात. कढईत तेल घालुन तळाव्यात किंवा फोडणी करून परतवाव्यात. ओले नारळ, कोथिंबीर सर्व्ह कराव्यात.

ttps://tarunbharat.org


h/


कोविड -१९ साठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी विषयक मार्गदर्शक सूचना


राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत सर्वसामान्यांसाठी कोविड -१९ साठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी विषयक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.  या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर, टास्क फोर्स ऑन आयुष्य फॉर कोविड-१९ गठीत करण्यात आला होता. त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना  प्रतिबंधात्मक उपाय तसेच अलक्षणिक  रुग्णांवरील उपचारासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.
सामान्य प्रतिबंधात्मक उपाय:
१. वैयत्तिक स्वच्छतेचे पालन करणे.
२. वारंवार साबणाने हात २० सेकंदापर्यंत धुणे
३. खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा
४. ज्या व्यक्ती आजारी आहेत किंवा ज्यांना सर्दी खोकला इत्यादी आजाराची लक्षणे आहेत, अशा व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळावा.
५. जिवंत प्राण्यांशी संपर्क व कच्चे न शिजवलेले मांस खाणे टाळा.
६. पशुपालन गृह तसेच जिवंत पशु विक्री केंद्र किंवा कत्तलखाने या ठिकाणी प्रवास टाळावा

आयुष उपाययोजना पुढीलप्रमाणे
१. ताजे, उष्ण व पचायला हलके भोजन घ्यावे. भोजनात अख्खी आणि ऋतूनुसार भाज्यांचा समावेश असावा
२. तुळशीची पाने, ठेचलेले आले व हळद ही द्रव्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे.
३. सर्दी व खोकल्यासाठी चिमूटभर काळी मिरी, चूर्ण मधातून सेवन करणे फायदेशीर आहे.
४. कोविड-१९ लक्षणांमध्ये तुळस, गुळवेल, आले आणि हळद या सामान्य औषधी वनस्पती उपयुक्त आहेत.
५. थंड, फ्रिज मध्ये ठेवलेले व पचायला जाड असलेले पदार्थ टाळावे.
६. थंड वाऱ्याचा थेट संपर्क टाळावा.
७. विश्रांती व वेळेत झोप हितकारक आहे.
८. प्रशिक्षित योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व प्राणायाम करावे.
९. मुगाचे कढण / सूप / पाणी – मुगडाळ पाण्यात उकळून तयार केलेले मुगाचे गरम कढण / सूप / पाणी प्यावे, ते पोषक आहे.
१०. सुवर्ण दुग्ध / दुग्ध – १५० मिलीमीटर गरम दुधात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा सुंठीचे चूर्ण मिसळून हे दूध दिवसातून एकदा किंवा दोनदा प्यावे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी व रोग प्रतिबंधासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार
आयुर्वेदिक औषधी
१. संशमनी वटी १ गोळी दिवसातून दोनदा असे १५ दिवस
२. तुळस चार भाग, सुंठ दोन भाग, दालचिनी दोन भाग व काळी मिरी एक भाग या द्रव्याच्या भरड चूर्ण तयार करणे. वरील औषधीचे तीन ग्रॅम भरड चूर्ण १०० मिलिलिटर उकळलेल्या पाण्यात मिसळून ५-७ मिनिटे ठेवणे व नंतर हे पाणी पिणे.
३. च्यवनप्राश १० ग्रॅम सकाळी सेवन करणे (मधुमेही रुग्णांनी साखरविरहित च्यवनप्राश सेवन करावे.  
४. सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ तेल / खोबरेलतेल किंवा हे बोटाने लावावे.
५. तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळतेल/ खोबरेलतेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात व नंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चूळ भरावी असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे.

युनानी औषधी
१. बिहिदाना ५ ग्रॅम, बर्गे गावजबान ७ ग्रॅम, उन्नाब ७ दाने, , सपिस्तान ७ दाने, दालचिनी ३ ग्रॅम, बनपाशा ५ ग्रॅम यांचा काढा करून २५० मिलिलिटर पाण्यामध्ये १५ मिनिटे उकळावे व गरम असताना चहाप्रमाणे दिवसातून १ किंवा २ वेळा १५ दिवसांकरिता घ्यावे.
२. खमीरा मरवारीद दुधासोबत ५ ग्रॅम दिवसातून दोनदा घ्यावे. मधुमेही रुग्णांनी घेऊ नये.

होमिओपॅथी औषधी
१. आर्सेनिकम अल्बम ३० – ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्यावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करावा.

कोविड-१९ सारखी लक्षणे असणाऱ्या इतर आजारासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार

आयुर्वेदिक औषधी
१. टॅबलेट आयुष्य ६४ – (५०० मिलिग्रॅम)  दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे      
२. अगस्त्य हरितकी – ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्यावे.
३. अणुतेल – तीळतेल – दोन थेंब प्रतिदिन सकाळी नाकपुडीत टाकणे.
४. ताजी पुदिन्याची पाने किंवा ओवा पाण्यात उकळून त्याची वाफ दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्यावी.
५. खोकला व घास खवखवत असल्यास साखर अथवा मध यामध्ये लवंग चूर्ण मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.

युनानी औषधी
१. अर्धा ग्लास पाण्यामध्ये आरके अजिब ५ थेंब मिसळून गुळण्या कराव्यात, असे १५ दिवस करावे.
२. तिर्यक अर्बा – हब्बूल घर, ज्यूतिआना, मूर झरवंद तविल या सर्व घटकांचे चूर्ण तयार करून तुपामध्ये परतावे व मध गरम करून त्यामध्ये ही औषधे मिसळावीत. याचा वापर चूर्ण स्वरूपातही करता येतो, हे औषध १५ दिवस घ्यावे.

होमिओपॅथिक औषधी
१. आर्सेनिकम अल्बम ३० – ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्यावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करावा.  

२.तसेच ब्रायोनिया अल्वा, हस टॉक्सिको डेन्ड्रॉन, बेलॉडोना जेलसेमियम, युप्याटोरियम, परफॉलीएटम ही औषधे देखील सर्दी खोकला, फ्लू समान रोगांमध्ये चिकित्सेसाठी उपयुक्त्त ठरली आहेत.

(उपरोक्त सर्व औषधे तज्ञ  आयुर्वेदिक , युनानी आणि होमिओपॅथी  डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावीत )

कोविड-१९ पॉझिटिव्ह, अलक्षणिक, चिकित्सालयीन तपासणीनुसार स्थिर असणाऱ्या व इतर वर्तमान गंभीर व्याधीरहित रुग्णांकरिता प्रस्थापित चिकित्सेला पूरक आयुर्वेद व होमिओपॅथी उपचार

आयुर्वेदिक औषधी
१. टॅबलेट आयुष्य ६४ – (५०० मिलिग्रॅम)  दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे किंवा टॅबलेट सुदर्शन घनवटी – २५० मिलिग्रॅम दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे.
२. अगस्त्य हरितकी – ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्यावे.
३. अणुतेल – तीळतेल – दोन थेंब प्रतिदिन सकाळी व संध्याकाळी नाकपुडीत टाकणे.  
४. तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळतेल/ खोबरेलतेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात व नंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चूळ भरावी असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे.
५. गरम पाण्याची वाफ दोनदा किंवा तीनदा घ्यावी.

होमिओपॅथिक औषधी
१.कोविड -१९ समान रोगांच्या लक्षणांच्या चिकीत्सेकरिता नमूद औषधांचा वापर हा प्रस्थापित चिकीत्सेस पूरक चिकित्सा म्हणून केला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व औषधे तज्ञ आयुर्वेदिक व होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावे.

कोविड -१९ या संसर्गजन्य आजाराची लक्षणे जाणविल्यास तात्काळ चाचणी करून घेणे व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक राहील

आईच्या दुधाचे फायदे


बाळाला कधी पाजावे ?
बाळ जन्मल्याबरोबर अर्ध्यातासातच स्तनपान करावे. फक्त सिझेरियन झाले असल्यास आईची भूल उतरल्यावर म्हणजेच चार तासांनी लगेचच स्तनपान करावे. नवजात बालकास रोग होण्याची भीती जास्त असते. बाळ जन्माला येते त्याचवेळी त्याला चोखण्याची क्रिया माहित असते. पहिल्या तसत त्याची चोखण्याची शक्ती जास्त असते. नंतर ती थोडी कमी होते. जन्मानंतर मूल सुमारे पहिला तासभर जागे असते. मग ते झोपी जाते. म्हणून मुलाला जन्मानंतर अर्ध्या तासातच आईने अंगावर पाजावे त्यामुळे गर्भाशय पुन्हा मुळ आकारात यायलाही मदत होते.

बाळ जन्मल्याबरोबर अर्ध्या तासात केलेले स्तनपान म्हणजे बाळाचे पहिले लसीकरण आहे.
चीक घट्ट दुधासारखा असतो. त्याचा रंग लिंबाच्या रंगासारखा पिवळसर हिरवा असतो. दुधामध्ये पहिले तीन ते सहा दिवस हा चीक असतो. चीकातील रोगप्रतिबंधक शक्तीमुळे बाळाचे अनेक रोगांपासून संरक्षण होते. उदा. जुलाब, सर्दी, पडस, खोकला, कान फुटणे, पोलियो, दमा इत्यादी आजारांपासून बाळाचा बचाव होतो. हा चीक पोटात गेल्यामुळे बाळाला शौचास साफ होते आणि पोटातील काळी घाण शौचावाटे आपोआपच बाहेत पडते. चीक जरी घट्ट असला तरी पचायला तो हलका असतो. या चीकामुळे आतड्यात पाचकरस तयार होण्यास मदत होते. चीक व दुधातील अन्न घटक बाळाला पोषक ठरतात. तरीही काही माता तो चीक काढून टाकतात ते चुकीचे आहे. तसेच काही माता तीन दिवस बाळाला पाजातच नाही तेही अगदीच चुकीचं आहे.

आईच्या दुधाचे फायदे कोणते आहेत ?
आईचे दूध हाच बाळाचा सर्वात उत्तम आहार आहे. आईचे दूध निर्जंतुक असते. आईच्या दुधात प्रथिने स्निग्ध पदार्थ तसेच जीवनसत्त्वे, क्षार आणि रोगप्रतिबंधक घटक असतात म्हणूनच आईच्या दुधाची तुलना इतर कुठल्याही दुधाशी होणार नाही. आईचे दूध पचायला हलके असते. बाळाच्या वाढीस जरूर असणारे सर्व पोषक घटक योग्य त्या प्रमाणात असतात. आईच्या दुधाचे तापमान बाळास योग्य असते. मुख्य फायदा म्हणजे स्तनपानामुळे आई व मुलात शारीरिक आणि भावनिक नाते निर्माण होते. त्यामुळे परस्परातील प्रेम वात्सल्य वाढते. आईने रोज स्वच्छ आंघोळ करून स्तनपान वेळेवर करणे गरजेचे आहे. बाळाला स्तनपान दिल्याने त्याच्या चोखण्यामुळे दूध तयार होण्यास मदत होते.

दूध पिऊन झाल्यावर मुले कधी कधी उलटी का करतात ?
बऱ्याचवेळा दुध पिताना हवाही पोटात जाते आणि त्यामुळे धेकाराबरोबर उलटीही होते. त्याकरिता दूध पाजून झाल्यावर बाळाला खांद्यावर घेऊन थोपटावे म्हणजे ढेकाराच्या स्वरुपात हवा निघून जाईल व बाळाला उलटी होणार नाही. जर उलटीमधून दूध किंवा दह्यासारखा पदार्थ पडत असल्यास काळजी करू नये पण बाळ अचानकपणे उलटी करू लागले व उलटी हिरवी पिवळी असल्यास ताप असल्यास मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बाळाला दूध कसे पाजावे ?
दूध पाजण्यापूर्वी हात आणि स्तनांची बोंडे पाण्यानं स्वच्छ करावी. बाळाला पाजताना आईने अवघडून बसू नये. मंदी घालून बसवेल. बाळाचे डोकं वर आपल्या कोपरावर घ्यावे व दुसऱ्या हाताने स्तनाचे बोंड त्याच्या तोंडात दयावे. निजून दूध पाजण्यास हरकत नाही. पण आई व बलाने कुशीवर निजावे. स्तनाचा दाब नाकावर पडल्यास बाळाचा जीव घाबरा होईल. स्तनांची स्वच्छता आईने चांगली ठेवायला हवी. अन्यथा बाळाला व आईला जंतूदोष होऊ शकतो. स्तनांमध्ये गळू झाला असेल तर तिला स्तनांमध्ये दुखू शकते, सूज येते व तापही येत असेल तर डॉक्टरांना  दाखवावं. बाळाला पाजण्याच्या आधी व नंतर स्तन व बोंडे नीट पुसून घ्यायला हवीत.

बाळाला किती वेळा पाजावे ?
बाळास त्याच्या भुकेप्रमाणे पहावे. आईला भरपूर दूध येत असेल तर बाळ पोटभर दूध पिऊन झोपते. स्तनात उरलेलं दूध काढून टाकावं नाहीतर स्तनात गाठ येऊन स्तनास सूज येते व त्यामुळे बाळास दूध पाजण्यास अडथळा येतो. प्रत्येक स्तनातून दहा मिनिटे दूध पाजावे. बाळाची शांत झोप हे पोटभर दुध पिऊन झाल्याचे लक्षण समजावे.

बाळाला किती दिवस अंगावर पाजावे ?
बाळाला जास्तीत जास्त दिवस अंगावर पाजावे. पहिले सहा महिने तर आईचे दूध हेच बाळाचे अन्न व पाणी असते. पण निदान बाळ दिड ते दोन वर्षाचे होईपर्यंत त्याला अंगावर पाजावे. अंगावर पाजणाऱ्या आईने स्वतःच्या आहाराची काळजी घेतली पाहिजे. तिच्या जेवणात पालेभाज्या, दूध,  फळे, मोड आलेली कडधान्ये ह्या गोष्टी असाव्यात. बाळ आनंदी असेल, त्याला शी व्यवस्थित होत असेल व झोपही चांगली येत असेल तर त्याला पुरेसं दूध मिळते असे समजावे.



स्त्रोत : बालसंगोपन, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

Corona information in marathi

कोरोनाच्या भीतीने लोक सैरावैरा गावाकडे पळत सुटले रेल्वे बसेस खचाखच भरून पुण्यामुंबईच्या बाहेर जाताय , काय वेडेपणा आहे. दुर्दैवाने एक जरी कोरोना बाधित आपल्या बस किंवा ट्रेन च्या डब्ब्यात असला तर हा साधा विचारही करत नाहीत का लोक ? ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सुखरूप राहावे किंवा जायचं झाल्यास स्वतःच्या साधनाने जावे हा सुरक्षित पर्याय नाही का ??
आणि तुमचा वानोळा बिचाऱ्या गाव खेड्यातील लोकांना कशाला नेताय ??
ज्यांच्या हातावर शिक्के मारले आहेत ते ट्रेन किंवा बस ने प्रवास करताय यांना कोळदांडा घालून ठेवले पाहिजे . आणि ढुंगण सुजोस्तोवर फटके दिले पाहिजे.  स्वतः सोबत इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या कणिका सारखे बिनडोक आणि परदेश वारी करून आलेले लगेच पार्टीला भुकेले या मूर्खांना  मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल झाले पाहिजे .
इटली चीन यांची उदाहरणे काय सांगताय ?
सातत्याने कोरोना संदर्भात वाचन करून काही गोष्टी समजल्या त्या शेअर करतोय
1 बातम्यांच्या बिनडोक वाहिन्या फक्त तुम्हाला भीती घालवत असतात , उदाहणार्थ एक वाहिनी बातमी चालवत आहे महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक एकाच दिवसात 12 रुग्ण
वास्तविकता ही आहे की 12 पैकी 8 जण बाहेरून परवा आलेत आणि बाधीत आहेत  , 3 जण त्यांचेच नातेवाईक आहेत आणि एक माणसाला संसर्ग झालाय
बातम्या बघा फक्त सरकारचे धोरण समजून घेण्यासाठी. मुख्यमंत्री आरोग्य मंत्र्यांच्या पत्रकार परिषदा बघण्यासाठी
2 व्हाट्सऍप युनिव्हर्सिटी चे विद्यार्थी आणि त्यांचे फॉरवर्ड बहाद्दर तज्ञ यांच्या खरंतर पोटऱ्या झोडल्या पाहिजे कशात काही नाही आणि कडुलिंबाच्या पानाने शेणाने गोमूत्राने कोरोना बरा होतो दारू पिल्याने बरा होतो यांच्या घशात कोरोना सोडला पाहिजे आणि उपाय म्हणून गोमूत्र पाजले पाहिजे
कुठल्याही फॉरवर्ड वर विश्वास ठेवू नका भीती वाटल्यास किंवा काही माहिती हवी असलयास who corona सर्च करा
3 विनाकारण प्रवास टाळा मग ट्रेन असो किंवा बस
4 बाहेरून आलात तर कपडे लगेच धुवायला टाका हात पाय तोंड आणि केस स्वच्छ करा (हेल्मेट तुमच्या आधीच्या सात पिढ्या घातलं नसेलच ). शक्यतो कुठल्याही सर्फेस ला स्पर्श करू नका . उदा. रेलिंग, भिंत , कट्टा . रुमाल एकदा वापरला की लगेच धुवायला टाका . आणि जोपर्यंत हात पाय धूत नाहीत तोपर्यंत तोंडाचा रुमाल वा मास्क काढू नका
5 लहान मुले वृद्ध माणसं यांची विशेष काळजी घ्या . त्यांना घराबाहेर पडू देऊ नका
6 पॅनिक होऊ नाका नाहीतर कोरोना ऐवजी ब्लड प्रेशर किंवा मानस रोगाने ग्रासून जाल . कोरोनाचे एकूण रुग्ण सगल्या वाहिन्या सांगत असतात पण ऍक्टिव्ह रुग्ण त्यापेकशा कमी असतात उदारणार्थ चीन मध्ये फक्त 3000 कोरोनाचे रुग्ण आहेत जेव्हाकी वाहिन्या 80000 दाखवत आहेत
7 घरच्यांसोबत मस्त पत्ते खेळा वाचन करा मुवि बघा आनंदी राहा
8 भरपूर पाणी प्या हेल्दी राहा आजारी पडणार नाही याची काळजी घ्या
9 हात लावून ताप बघू नाका तर थर्मामिटर वापरून बघा आणि 101 F पेक्षा जास्त असेल तर सर्दी खोकला असेल तर आणि खूप डोकं दुखत असेल तर लगेच दवाखान्यात जा

10 डॉक्टरांवर नर्सेस वर विश्वास ठेवा

प्रा महेंद्र शिंदे
*सखी तुझ्यासाठी*  ब्लॉग
iSEARCH माध्यमातून

Animmiya information in marathi

शरीरातील रक्त कमी झाले कसे ओळखाल? रक्तवाढीसाठी काय कराल?

शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असणे ही आता सामान्य समस्या झाली आहे. ही समस्या पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त दिसून येते. जेव्हा रक्ताची कमतरता भासते तेव्हा शरीरात हिमोग्लोबिन कमी असते.
हिमोग्लोबिन हे एक प्रकारचे प्रोटीन आहे त्यामुळे शरीरातील ऑक्सीजनच्या प्रसारणाचे काम पार पडते. त्याच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमिया नावाचा आजार होतो. अ‍ॅनिमियाचे प्रमुख तीन प्रकार आहेत.

1- शरीतरात रक्ताचे प्रमाण कमी असणारा अ‍ॅनिमिया
2- हेमोलायसिस अ‍ॅनिमिया
3- रक्तात पेशींचे प्रमाण कमी असल्याने होणारा अ‍ॅनिमिया

अ‍ॅनिमियाचे कारण

4- लोह्याच्या तत्वाची कमतरता
5- व्हिटॅमिन बी 12ची कमतरता 
6- फोलिक अ‍ॅसिडचे कमी प्रमाण 
7- गरजेपेक्षा जास्त रक्त असल्यानंतरसुध्दा ही समस्या उद्भवते. 8- पोटात इन्फेक्शन झाल्यास
9- धुम्रपान केल्यास
10- रक्ताची कमतरता
11- वृध्दत्व
12- काही औषधांचे अतिसेवन

अ‍ॅनिमियाचे लक्षण
1- जास्त झोप येणे
2- थकवा जाणवणे.
3- अस्वस्थता
4- श्वास घेण्यास त्रास होणे.
5- भिती वाटणे.
6- सर्दीमुळे जास्त संवेदनशिल होणे.
7- पाय आणि हातावर सुज
8- क्रोनिक हार्ट बर्न
9- जास्त घाम येणे

उपाय -
मध
मध अनेक आजारांचे औषध आहे. अ‍ॅनिमियाचे रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर असते. 100 ग्रॅम मधामध्ये 0.42 मिली ग्रॅम आयर्न असते. म्हणून हे खाल्यास रक्ताच्या प्रमाणात वाढ होते.

कसा खावा मध
एका लिंबूच्या रसात एक ग्लास पाणी मिसळा. त्यानंतर एक चमचा मध मिसळा. रोज असे एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरात रक्ताची वाढ होईल.

पालक -
पालकाची भाजी अ‍ॅनिमियासाठी औषधासारखे काम करते. यामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन ए, बी9, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी, फायबर, बीटा केरोटीनचा सामावेश असतो. अर्धा कप उकळलेल्या पालकामध्ये 3.2 मि.ग्रा. आयर्नचा सामावेश असतो. याचे एकदा सेवन केल्यास महिलांच्या शरीरातील 20 टक्के आयर्नची कमतरता पूर्ण करते.

कशी खावी पालकाची भाजी
हिरव्या भाज्यांमध्ये पालक टाकून खावे. सोबतच, सलाडच्या रुपातसुध्दा याचे सेवन केले जाऊ शकते. पालकाला उकळून त्याचे सूप बनवले जाऊ शकते. याचे सूप पिल्यास रक्ताचे प्रमाण वाढते.

बीट
बीटला अ‍ॅनिमियासाठी एक रामबाण उपाय मानले जाते. हे लोह तत्वपूर्ण फळ आहे. बीट हे रक्त पेशींना उर्जी देण्याचे काम करते. रक्त पेशी अ‍ॅक्टीव्ह झाल्यास त्या पूर्ण शरीरात ऑक्सीजन परवण्यास मदत करतात. म्हणून अ‍ॅनिमियामुळे त्रस्त लोकांनी आपल्या रोजच्या डायटमध्ये याचा सामावेश करणे गरजेचे आहे.

कसे खावे बीट
बीटला शिमला मिरची, गाजर, टोमॅटोसारख्या भाज्यांमध्ये मिक्स करून खावे.
याव्यतिरिक्त बीटला सलाडच्या रुपात किंवा ज्यूस तयार करूनसुध्दा खाऊ शकता.

पनीर बटर
पनीर बटर हे प्रोटीनयुक्त असते. म्हणून पनीर बटरचा आपल्या रोजच्या डायटमध्ये सामावेश करण्याचा प्रयत्न करावा. रोज पंचवीस ग्रॅम शेंगादाणे खाल्याससुध्दा अ‍ॅनिमियापासून आराम मिळतो. दोन चमचे पनीर बटरमध्ये 0.6 मिली ग्रॅम आयर्नचा सामावेश असतो.

कसे खावे पनीर बटर
रोज सकाळी ब्रेडवर पनीर बटर लावून खावे. त्यानंतर संत्र्याचे ज्यूस पिल्यास शरीराला आयर्न मिळण्यास मदत होते.
कोणत्याही पदार्थात याचे सेवन केल्यास फायदा होऊ शकतो.

टोमॅटो
टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि लायकोपिनचे प्रमाण आढळून येते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आयर्नला एब्जार्ब करण्याते काम करते. सोबतच, यामध्ये बीटा केरोटीन आणि व्हिटॅमिन ई यांचासुध्दा सामावेश असतो. म्हणून हे शरीरासाठी नॅचरल कंडिशनरचे काम करते.

कसे खावे टोमॅटो
टोमॅटोला सलाडच्या रुपात खाऊ शकता. याव्यतिरिक्त ज्यूस किंवा सूप बनवून त्याचे सेवन करू शकता.
सोयाबीन
सोयाबीन आयर्न आणि व्हिटॅमिनयुक्त असते. याचे सेवन केल्यास लो फॅटसह जास्त प्रमाणात आयर्न मिळण्यास मदत मिळते. म्हणून अ‍ॅनिमिया रुग्णांसाठी खूप लाभदायक आहे.

कसे खावे सोयाबीन
सोयाबीनला रात्री कोमट पाण्यात भिजवावे. त्यानंतर उन्हात वाळवून घ्यावेत.
गहू आणि सोयाबिन एकत्र दळून त्याच्या चपाती तयार कराव्या.
याव्यतिरिक्त सोयाबीनला उकळून त्याचेसुध्दा सेवन करता येऊ शकतो

चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर हिरवी मूग


चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर हिरवी मूग, वजन कमी करण्यासोबत ‘या’ आजारांचा धोका करतात कमी
आपलले शरीर चांगले राहावे यासाठी मोठ्या प्रमाणात पौष्टिक तत्व असणाऱ्या हिरव्या मूग डाळचा आपल्या आहारात वापर करावा. हिरवी मूग डाळ ही आपले वजन कमी करण्यापासून मधुमेहापर्यंतच्या अनेक रोगांचा धोका कमी करते.
आपण संपूर्ण हिरवी मूग डाळ म्हणून खाऊ शकता आणि त्याबरोबर त्याची भाजीही बनवू शकता. बर्‍यापैकी लोक हिरवी मूग डाळ भिजवून त्याला कढईत कांदा आणि हिरव्या मिरचीसोबत बनविल्यानंतर स्नॅक्स म्हणून खातात.
हिरव्या मूगमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. हे आपल्या पाचन तंत्रासाठी एकदम फायदेशीर आहे. हिरव्या मूगमध्ये अँटीफंगल आणि अँटीमाइक्रोबियल हे गुणधर्म असतात. आणि मधुमेह असणाऱ्या रूग्णांसाठी देखील ते खूप फायदेशीर आहे कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात.
बर्‍याच संशोधनात असे दिसून आले आहे की. हिरवा मूग उच्चरक्तदाबाच्या समस्येपासून मुक्तता देते. मूग डाळेत रक्तदाब नियंत्रित करण्याचे गुणधर्म आहे आणि बीपी रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे.हिरवी मूगमध्ये अँटि कॅन्सर आणि अँटी ट्यूमर गुणधर्मदेखील आहेत.
आणि याबरोबरच जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर मूग तुमच्यासाठी एकदम फायदेशीर आहे कारण ते मेटाबॉलिज्म रेट वाढवून वजन कमी करण्यास मदत करतात. तसेच ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यात पोटॅशियम आणि लोहासारखे घटक असतात.
मूग हृदयाचे ठोके नियमित आणि संतुलित ठेवण्यास देखील मदत करते. हिरवा मूग एक कमी ग्लाइसेमिक इंडेक्स फूड आहे. याचा अर्थ असा की मूग खाल्ल्याने शरीरात इन्सुलिन, रक्तातील साखर आणि चरबीची पातळी कमी होते. ज्यामुळे आपली रक्ताभिसरण पातळी सुधारते.
Copied from houdeviral.in

importance of water in diet

डाएट डायरी : पाणी माहात्म्य!

गायत्री बर्वे-गोखले
कधी कधी आपल्याला अवेळी खूप जांभया येतात, कधी विनाकारण चिडचिड होते. कधी कधी बारीक डोकं दुखतं, कसं तरीच होतंय असं आपण म्हणतो. याचं कारण दुसरं तिसरं काही नसून आपल्या मेंदूतील पेशींना होणारा ऑक्सिजनपुरवठा कमी झालेला असतो. अशा वेळी शांत बसून ग्लासभर, वाटल्यास अधिक पाणी प्यायल्यास आपल्याला थोडय़ाच वेळात बरं वाटल्याचं जाणवेल.
गेल्या आठवडय़ात माझी मैत्रीण भेटली जी खूप अशक्त दिसत होती, कारण विचारल्यावर म्हणाली की सिव्हियर डिहायड्रेशनमुळे हॉस्पिटलला अ‍ॅडमिट करावं लागलं होतं. डिहायड्रेशनमुळे चक्क तीन दिवस हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्हावं लागणं यावरून आपल्या शरीराला पाण्याची किती गरज आहे हे लक्षात येऊ  शकतं. डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याची आणि त्याबरोबर स्वाभाविकच इतर इलेक्ट्रोलाइट्सची पातळी अतिशय कमी होणे. असं होण्यामागची कारणं अनेक आहेत, पण मुद्दा हा आहे की, शरीराला पाणी / द्रव पदार्थाची नितांत गरज आहे त्याशिवाय आपलं शरीर कोणत्याही क्रिया करू शकत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे.
पाण्यामुळे आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित केलं जातं. आपल्या शरीरातील अनावश्यक पदार्थ उत्सर्जित केले जातात, ज्यामुळे आपण होणाऱ्या इन्फेक्शन्स्पासून दूर राहतो. आपल्या सांध्यांमध्ये नीट हालचाल होण्यासाठी पाण्याची गरज असते. पाणी प्यायल्यामुळे आपण उत्साही राहतो. श्वसन, उत्सर्जन आणि व्यायाम करताना शरीरातील पाणी कमी होते याशिवाय काही इन्फेक्शनमुळे जेव्हा डायरियासारखे आजार होतात अशा वेळीसुद्धा पाण्याची पातळी कमी होऊन डिहायड्रेशन होते. डोकेदुखी, सतत दमल्यासारखे वाटणे, झोप न येणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, चिडचिड होणे हीसुद्धा डिहायड्रेशन झाल्याची लक्षणे आहेत. ती ओळखून योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.
प्रत्येक व्यक्तीने सरासरी अडीच ते तीन लिटर पाणी (किंवा चार ते पाच लिटर द्रव पदार्थ म्हणजेच पाणी आणि इतर अन्नातील द्रव पदार्थ) पिणे गरजेचे आहे. इतर द्रव पदार्थ म्हणजेच आपण रोज पीत असलेले चहा, कॉफी, दूध, ताक, सरबत, सुप्स, फळांचे आणि भाज्यांचे ज्यूस आणि इतर पेय पदार्थ.
आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींच्या आतमध्ये आणि दोन पेशींच्या मधल्या जागेत द्रव पदार्थ असतो ज्यासाठी पाण्याची गरज असते. याच पाण्यातून पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. कधी कधी आपल्याला अवेळी खूप जांभया येतात, कधी विनाकारण चिडचिड होते. कधी कधी बारीक डोकं दुखतं, कसंतरीच होतंय असं आपण म्हणतो. याचं कारण दुसरं तिसरं काही नसून आपल्या मेंदूतील पेशींना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झालेला असतो. अशा वेळी शांत बसून ग्लासभर, वाटल्यास अधिक पाणी प्यायल्यास आपल्याला थोडय़ाच वेळात बरं वाटल्याचं जाणवेल. ज्या वेळी अवेळी भूक लागलीये असं वाटतं अशा वेळी आपण कधी कधी लागलेली तहान आणि भूक यामध्ये गल्लत करतो. म्हणून भूक लागलीये असं वाटलं की, आधी एक ग्लास पाणी प्यावं, त्यांनंतरसुद्धा वाटलं तर मग काही तरी खावं. याचप्रमाणे जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्यावं. जेवताना पाणी पिऊ  नये, जेवणाच्या आधी अर्धा तास व जेवल्यानंतर एक तास पाणी पिणे चांगले. यामुळे अन्नपचन नीट होण्यास मदत होईल.
याशिवाय कोणकोणते द्रव पदार्थ आपण सेवन करू शकतो आणि ते शरीरास कसा फायदा-तोटा करतात हे पाहू.
सॉफ्ट ड्रिंक्स / काबरेनेटेड बेव्हरेजेस :
बाजारात असंख्य प्रकारची सोडा असलेली ड्रिंक्स मिळतात, जी लहान मुलं आणि मोठे अगदी चवीने पितात. कधी तरी अशी पेय पिणे हानिकारक नसले तरी सतत या ड्रिंक्सचा वापर टाळावा. यात फारशी काहीही पोषक तत्त्वे नसून मोठय़ा प्रमाणात साखर आणि कार्बनडाय ऑक्साईड असतो जो शरीरास चांगला नाही. याशिवाय यात असलेले कृत्रिम रंग आणि प्रिझव्‍‌र्हेटिव्हज् घातक ठरू शकतात. लहान मुलांमध्ये ओबेसिटी वाढण्याचं मुख्य कारण अशी ड्रिंक्स सतत पिणं हे आहे.
चहा / कॉफी : चहा-कॉफीमध्ये असलेल्या कॅफेनमुळे मेंदूला तरतरी येते. दिवसातून दोन वेळा चहा कॉफी घेण्यास हरकत नाही, पण त्याहून अधिक कॅफेन पोटात गेल्यास झोप न लागणे, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. ग्रीन टी हा चहा-कॉफीला एक चांगला पर्याय ठरू शकतो. यात साखर नसल्याने कमी कॅ लरीज पोटात जातात. यातील फ्लेवनोइड्स आणि अँटीऑक्सिडन्ट्स शरीरातील पेशींचं ऑक्सिडेशन होण्यापासून रोखतात आणि मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करतात.
दूध / ताक : लाखो वर्षांपासून दूध हे आपल्या अन्नाचा अविभाज्य घटक आहे. पण नवीन आलेल्या ‘वेगन’ होण्याच्या ट्रेण्डमुळे अनेकांनी डेअरी प्रॉडक्ट्स घेणं बंद केल्याचं आपण पाहतो. खरंतर दूध / ताक हे शाकाहारी लोकांच्या जेवणातील प्रोटिन्सचा एक मुख्य स्रोत आहे. याउपर सुरू असलेल्या ए १ आणि ए २ मिल्कच्या वादात सामान्य व्यक्तीला नक्की कोणतं दूध प्यावं याचा संभ्रम पडलेला दिसतो. ए २ मिल्कबद्दल विस्तृतपणे पुन्हा कधी तरी लिहीनच, पण रोजच्या वापरात उकळून साय काढलेले गाईचे दूध किंवा टोण्ड / डबल टोण्ड   मिल्क हे कमी फॅट कन्टेन्टमुळे वापरास योग्य आहे. तसेच दह्यापेक्षा पातळ ताक हे पचायला हलके असल्याने त्याचासुद्धा आहारात समावेश आवश्यक आहे. उन्हाळ्यात पातळ ताकात चिमूटभर हिंग आणि जिरे पावडर घालून प्यायल्यास गॅसेस, अ‍ॅसिडिटीचा त्रास टाळता येईल, पण मीठ घालून ताक पिणे मात्र टाळावे.
सीझनल पेय : ऋतुमानाप्रमाणे आपल्याकडे अनेक पेय बनवली आणि प्यायली जातात. उन्हाळ्यात लिंबू सरबत, कोकम सरबत, आवळा सरबत, नारळ पाणी, कैरीचे पन्हे ही उष्णता कमी करणारी, पित्तशामक आणि अँटीऑक्सिडंन्ट्सनी भरपूर अशी पेय आहेत. ज्यात साखर असली तरी कोणतेही कृत्रिम रंग, प्रिझव्‍‌र्हेटिव्हज् वापरले जात नाहीत. याशिवाय यात मोठय़ा प्रमाणात व्हिटामिन सी असल्याने ते शरीरासाठी उत्तम आहे.
डिटॉक्स / इंफ्युज्ड वॉटर :
हल्ली आपण पाहतो की, अनेक जण भाज्या-फळांचे तुकडे घातलेले हे इन्फ्युजड वॉटर पिताना दिसतात. असे पाणी पिण्यात काहीच गैर नाही. यातून सगळी इसेन्शियल मिनरल्स पोटात जाण्यास मदत होईल. परंतु आधी म्हटल्याप्रमाणे आपला दिवसभरातील फळे आणि भाज्यांचा इनटेक माफक असल्यास असे पाणी पिण्याची गरज नाही. ही व्हिटामिन्स आणि मिनरल्स वॉटर सोल्युबल असतात. ती अधिक प्रमाणात घेतल्यास शरीराला आवश्यक तेवढी शोषली जाऊन उरलेली शरीराबाहेर फेकली जातात. त्यामुळे त्यांचा अतिरेक करण्यात काहीच फायदा नाही.
एकंदरीत भरपूर पाणी प्यायल्याने आपला मूड चांगला राहतो आणि आपण उत्साही राहतो. त्यामुळे कधीही चिडचिड होतेय असं वाटल्यास आधी एक ग्लास पाणी प्यावे मगच पुढील काम करावे. काही विशिष्ट आजार जसे किडनी किंवा लिव्हरचे आजार असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्याने योग्य तेवढय़ाच पाण्याचे सेवन करावे. कोणतेही आजार नसलेल्या व्यक्तींनी ठरावीक वेळाने पाणी प्यायची सवय लावून घ्यायला हवी. ऑफिसमध्ये एसीमध्ये बसलेले असताना नकळत शरीरातील पाणी कमी होत असते, परंतु थंड हवेत ते जाणवत नाही, तहान लागत नाही. अशा वेळी हल्ली उपलब्ध असलेल्या अनेक अ‍ॅप्सचा वापर करून पाणी पिण्यासाठी रिमाइंडर लावून योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन केले जाऊ  शकते. कामाच्या जागी पाण्याने भरलेली बाटली समोर ठेवावी ज्यामुळे कामात असताना उठावे लागणार नाही. पाणी पिण्याबरोबरच दिवसेंदिवस आपण फेस करत असलेल्या पाण्याच्या टंचाईचा विचार करून कमीत कमी पाणी वाया घालवणेसुद्धा आवश्यक आहे. उदा. हॉटेलमध्ये जेवताना हवे तेवढेच पाणी मागून घेणे. पुढच्या पिढीला अधिक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू नये यासाठी आपण सर्वानी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. शेवटी पाणी हे जीवन आहे आणि पाण्याशिवाय जगणं मुश्कील आहे. म्हणून आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या पर्यावरणाची काळजी घेणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.
सुप्स, फळांचे ज्यूस आणि भाज्यांचे रस
सुप करून पिण्याची आपली संस्कृती नसली तरी अधून मधून घरी तयार के लेली भाज्यांची सुप्स प्यायला हवीत. यातून मिळणारे मिनरल्स आणि फायबर हे सुंदर त्वचा, केस यासाठीसुद्धा आवश्यक आहे.
भाज्यांचे रस पिण्याचा ट्रेण्ड सध्या ‘इन’ आहे. आपल्या रोजच्या जेवणात आपण दोन वेळा भाजी आणि कोशिंबीर / सॅलड खात असू तर अशा रसांची आपल्याला विशेष आवश्यकता नाही. त्यातही हे रस जर गाळून प्यायले जात असतील तर त्यातील फायबर फेकलं जात असल्याने त्यांचा म्हणावा तसा काहीच उपयोग शरीराला होणार नाही. हेच झालं फळांच्या बाबतीत. फळांमध्ये बऱ्याच प्रमाणात पाणी असते. कलिंगड, टरबूज, द्राक्ष या फळांमध्ये तर जवळजवळ ७० टक्के पाणी आहे. त्यामुळे ही फळे खाल्यास आपोआपच शरीराला पाणी मिळते. एक ग्लास संत्र्याचा ज्यूस बनवायला कमीत कमी ५ ते ६ संत्री लागतात, पण संत्री खायची झाली तर एका वेळी आपण दोन संत्र्याच्या वर खाऊ  शकत नाही. याचं कारण संत्र खाताना त्यात असलेलं फायबर पोटात जाऊन ते आपल्याला पोट भरल्याची जाणीव करून देतं पण ज्यूस काढताना सगळं फायबर फेकलं गेल्याने कितीही ज्यूस प्यायला तरी भूक भागत नाही. शिवाय त्यात असलेली अनावश्यक साखर पोटात जाते. डायबेटीस आणि ओबेसिटी होण्यामागच्या कारणांमध्ये सतत ज्यूस पिणे हे एक प्रमुख कारण आहे. तेव्हा जास्तीत जास्त फळं खावीत आणि भाज्यांचे ज्यूस प्यायचे झाल्यास ते न गाळता प्यावेत.
viva@expressindia.com

सम विषम तिथीला संग, मुलगा की मुलगी आणि विज्ञान



सध्या हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर त्यांच्या वादग्रस्त विधानाने चर्चेत आहेत . सम तिथीला संभोग केल्यास मुलगी आणि विषम तिथीला संभोग केल्याने मुलगा . निवृत्ती महाराज एक कीर्तनकार प्रबोधनकार म्हणून निश्चितच आदरणीय आहे पण त्यांच्या वरील वाक्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही .  कीर्तनकार म्हणून महाराजांचा आदर जरूर करा पण चुकीच्या गोष्टींना समर्थन कृपया करून करू नका .  आयुर्वेद महान आहे पण म्हणतेतही काही कमतरता असतेच ना ? आयुर्वेद हे शास्त्र आहे आणि शास्त्र कधीच परिपूर्ण नसते ते प्रत्येकवेळी दुरुस्त होत जाते . आपण आधुनिक भाषेत त्याला रिसर्च म्हणतो तो झालाच नाही तर शास्त्र निरुपयोगी होऊन जाते कालबाह्य होते हे ध्यानात घ्या .
आयुर्वेद म्हणाल तर कित्येक गोष्टी या आयुर्वेदात दिलेल्या विज्ञानाने सिद्ध केले आहे की चुकीच्या आहेत . जुने बरोबर असेल ते ठेवा चुकीचे असेल तर दुरुस्त करा असे विज्ञान सांगते .
1. मुळात ज्या तिथीला संभोग झाला त्या तिथीला स्त्रीबीज बाहेर पडले असेलच असे नसते .
2. असंख्य शुक्राणू वेगाने गर्भाशयाच्या दिशेने सरकतात आणि त्यातील सर्वात प्रथम ज्याचे मिलन होते त्यानुसार गर्भधारणा होते
3. संतती कशी निपजेल हे तर सर्वस्वी घरातील वातावरण मुलाची सांगत यावर अवलंबून आहे .
4. मुलगा व्हावा यासाठी कुठलाही मंत्र तंत्र उपचार अस्तित्वात नाही आणि तो करूही नये
5. मुलगा आणि मुलगी दोघेही निसर्गाने दिलेले तुमच्या प्रेमाचे मूर्त रूप आहे त्याचा आनंदाने स्वीकार करावा
6. ज्यांना अपत्य नाही त्यांना विचारा मुलगा की मुलगी .
7. वंशाला दिवाच पाहिजे हा 18 व्या शतकातला विचार सोडा , कितीतरी मुलींनी आपल्या वडिलांच्या किर्तीध्वजाची काठी उत्तुंग शिखरी नेली आहे
8. असा विचार करण्याआधी आपली आई आठवा बहीण आठवा  बायको आठवा त्यांच्याशिवाय तुमचे जीवन परिपूर्ण आहे का ?
9. इंदुरीकर महाराजांच्याच भाषेत सांगतो खुळ्याहो लोटांगण घालतो पण वंशाला दिवाच पाहिजे हा हट्ट सोडा . आजकाल दिवे काय दिवे लावताय हे महाराज स्वतःच सांगतात . कधीतरी देवघरातील समयी साठी सुद्धा परमेश्वराकडे प्रार्थना करा

कुठल्याही कीर्तनकार महाराजांवर टीका करण्याची माझी पात्रता नाही पण जे विज्ञाननिष्ठ मनाला पटले नाही त्याचे समर्थनही माझ्याकडून होणार नाही

जय जिजाऊ जय अहिल्यादेवी जय सावित्रीमाई जय रमाई 

आयुर्वेद व सौंदर्य

आयुर्वेद व सौंदर्य

सौंदर्य म्हणजे सुन्दरता .सुंदरतेचा भाव म्हणजे सौंदर्य. सौंदर्यामुळे शरीराला व मनाला सुख व आनंद होतो .

   असे हे सौंदर्य  , शरीराचे आणि मनाचे असे दोन्ही प्रकारचे असावे लागते . केवळ दिसावयास सुंदर असणे ,

 एवढयाने  सौंदर्य प्राप्त होत नाही तर गीतेत सांगितल्याप्रमाणे योग्य आहारविहार किंवा वागणूक ही सौंदर्य प्राप्त

करून देणारी मुख्य साधने आहेत . आयुर्वेदात स्वस्थ किंवा सुस्थितीत असलेल्या व्यक्तीसच  सुंदर म्हटले आहे

व ही सुंदरता किंवा सौंदर्य प्राप्त होण्यासाठी शरीराचे मूळ घटक दोष (वात,पित्त ,कफ), धातु (रसादि) व

मळ( स्वेद , मूत्र, मल ,आदि) या घटकांचे योग्य तऱ्हेने परिवर्तन पोषण करणारा अग्नी या सर्वांची योग्य  सातत्याने

होत राहणे व ते सुस्थितीत असणे तसेच त्या व्यक्तीचे मन ,आत्मा आणि सर्व बुद्धीं द्रिये व कर्मेंद्रिये प्रसन्न असणे

 आवश्यक आहे .  यामुळेच व्यक्तीचे सौंदर्य खुलते व वाढते .

     शरीराचे सौंदर्य म्हणजे केवळ गोरेकाय शरीर असणे हे नव्हे तर शरीराचे सर्व अवयव रेखीव असणे .

शरीराचा एकूण बांधा सुडौल असणे (समसुविभक्त )हे फार महत्त्वाचे आहे.

     मनाच्या दृष्टीने व्यक्तीचे सौंदर्य हे सत्व वृत्तीचे किंवा प्रकृतीचे मन असणे, हे सौंदर्य वाढविते .

सतत आनंदी, हसतमुख असणे , सुखदुःख ला सहजपणे सामोरे जाणे ,(लोभेषांरागमत्सयादि ) राग  ,

लोभ ,मत्सर नसणे .प्रियवादीत्व ,सहिष्णुत्व,पावित्र स्मृतीवान  वगैरे असणे. या मानसिक सौंदर्य खुलविणारी

गोष्टी आहेत .अशा तऱ्हेने शारीर - सौंदर्य असणारी व्यक्ती ही उत्तमोत्तम सौंदर्य असणारी समजली जाते .

   शरीराचा हा व्यापक विचार लक्षात घेतल्यावर सौंदर्य राखण्यासाठी प्रत्येक स्त्री-पुरुषाने नित्य

नियमाने काळजी घेतली पाहिजे. ही काळजी घेताना आपल्या शरीराचे सर्वसामान्य आरोग्य राखणे

याबरोबरच खास करून सातत्याने केश, स्वतःचा चेहरा, डोळे ,दात  स्तन , नखे वगैरेची निगा राखणे व

खुलून दिसणे अगर सुंदर दिसणे याबाबत सतत जागरूक राहणे आवश्यक आहे .यायोगेच प्रत्येकाला सौंदर्य

प्राप्त होईल व त्यायोगे स्वतःला तसेच सभोवतालच्या

व्यक्तीलाही सुखकर व आनंददायी असे होईल .

      आयुर्वेद शास्त्राचे मुख्य ध्येय स्वस्थत्स स्वास्थरक्षणम् ।  हे सांगितले आहे या स्वास्थ्यरक्षणासाठी

शरीराचे आरोग्य कशाप्रकारे उत्तम राखता येईल याचे वर्णन केलेले आहे .अशा तऱ्हेने शरीराचे पर्यायाने

शरीर अवयवांचे स्वास्थ राखताना त्यांचे सौंदर्य कसे वाढेल व कसे टिकेल याचे मार्गदर्शन या आयुर्वेद

ग्रंथातून सापडते .नाक डोळे इत्यादी अवयव हे चांगले व सौंदर्यपूर्ण असणे हे आपल्या हातात नसते .

पण ते आरोग्यपूर्ण राखणे हे मात्र सर्वस्वी आपल्याच हातात असते .त्यामध्ये शरीराची त्वचा ही अत्यंत

महत्त्वाची .आपण त्वचेचा विचार करताना चेहर्‍याच्या त्वचेचा विचार अधिक करतो परंतु सार्वदेहिक

त्वचाही विचारात घेतली पाहिजे .आपल्या सर्व शरीरात मज्जेचा स्नेह सर्व त्वचेवर असतो .हा मज्जेचा स्नेह

आपण अनेक प्रकारचे साबण ,शाम्पू , क्रीम वगैरे वापरून घालवितो .त्यामुळे त्वचेला जास्त रुक्षता येते .

परंतु प्राचीन ऋषींनी आपल्याला या आयुर्वेदशास्त्र द्वारा त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी अनेक औषधी सांगितल्या

आहेत तसेच काही नियमही सांगितले आहेत. रोज शरीरास तेलाचा अभ्यंग करावा त्यात सुद्धा विशेष करून

डोके ,कान आणि पाय (तळपाय )ह्यांना विशेष . त्यामुळे दृष्टी स्वच्छ होते ,त्वचा सुकुमार होते व शरीर कणखर

 होते. याशिवाय अभ्यंगाने झोपही व्यवस्थित होते .पूर्वी स्नान करण्याआधी अंगाला नेहमी उटणे लावण्याची

पद्धत होती.  उटणे लावल्याने कांती  तेजस्वी होते आणि शरीरातील मेदही त्याने झडतो .

        अशाच प्रकारचे स्नानाचे गुणही त्वचेच्या दृष्टीने फारच उपयुक्त असतात . डोक्यावरून स्नान करताना

कधीही फार गरम पाणी वापरू नये त्यांनी डोळ्यास इजा पोहोचते .अशा तऱ्हेने दिनचर्या मध्ये रोज कसे

वागावे हे सांगितले आहे आणि निरोगी राहण्यासाठी या दिनचर्येला अतिशय महत्त्व असून पर्यायाने निरोगी

शरीर असणे हेच सौंदर्याचे मूळ आहे. निरोगी शरीर असेल तर त्या मानसाची त्वचा ही तेजस्वी सुकुमार

आपोआप दिसते .

 रषोघ्न  द्रव्यांमध्ये वेखंड हे मौल्यवान औषध असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे त्वचेचे रक्षण करते .

हल्लीच्या ब्युटीपार्लरमध्ये सध्या जे हर्बल पँक ( फेशियल साठी) वापरतात ते फार पूर्वीपासून या शास्त्रात

 सांगितले आहे उदाहरणार्थ अनंता , मंजिष्ठा , हरिद्रा ,चंदन ,कमळ, ज्येष्ठमध , दूर्वा , विदारीकंद या वनस्पतीचे

वर्णन केवळ वर्ण्य द्रव्य म्हणून केलेले आहे . आयुर्वेद शास्त्रात त्यासाठी घरच्या घरी करण्यासारखे उपचार

सांगितलेले आहेत . त्यामध्ये

१)रक्तचंदन

२)जायफळ

३) मिरी

४)चंदन

५)मसूरडाळ

    या द्रव्यांचा लेप तोंडावरील मुरूमे नाहीशी करतो.

 त्वचेनंतर आवडता विषय म्हणजे केस .आता केसांचे विकार कोणते ते पाहू .१)केस गळणे ,२)केस पिकणे,

३)कोंडा होणे, ४)चाई पडणे इत्यादी विकार आपणास व्यवहारात रोज पाहण्यात येतात. त्यांचे कारण म्हणजे

हाडातील शक्ती कमी होते. मीठ जास्त खाल्ल्याने सुद्धा केस पिकतात खूप घाम येतो, आजारपणाने ,स्थूल

प्रकृतीने ,मानसिक कारणाने त्याशिवाय आम्लपित्त जास्त असणे ,जास्त विचार करणे ,मासिक पाळीच्या

तक्रारी असणे ,कृत्रिम सेंट ,तेल लावणे इत्यादी कारणे घडतात केसांच्या रक्षणासाठी शिकेकाई, रिठे ,

गव्हळा ,कचोरा ,मुस्ता, आवळकाठी इत्यादी द्रव्ये सांगितली  आहेत .







डॉ. ज्योती गणेश पवार  
आयुर्मंत्रा हेल्थ क्लिनिक स्त्रीरोग ,
त्वचा व केस तज्ञ ,
शिवगणेश चौक, 
पिंपळे गुरव ,पुणे ६१






लहान मुलांमधील नैराश्य

लहान मुलांनी निराश होणं  किंवा चिडचिड करणं ,  वेळोवेळी वाईट मूड मध्ये  राहणे अगदी सामान्य आहे. परंतु जेव्हा नकारात्मक भावना आणि नकारात्मक
 विचार बराच काळ टिकून राहतात आणि मुलाची नैसर्गिक पणे खेळण्याची अभ्यास करण्याची किंवा दैनंदिन कामं  करण्याची क्षमता मर्यादित होते कमी होते तेव्हा ते  नैराश्य असू शकते.

डिप्रेशन  हा एक प्रकारचा मूड डिसऑर्डर आहे. जेव्हा मुले दुःखी,किंवा   निराश आठवडे, महिने किंवा त्याहूनही अधिक काळ असतात तेव्हा ही  चिन्हे गंभीर असतात , सतत स्वतःला कमी लेखने
उदास वाटणे , एकाग्रता नसने , झोप  आणि भूक सतत डिस्टर्ब् होणं . शाळेत मन रमत नाही , थकल्यासारखे वाटेल,  मित्र किंवा कुटूंबापासून दूर जावे.हे सुद्धा काही प्रारंभिक लक्षणे आहेत .

जेव्हा मुल नैराश्यात असतात , तेव्हा ते त्यांच्या आवडीच्या गोष्टी करत असतांना सुद्धा त्या त्यांना कठीण जाचक  वाटू शकतात  . डिप्रेशन मुले मुलांना आपण कुठल्याच कामाचे नाही अगदीच नालायक आहोत ,आपल्यावर कुणीही प्रेम करत नाही असे वाटू शकते वाटते. यामुळे दिन्चार्येही  कठीण वाटू शकते . जेव्हा नैराश्य तीव्र होते, तेव्हा यामुळे मुलांना स्वत: ला हानी पोहचविण्याचा किंवा आत्महत्येचा विचार येऊ शकतो  अश्या वेळेस त्याला
पाठिंबा द्या आणि आपल्या मुलाबद्दल आपल्या प्रेमाची आणि काळजीने  आपुलकीच्या  स्नेहाच्या  भावनेने जवळ घ्या . विश्वास द्या कि आम्ही आहोत ना , काळजीचे करू नकोस

डिप्रेशन ओळखणे
जेव्हा मूल उदास असते तेव्हा पालक आणि इतर लोकांना हे कळणे कठीण असते. मुलं  अचानक चिडचिडे बनली   किंवा रागीट बनली  , सतत  मूड  बदलतोय  , तुमच्या विषयी किंवा एकंदर वडीलधाऱ्या मंडळींबद्दल  अनादर करतोय . कुठल्याच गोष्टींत  उत्साह  आणि इंटरेस्ट  नसणे , एकलकोंडा बनणे  पालक आणि मुले ( किशोरवयीन) यांना हे लक्षातही  येऊ शकत नाही की ही नैराश्याची चिन्हे असतील . डिप्रेशन वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त होतं

डिप्रेशन आणि इतर मूड डिसऑर्डरचे निदान

डिप्रेशन आणि मूड डिसऑर्डरचे निदान करताना, डॉक्टर किंवा समुपदेशक  वेगवेगळ्या प्रकारांचा वापर करतात.

मेजर डिप्रेशन : दीर्घकाळ उदास मनःस्थिती ही डिप्रेशन अवस्था कमीतकमी 2 आठवडे टिकली कि म्हटली जाते . कुणा जवळच्या व्यक्तीच्या अचानक  जाण्याने , प्रेमभंग , व्यावसायिक तोटा किंवा आजारपण यामुळे मेजर डिप्रेशन येतं
.
क्रॉनिक डिप्रेशन  (ज्याला डायस्टिमिया देखील म्हणतात) स्लो डिप्रेशन आहे जी हळूहळू विकसित होते आणि 2 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ टिकते . याची करणे मुख्यत्वेकरून अनुवांशिक असतात

ऋतुपरत्वे बदलणारं डिप्रेशन :  डिसऑर्डर एक प्रकारचा डिप्रेशन आहे  जो ऋतुमानाशी संबंधित आहे . प्रकाश किती आहे याच्याशी संबंधित आहे. जेव्हा दिवसाचे तास लहान असतात तेव्हा हे विकसित होते; उदाहरणार्थ, हिवाळ्यातील महिन्यांमध्ये.

डिस्ट्रपटिव्ह मूड  डिसऑर्डर आक्रमकता आणि रागाचा उद्रेक नेहमी चिडचिड  अशी मनःस्थिती 6 वर्षांपेक्षा मोठ्या मुलामध्ये कमीतकमी एक वर्ष टिकली कि म्हटली जाते
.

योग्य लक्ष आणि काळजी घेऊन डिप्रेशन आणि इतर मूड डिसऑर्डर चांगले होऊ शकतात. परंतु त्यांच्यावर योग्य वेळी  उपचार न केल्यास समस्या कायम राहू शकतात किंवा आणखी वाईट होऊ शकतात.

जर आपल्याला असे वाटले  की आपल्या मुलास डिप्रेशन  असेल किंवा मूडची समस्या आहे तर :

आपल्या मुलाशी डिप्रेशन आणि मनःस्थितीबद्दल बोला. मुले कदाचित दुर्लक्ष करतात,लपवतात  किंवा बऱ्याचदा लक्षातही येत नाही त्यांच्या ..  त्यांच्याशी तरीही बोला. ऐका, आपला आधार द्या आणि प्रेम द्या .
आवश्यकता असल्यास डॉक्टर ला भेट द्या
. डॉक्टर कदाचित संपूर्ण शारीरिक तपासणी करतील . डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या मुलाच्या  आरोग्याच्या तपासणी करून घ्या  जर डॉक्टरांना असे वाटले की आपल्या मुलाला डिप्रेशन किंवा तत्सम मूड डिसऑर्डर आहे, तर तो आपल्याला  उपचारांसाठी एखाद्या तज्ञाकडे पाठवू शकता .

मनोविकार तज्ज्ञांशी संपर्क साधा. डिप्रेशन रिकव्हर होऊ शकते. परंतु मदतीशिवाय हे दीर्घकाळ टिकू शकते किंवा आणखी वाईट होऊ शकते.  मनोचिकित्सक किंवा मानसशास्त्रज्ञ आपल्या मुलाचे मूल्यांकन करू शकतात आणि उपचारांची शिफारस करतात. मनोविकार तज्ज्ञांकडे जावं लागलं म्हणजे वेड लागलं तरच जावं लागतं हा ग्रह मनातून काढा . मुलांच्याही मनातून काढा . कुठल्याही माणसाला आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर मानवोपचार तज्ज्ञाची आवश्यकता असते . खेळाडूंच्या फिजिओ च्या टीम सोबत कायम एक मानसोपचार तज्ज्ञ असतो . कुणाला वेड लागलं तर म्हणून नाही तर त्यांच्या मनस्थितीची काळजी घेण्यासाठी .

पालक समुपदेशन देखील बर्‍याचदा उपचारांचा एक भाग असतो. हे निराशेने ग्रस्त असलेल्या मुलाला किंवा किशोरवयीन मुलाला पालक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतात

मदत करण्याचे आणखी मार्ग


आपल्या मुलास पौष्टिक पदार्थ खातात, पुरेशी झोप मिळेल आणि दररोज शारीरिक व्यायाम मिळेल मिळेल असे बघा . याचा मूडवर सकारात्मक परिणाम होतो.

एकत्र वेळ घालवा . दोघे आनंद घेऊ शकता अशा गोष्टी करण्यात आपल्या मुलासह वेळ घालवा. फिरायला जा, एखादा खेळ खेळा, स्वयंपाक करा, हस्तकला बनवा, एक मजेदार चित्रपट पहा. सकारात्मक भावना आणि मनःस्थितीला हळूहळू प्रोत्साहित करा (जसे की आनंद, विश्रांती, करमणूक आणि आनंद) हळूहळू डिप्रेशन चा एक भाग असलेल्या निराश मनोवृत्तीवर मात करण्यात मदत करू शकते.


डॉ योगिनी सावंत 

healthy recipes for kids

शाळेत जाणाऱ्या मुलांच्या आईंना पडणारा नेहमीचा प्रश्न म्हणजे डब्यात काय देऊ? जेणेकरून मुलं पौष्टिक खातील आणि डबा पूर्ण खाल्ला जाईल. अशाच काही पाककृती मी खाली सांगत आहे ज्या माझ्या ३ वर्षांच्या मुलाला खूपच आवडतात. ज्यातून मी त्याला जास्तीत जास्त पौष्टिक खाऊ घालण्याचा प्रयत्न करते.



 १. मँगो शिरा



साहित्य: रवा १ वाटी, तूप अर्धी वाटी, साखर अर्धी  वाटी, मँगो पल्प अर्धी वाटी, दूध व पाणी यांचे समप्रमाणात मिश्रण १ वाटी, बदाम, काजू, पिस्ते, अक्रोड यांची बारीक पूड, वेलची पावडर.



कृती: जाड बुडाच्या पातेल्यात / कढईत तूप गरम करुन त्यावर रवा खमंग भाजून घ्यावा. त्यावर हळूहळू गरम दूध घालावे आणि रवा परतून घ्यावा. रवा छान फुलतो. ५ मिनिट झाकण ठेवून रवा चांगला शिजू द्यावा.

        यात अर्धी वाटी मँगो पल्प आणि साखर घालून परतावे. वरून ड्रायफ्रुट्सची पूड आणि वेलची पावडर घालून परतावे. असा हा मँगो शिरा चवीला खूपच सुरेख लागतो.

(मुलांना ड्रायफ्रुट्सचे काप आवडत असतील तर पावडर न करता काप घातले तरी चालतील.)



२. मिश्र पिठाचे धपाटे



भाजणीच्या थालिपीठाप्रमाणे निरनिराळी पीठे वापरून बनवलेले धपाटे देखील छान लागतात आणि पौष्टिक असतात.



साहित्य: गव्हाचे पीठ १ वाटी, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणीचे पीठ प्रत्येकी अर्धी वाटी, बेसन पाव वाटी, किसलेले गाजर अर्धी वाटी, किसलेले बीट व दुधी प्रत्येकी पाव वाटी, बारीक चिरलेली मेथी व कोथिंबीर प्रत्येकी पाव वाटी, बारीक चिरलेला कांदा १, आले-लसूण पेस्ट १ मोठा चमचा, हिंग १ छोटा चमचा, धणे-जिरेपूड १ छोटा चमचा, चवीप्रमाणे लाल तिखट आणि मीठ, तूप.



कृती: गाजर, बीट, दुधी, मेथी, कोथिंबीर, कांदा सगळे एकत्र करून घ्यावे. त्यात सर्व पीठे घालावीत. हिंग, आले-लसूण पेस्ट, धणे-जिरेपूड, लाल तिखट व मीठ घालून, गरजेनुसार पाणी घालून साधारण घट्टसर मळून घ्यावे.

       याचे छोटे गोळे बनवून लाटून घ्यावेत किंवा कापडावर थापून घ्यावेत. तव्यावर तूप घालून खमंग भाजावेत. हे धपाटे दही, लोणचे, टोमॅटो सॉस सोबत छान लागतात.

(कांद्याला पाणी सुटत असल्याने पीठ मळल्यावर लगेच धपाटे बनवावेत. यात आपल्या आवडीप्रमाणे पालक, कोबी देखील वापरू शकतो.)



३. पौष्टिक रवा अप्पे



साहित्य: रवा १ वाटी, दही १ वाटी, किसलेले गाजर अर्धी वाटी, वाफवलेले मटारचे दाणे पाव वाटी, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो प्रत्येकी १, चवीनुसार मीठ, तेल.



कृती: रव्यात १ वाटी दही घालून अर्धा तास मुरवत ठेवावे. त्यानंतर चांगले फेटून घ्यावे. त्यात वाफवलेले मटारचे दाणे, कांदा, टोमॅटो, किसलेले गाजर व चवीप्रमाणे मीठ घालून चांगले ढवळावे.

        गरजेप्रमाणे पाणी घालून मिश्रण तयार करावे. अप्पेपात्र गरम करून त्यात थोडे तेल घालून वरील मिश्रण घालावे आणि अप्पे बनवावेत. दोन्ही बाजूने भाजावेत. हे पौष्टिक अप्पे खोबरे चटणी सोबत छान लागतात.

        वरील मिश्रण इडलीपात्रात लावल्यास रंगीत व पौष्टिक इडली बनवता येते.



४. व्हेज रोल



साहित्य: तयार चपाती, रोल भाजायला तूप, कोणतीही तयार भाजी ( बटाटा, कोबी, फ्लॉवर इ.), शेंगदाण्याची भरड, टोमॅटो सॉस.



कृती: तयार चपातीला टोमॅटो सॉस लावावा. त्यावर एका कोपऱ्यात भाजी ठेवून त्यावर शेंगदाण्याची भरड घालावी. चपातीचा रोल करून तव्यावर तूप घालून खमंग भाजावा. छोटे तुकडे करून डब्यात द्यावा.

( रोल लगेच खायचा असल्यास त्यात बारीक चिरलेला कांदा देखील छान लागतो.)



५. ऑम्लेट पिझ्झा ( शाळेत अंड्याचा पदार्थ नेण्यास परवानगी असल्यास)



साहित्य: २ अंडी, तयार चपाती, चिमूटभर हळद, चवीपुरते मीठ, टोमॅटो सॉस, चीज, तेल.



कृती: एका वाटीत चिमूटभर हळद, मीठ घालून २ अंडी फेटून घ्यावी. तव्यावर तेल घालून अर्धे मिश्रण पसरावे. त्यावर चपाती ठेवावी. चपातीवर उरलेलं अंड्याचे मिश्रण घालावे. दोन्ही बाजूने छान भाजावे. वरून टोमॅटो सॉस लावावा. आवडत असल्यास वरून चीज घालावे. पिझ्झा प्रमाणे कापून खावे.

(आवडत असल्यास अंडी फेटताना  बारीक चिरलेला कांदा व शिमला मिरची घालू शकता.)



६. टोमॅटो-बीट-गाजर-लाल भोपळा सूप



( हि रेसिपी मुलांच्या डब्यासाठी नाही. परंतु पौष्टिक असल्याने खाली देत आहे.)



साहित्य: १ टोमॅटो, १ बीट, १ गाजर, छोटासा लाल भोपळ्याचा तुकडा, २-३ लसणाच्या पाकळ्या , ३ काळी मिरी, १ लवंग, छोटासा दालचिनीचा तुकडा, जिरेपूड, तूप, साखर, चवीपुरते मीठ.



कृती: बीट, गाजर व लाल भोपळ्याचे साल काढून छोटे तुकडे करावेत. एका कुकरच्या भांड्यात टोमॅटो व वरील सर्व तुकडे, लसूण पाकळ्या, काळी मिरी, लवंग, दालचिनी घेऊन २ शिट्ट्या घ्याव्यात.

         कुकर थंड झाल्यावर टोमॅटोची साल काढावी. सगळे मिश्रण मिक्सरला बारीक वाटावे. एका भांड्यात तूप गरम करून वरील वाटलेले मिश्रण उकळवावे.  त्यात थोडी जिरेपूड, चवीपुरती साखर आणि मीठ घालावे. गरमागरम प्यायला द्यावे.



      या सूपचा रंग खूप सुरेख येतो. चवीलाही अप्रतिम लागते. पौष्टिक आणि पोटभरीचे असल्याने अधूनमधून नक्की बनवून मुलांसोबतच सगळ्यांनी प्यावे.

















सौ . सोनल दातीर हजारे
संचालिका-  सोनल टूर्स आणि ट्रॅव्हल्स

D:\AMIT DATIR TRAVELS\IMAGE SONAL TOUR\final-sonal-logo-2.jpg





Cont: 9049624196 / 9767874442Website - www.sonaltoursandtravels.com
Email: info@sonaltoursandtravels.com; hajare.sonal@gmail.com