आठवा आठवडा

या आठवड्यात बाळाचा आकार घेवड्याच्या बिया किंवा राजमाच्या बियां इतका झाला असेल आं, कदाचित दाजींच्या अनमिकेच्या पुढच्या पेराएव्हढा 25-30 MM. या आठवड्यात बाळाचे हात आणि पाय आकार घेत आहेत , हाताचे बोटं तसेच पायांचे बोटं एकमेकांना कातडीच्या  पातळ पापुदर्याने जोडले असल्याने बदकासारखे  दिसत आहेत, त्याच्या डोळ्यावरील पापण्या  त्याच्या डोळ्याला पूर्णपणे झाकत आहेत .  त्यांच्या गळ्यातून श्वास नलीका त्यांच्या  फुफ्फुसापर्यंत  वाढतात आणि त्याची मागेच्या आठवड्यात सांगितलेली  "शेपटी" जवळजवळ निघून गेली आहे याच आठवड्यात आमचा माकडाचा माणूस झाला . त्याच्या मेंदूमध्ये, नर्व्ह सेल्स एकमेकांना जोडण्यासाठी, आतील नर्व्हस सिस्टीम तयार होत आहे . शाखा बनवित आहेत. आपण एखादी मुलगा किंवा मुलगी असण्याची मनात इच्छा  बाळगू शकता, परंतु बाह्य जननेंद्रिये आपल्या बाळाचे लिंग स्पष्ट  करण्यासाठी पुरेसे विकसित झाले नाहीत. भारतात तो प्रयन्त करणे का कायद्याने गुन्हा आहे . मुलगा मुलगी काही होवो त्याचा मनापासून स्वीकार करा एकतर मार्ग, आपले बाळ  पोटात सतत सतत  फिरत रहात असले तरीही  तूम्ही ते अजून  अनुभवू शकत नाही.

या आठवड्यात तुमची ब्रा टाईट होत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. लवकरच आपल्याला अधिक चांगल्या मोठ्या आकाराच्या ब्राची आवश्यकता असेल. स्तनपानाच्या तयारीसाठी स्तनांचा आकार बदलत आहे . तुमचे स्तन संपूर्ण प्रेग्नन्सीदरम्यान  वाढू शकतात. विशेषकरून जर तुम्ही पहिल्यांदाच बाळांतअसाल  तर आश्चर्यचकित होऊ नाका . पण शॉपिंग ला जातांना हे लक्षात ठेवा आणि नवीन ब्रा खरेदी करताना मोठ्या आकाराच्या खरेदी करा जेणेकरून वाढणाऱ्या स्तनांना मोकळी जागा मिळेल .  थकल्यासारखे वाटत असेल ना या आठवड्यात ? हार्मोन्स मध्ये झालेला  बदल - विशेषतः, प्रोजेस्टेरॉनमधील  वाढ - कदाचित आपल्या आळशीपणा वाढवेल . मळमळ आणि उलट्या परेशान करत असतील , सगळी शक्ती क्षीण झाल्यासारखे वाटू  शकते . सहन करा , तुमच्या गोड बाळासाठी , त्याचा त्रास करून घेऊ नाका , बाळाबद्दल विचार करा तुम्हाला ईश्वर शक्ती देईल 

No comments:

Post a Comment