सहावा आठवडा

बघ तायडे तुझी ढंपी बघता बघता तुरीच्या डाळीच्या दाण्या एवढी झालीय , तुला न सांगता !!! आता हीच फटाकडी बोलता बोलता मम्मी मम्मी करायला लागेल तुला , आणि ढंप्या असेल तर शेजारच्या पाजरच्यांना आत्ताच सांगून ठेव आनब्रेकेबाल काचा बसवून घ्या घुमाव बल्ला की सिक्सर येतोय !!  थोडीशी गम्मत , तू फक्त आनंदी राहा !!

या आठवड्यात बाळाचे नाक तोंड कान तयार होतील , सध्यातरी आमचा जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा आहे , म्हणजे शरीरापेक्षा डोके मोठेच दिसतंय सोनोग्राफी मध्ये ते दोन काळे स्पॉट दिसताय का ? अगदी तुझ्यासारखे सुंदर डोळे तयार होताय !! बाळ मिनिटाला 100 ते 160 धडधाडताय तुझ्या डबल !! बाळाची पिचुटरी ग्रंथी तयार व्हायला लागेल , !! रक्ताचं अभिसरण सुरू हे !! दाजी लाख म्हणू दे मेरा खून है , तू ठणकावून सांग सध्या तरी बाळाच्या  शरीरात माझंच रक्त फिरतंय
 या दिवसांत (सगळ्या नऊ महिनात) डॉक्टर च्या व्हिजिट स्कीप करू नको ,  डॉक्टर म्हटले ना "व्यवस्थित आहे तुझं बाळ" की तुला बघ कसं मस्त वाटतं !!!
 या आठवड्यात तू भुलभुलैया मधली विद्या बालन होऊन जाशील , इतक्यात  आमी मंजुलिका तर इतक्यात हा सासूबाई तुम्ही बसा मी चहा ठेवते !!!  हार्मोन्स नामक निराळी दुनिया निसर्गाने निर्माण केली त्यामुळे असं सगळं होतं !! आणि तुझ्या शरीरातली दुनिया तर लै बदलली आहे बेटा !!!
 लघवीला गेल्यावर किंवा निकरवर रक्ताचा डाग दिसणं हे प्रेग्नन्सी मध्ये कॉमन आहे तरी डॉक्टर शी संपर्क साधा बऱ्याच वेळा गर्भपातच लक्षण असू शकतं पण हे तज्ज्ञ डॉक्टर सांगू शकतात इथली किंवा इतरत्र कुठलीही इंटरनेट वरच्या माहितीवर विसंबून राहू नये 

No comments:

Post a Comment