गर्भवतीने वागावे ऐसे


  • रोजचे जीवन जगताना गर्भवतीने पुढील गोष्टींकडे लक्ष ठेवावे,
  • मल-मूत्रप्रवृत्ती किंवा गॅसेसचा वेग न अडवणे,
  • कडक वेड्यावाकड्या जागी न बसणे,
  • पाठीचा कणा कायम सरळ राहण्याकडे लक्ष देणे,
  • सतत पाठीवर न निजता, शक्‍यतो कुशीवर झोपणे,
  • फार गडद रंगाचे कपडे न घालणे,
  • खोल दरी, रिकामी विहीर किंवा फार उंचावरून खाली बघण्याचा प्रयत्न न करणे,
  • अप्रिय, कर्कश आवाज वा संगीत न ऐकणे,
  • प्रमाणापेक्षा अधिक शारीरिक कष्ट, व्यायाम न करणे,
  • सतत प्रवास न करणे. विशेषतः पहिल्या तीन व शेवटच्या दोन महिन्यांमध्ये शक्‍यतो लांबचा प्रवास टाळणे,
  • आरामदायी, सुटसुटीत कपडे घालणे,
  • उंच टाचेच्या चपला न वापरणे,
  • मद्यपान-धूम्रपान टाळणे,
  • जागरणे न करणे, तसेच दुपारी न झोपणे,
  • मानसिक स्तरावर आनंदी, प्रेमळ राहण्याचा प्रयत्न करणे, भीतिदायक वाचन किंवा मालिका, चित्रपट पाहणे टाळणे,
  • शक्‍यतो मैथुन टाळणे, विशेषतः पहिल्या तीन व शेवटच्या तीन महिन्यांत समागम टाळणे,
  • अस्वच्छ, अप्रिय ठिकाणी फार वेळ न राहणे