१९ वा आठवडा



या आठवड्यात बाळाची साईज १५ cm  पेक्षा जास्त झाली असेल आणि वजन पावशेर २५० ग्रॅम्स  !!मोठ्ठा गाल फुगवलेला आंबा झालाय बघ  !!
 आपल्या बाळाच्या  ज्ञानेद्रिय  विकासासाठी हा महत्वाचा काळ आहे. बाळाच्या मेंदूमध्ये  आसपासच्या जगाबद्दल जाणून घेण्यासाठी मदत करणार्या नर्व्ह सेल्स मेंदूत वाढत आहेत.

आपल्या बाळाचे हातपाय आता त्याच्या  शरीराच्या प्रमाणात आहेत.दणादण  लाथा मारतेय बघ तुझी गोडुली . आपले हात पाय लवचिक करत आहे .  ऍनोमली स्कॅन मध्ये दिसतंय  बघ कसा फ़ुटबाँल खेळतोय .

शेजारच्या काकू हळूच कानात कुजबुजतील बघ , कितवा आठवडा आहे . म्हणजेच आता तुझं कोकरू जगाला दिसेल इतकं पोट आलं असेल . ओटीपोटात दुखू शकतं . खूप दुखत असेल तर  डॉक्टरांचा सल्ला घ्यावा . अंगावर काढू नये .

पायाची बोटं सुजली असतील ना !! चप्पल फिट होत असेल .

जिजाजींना नवीन चप्पल आणायला सांग चिकटपणा करू नको . कारण प्रेग्नन्सी नंतर तुझे पायाची बोटे नॉर्मल पोसिशन ला येतील पण या पिरिअड मध्ये जुनी चप्पल वापरशील तर विनाकारण टाचांचे दुखणे लावून घेशील 

No comments:

Post a Comment