IUI IVF ICSI म्हणजे काय?

IUI  म्हणजे काय?
Intra uterine Insemination  यामध्ये गर्भ पिशवीच्या आतमध्ये पतीचे वीर्य Canula ने सोडले जाते. त्रीला पाळीच्या दुसर्या दिवसापासून गोळ्या अथवा इंजेक्शन देऊन अंडाशयात अंडी तयार करतात. त्याचे Follicular Study करून 36 तासानंतर IUI  केले जाते. पतीच्या शुक्रजंतूंची संख्या कमी असली तरी या पध्दतीमुळे फायदा होऊन गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते.
 या  संदर्भातलं ANIMATION खाली बघा 

हे सुद्धा वाचनीय आहे : नैसर्गिक गर्भधारणा कशी होते ?
                                       संभोग प्रणय की सेक्स?

IVF / Test tube Baby म्हणजे काय?
 IVF ( In Vitro Fertilization) (Test tube Baby) यामध्ये त्रीला पाळीच्या गोळ्या दिल्या जातात आणि पाळीच्या 20 व्या दिवसापासून इंजेक्शन सुरू होतात जी रोज 20-25 दिवस घ्यावी लागतात. मध्ये एक पाळी येते आणि दुसर्या दिवसापासून अंडाशयात अंडी तयार होण्यासाठी वेगळी इंजेक्शन सुरू करतात. पाळीच्या 9 व्या दिवसापासून Follicular Study करून अंडाशयातील Follicules वाढ 18 मी. मी. पेक्षा जास्त झाली की इंजेक्शन देऊन 36 तासांनी तयार झालेली अंडी अंडाशयातून सुईने बाहेर काढतात. त्यासाठी सोनोग्राफीचा उपयोग केला जातो. पेशंटच्या पोटावर कोणतीही शत्रक्रिया केली जात नाही. बाहेर काढलेली अंडी आणि पतीचे शुक्रजंतू यांचे शरीराच्या बाहेर मीलन घडवून आणतात आणि शरीराबाहेर गर्भ तयार केला जातो. हा गर्भ Incubator मध्ये  2-3 दिवस वाढवून नंतर पत्नीच्या गर्भ पिशवीमध्ये सोडला जातो. हा गर्भ गर्भपिशवीत रूजतो. 9 महिने त्याची वाढ होते आणि नंतर बाळ जन्माला येते.

 या  संदर्भातलं ANIMATION खाली बघा 


हे सुद्धा वाचनीय आहे : गर्भाशयाचा कॅन्सर
ICSI म्हणजे काय?
(ICSI  (Intra Cytoplasmic Sperm Injection)  ज्या पुरूषांमध्ये शुक्रजंतूंची संख्या अतिशय कमी आहे त्या जोडप्यासाठी या शात्राचा उपयोग होतो. या प्रकारात IVF सारखीच प्रक्रिया असते. फक्त शुक्रजंतू हे बीजांडावर न सोडता आतमध्ये इंजेक्शनने सोडतात. शुक्रजंतूंची संख्या चांगली असेल तर या प्रक्रियेची आवश्यकता नसते.
 Surrogate Mother  म्हणजे काय?
 हा प्रकार हल्ली बर्याच टीव्ही सिरीयल मधून दाखवला जातो. एखाद्या स्त्रीला जन्मतःच गर्भपिशवी नसेल किंवा काही कारणांनी काढून टाकली असेल अथवा काही दोष असेल तर या मार्गाचा अवलंब केला जातो. पत्नीच्याच अंडाशयात अंडी तयार करून पतीचे शुक्रजंतू वापरून गर्भ तयार होतो तो दुसर्या त्रीच्या गर्भशयात वाढवला जातो. अशा प्रकारे पती आणि  पत्नीचे गुणसूत्र असलेला गर्भ हा दुसर्या आईच्या पोटात वाढवून पत्नीला बाळ दिले जाते. जी त्री हा गर्भ वाढवते तिला Surrogate Mother  म्हणतात. आई होण्यासाठी सल्ला म्हणजे त्यांनी फक्त शात्रीयदृष्टय़ा प्रयत्न चालू ठेवावेत.

follicular study  म्हणजे काय?
यामध्ये ओवरी मध्ये जी बीजांडे तयार होतात त्यांचा अभ्यास केला जातो . यासाठी सोनोग्राफी यंत्राची मदत घेतली जाते 

यामध्ये दर दोन ते तीन दिवसांनी बीजांडाची साईज मोजली जाते . ते कधी रप्चर होईल (ओवरी मधून कधी बाहेर येईल ) यावर लक्ष्य ठेवले जाते . साधारण १७-१९ mm साईज चे झालं की ते बीजाशयामधून बाहेर पडतं . नंतर फेलोपियन ट्यूब मधून होत गर्भाशयात येतं . यादरम्यान संबंध राहिले किवां IVF IUI यांपैकी काही केले तर गर्भधारणा होते . पण यासाठी तुमच्या गर्भाशयाचे आवरण सुद्धा तयार झाले पाहिजे . फॉलिक्युलर स्टडी मध्ये या सगळ्यावर लक्ष्य ठेवून नेमक्या वेळी पुरुषाचे स्पर्म गर्भाशयापर्यंत पोहोचवले जातात . आणि गर्भधारणेची शक्यता अनेक पटीने वाढते 

नैसर्गिक गर्भधारणा कशी होते ?





"स्त्री जननसंख्या (janansanstha)" स्त्रीच्या शारिरात प्रत्येक महिन्याला १-२ बीजांड तयार होते आणि फॉलीकलमध्ये असलेले हे बीजांडे "ओव्हुलेशन" च्या वेळेला फॉलीकल मधुन बाहेर येते.
अंडाशयातुन बाहेर आलेले हे बीजांडे नळीद्वारे पकडले जाते. जेथे बीजांडे आणि शुक्राणु यांचा संयोग होऊन गर्भ तयार होतो.
"ओव्हुलेशन" म्हणजेच अंडाशयातुन सुटलेले बीजांडे नळीत पकडले जाते व तेथुन ते गर्भाशयातुन येते. अंड फुटल्यापासुन २४ तासांच्या कालावधीत जर स्त्री व पुरुष यांचे शारिरीक संबंध आले तरच गर्भधारणा होते. नळीमध्ये तयार झालेला गर्भ पुन्हा गर्भाशयात येतो व तेथेच ९ महिने त्याची वाढ होते.
"पुरुष जननसंख्या (janansanstha)" पुरुषांमध्ये शुक्राणुंची निर्मिती सेमिनीफ़ेरस ट्युबुलमध्ये होते. तेथुन परिपक्व होण्यासाठी शुक्राणु "इपिडीडायमिस" मध्ये जातात व तेथे परिपक्व शुक्राणुंचा साठा तयार होतो. ही प्रक्रिया पुर्ण होण्याकरिता ३ महिन्यांचा कालावधी लागतो. शारिरीक संबंधाच्या वेळेस शुक्राणु "इपिडीडायमिस" मधुन "वास डिफ़रन्स" मध्ये येतात जेथे शुक्राणु व सेमिनल फ्लुईड (स्त्राव) यांचे मिश्रण तयार होते व हे शुक्राणु व सेमिनल यांचे मिश्रण स्त्रीच्या योनीमार्गात सोडले जातात.



गर्भाशयाचा कॅन्सर

गर्भाशयाचा कॅन्सर म्हणजे काय?
गर्भाशयाच्या आतील आवरणामधील पेशींमध्ये बदल होतो. त्या पेशी फार भरभर वाढायला लागतात. तसेच त्यांच्या रचनेतही बदल होतो. हळूहळू त्या इतक्या संख्येने वाढतात की, गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये, गर्भाशयाच्या मुखाजवळ (सर्व्हिक्स) तसेच रक्तवाहिन्यांद्वारा शरीरात इतर ठिकाणी पसरत जातात. अशा प्रकारच्या रोगाला गर्भाशयाचा कॅन्सर असे म्हणतात.
याची लक्षणे कोणती?

• कॅन्सरच्या अगदी प्राथमिक अवस्थेत दुर्दैवाने फारशी बाह्य लक्षणे दिसून येत नाहीत. या आवरणाचा सूक्ष्मदर्शक यंत्राने तपास केला (हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशन) तर कॅन्सरच्या पेशी आढळून येऊ शकतात.

• मासिक पाळी पूर्ण बंद झाल्यानंतर परत रक्तस्राव झाल्यास कॅन्सरची शक्यता असू शकते.

• मासिक पाळीमध्ये अचानक रक्तस्राव होणे, खूप जास्त रक्तस्राव होणे, शरीरसंबंधानंतर रक्तस्राव होणे ही लक्षणे आढळून येतात.
उपाययोजना कशावर अवलंबून असते?

• कॅन्सर कुठपर्यंत पसरला आहे? (स्टेज ऑफ डिसीज)

• कॅन्सरच्या पेशी किती प्रमाणात बदललेल्या आहेत? (ग्रेड)

• इतर काही आजार आहेत का?

• वय किती आहे?

• मुख्यत: स्टेज आणि ग्रेड यांच्यावर दिली जाणारी उपाययोजना अवलंबून असते.
कॅन्सरची शक्यताकधी जास्त असते?

l मूल न झालेल्या स्त्रियांमध्ये हा रोग जास्त आढळतो.

l मासिक पाळी वयाच्या 55 वर्षांनंतर बंद झाल्यास.

l अनेक वष्रे इस्ट्रोजेनच्या गोळ्या घेतल्यास.

l सर्वात पहिली मासिक पाळी वयाच्या 12व्या वर्षाआधी सुरू झाल्यास व खूप उशिरा बंद झाल्यास.

l जर आई, मावशी, बहीण किंवा मुलगी यांपैकी कोणाला गर्भाशयाचा कॅन्सर झालेला असल्यास.

l ओटीपोटात काही कारणासाठी रेडिएशन थेरपी घेतली असल्यास.

l स्तनांच्या कॅन्सरसाठी टॅमॉक्सिफेन नावाचे औषध अनेक दिवस घेतल्यास.

l या सर्व संख्याशास्त्राच्या आधारे असलेल्या शक्यता आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.
कोणत्या उपाययोजना आहेत?

शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी, केमोथेरपी, हार्मोनल थेरपी इत्यादी उपाययोजना कराव्या लागतात. यापैकी कोणत्या उपाययोजना कधी करायच्या हे तज्ज्ञ डॉक्टर ठरवतात. प्रत्येक पेशंटच्या निदानावर ते अवलंबून असते.
कोणत्या तपासण्या करून

निदान करता येते?

• तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णाची तपासणी सर्वप्रथम करून घ्यावी.

• पॅप स्मियर - गर्भाशयाच्या तोंडावरील (सर्विक्स) स्राव तपासून कॅन्सरच्या पेशी बघता येतात.

• पेल्विक सोनोग्राफी - अगदी सहज करता येणारा हा तपास निदानासाठी खूप मदत करतो.

• आतील आवरण काढून त्याचा सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपास (एंडोमेट्रियल बायोप्सी विथ हिस्टोपॅथॉलॉजी)

• दुर्बिणीद्वारे तपासणी (हिस्टेरोस्कोपी) - कोणता भाग संशयास्पद वाटतो आहे इ. दुर्बिणीने बघता येते.

• एमआरआय - कॅन्सर कुठपर्यंत पसरला आहे याचे अचूक निदान यात करता येते.

• छाती, यकृत आदींचे एक्स-रे - हे तपास कॅन्सर पसरला असल्यास व शस्त्रक्रियेपूर्वी करावे लागतात.

Pcod

सुरूवातीला स्टीन आणि ल्यूवेंथॉल या डॉक्टरांनी जेव्हा या आजाराने पिडीत स्त्रीया पाहिल्या तेव्हा त्यांना सोनोग्राफीत या स्त्रीयांच्या बीजांडात /ओव्हरीत कित्येक पाण्याने भरलेल्या गाठी (सीस्ट) दिसल्या. या सीस्टचे निर्मूलन करण्यासाठी बीजांडांचा थोडा भाग सर्जरीने काढून टाकल्यावर त्यातील कित्येक स्त्रीयांना गर्भधारणा होऊ लागली. त्यामुळे बीजांडात सीस्ट निर्माण झाल्याने होणारा रोग म्हणून या रोगाचे नांव पॉलिसिस्टिक ओवॅरियन डिसीज म्हणजे पीसीओडी ठेवण्यात आले. ज्या दोन डॉक्टरांनी हा आजार पहिल्यांदा शोधला त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ या आजाराला स्टीन ल्यूवेंथाल डिसीज असेही म्हणतात. पण कालांतराने हा आजार केवळ बीजांडातील पाण्याच्या गाठी किंवा पॉलिसिस्टिक ओवरीज इतकाच मर्यादित नसून एकाच रोगाच्या विस्तृत पटलाचा हा केवळ एक भाग आहे हे लक्षात आले.
लक्षणे
या आजाराने पीडित महिलांमध्ये खालील लक्षणे दिसतात.
१.पाळीच्या सामान्य नियमित चक्रातील बदल
-बहुतेक मुलींना पहिली पाळी (मिनार्की) अगदी वेळेवर येते पण नियमित अश्या २-३ पाळ्या येऊन गेल्यावर पाळी बर्‍याच महिन्यांत येत नाही/ फार पुढे जाते.
-अनियमित/अनैसर्गिक पाळी - वारंवार किंवा फार कालावधीने पाळी येणे.रक्तस्त्राव अगदीच कमी किंवा खूपच जास्त होणे.
२.पुरुषीपणा(विरिलायजेशन)
-स्तनांचा आकार अचानक कमी होणे
-आवाज जास्तच घोगरा/पुरुषी होणे
-क्लायटोरिसचा आकार मोठा होणे
-छाती,पोट,चेहरा आणि स्तनाग्रंभोवती अतिरीक्त/पुरूषांसारखे केस वाढणे.
-टक्कल पडणे(मेल पॅटर्न बाल्डनेस)
३. त्वचेतील इतर फरक
-खूप जास्त प्रमाणात चेहरा/पाठ इथे मुरमे वाढणे.
-मानेचा मागचा भाग,बगला,मांड्यांमधला भाग इथे काळ्या रंगाच्या जाडसर वळकट्या(अकँथोसिस) पडणे.
४.चयापचयावर परिणाम (मेटॅबोलिक इफेक्ट) -इंस्युलिन्स रेजिस्टन्समुळे जाडी वाढणे आणि त्यामुळे मधुमेह,रक्तदाब इ.आजार.
पुढील माहितीसाठी याच पेज वरील PCOD वाचा