महिला दिनाच्या आरोग्यमय शुभेच्या

सखी परिवार बघता बघता एक वर्षाचा झाला , खरं तर जागतिक महिला दिनाचं निमित्त साधून मागील वर्षी ८ मार्च रोजी सखी तुझा या महिलांच्या आरोग्याला वाहिलेल्या ब्लॉगची स्थापना केली होती isearch च्या माध्यमातून , या निमित्ताने अनेक लोक त्यांच्या समस्या जाणून घेता आल्या सोडवता आल्या यात खूप आनंद मिळाला . माझ्या माता भगिणींसोबतच पुरुष बांधवांनी सुद्धा त्यांच्या समस्या विचारल्या यथाशक्ती त्याचे निराकरण करण्याचा आटोकाट प्रयत्न माझ्या टीमने केला . समाधान आहे . 
याच वर्षी आपण महिला विषयक दिवाळी अंक सुद्धा प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला . त्यात सहभागी लेखकांचे मनापासून धन्यवाद.
या प्रवासात ज्ञात अज्ञात असंख लोक मिळाले . एक वर्षात १००००+ लोकांपर्यंत विना पब्लिसिटी पोहोचलो यातच सर्व काही आले.
यापुढचा टप्पा म्हणजे आपण वाचकांसाठी त्यांचे मनोगत , अनुभव आणि लेख मांडण्याची व्यवस्था (निवडक) सुरु करतोय . तुम्ही तुमचे लेख sakhituza@gmail.com या मेल id वर पाठवू शकता. गर्भवती महिलांनी maintain केलेली डायरी , बालकांच्या संगोपनाचे लेख , सौंदर्याची काळजी यासारख्या विषयातील तुमचे अनुभव इतरही महिलांसाठी अनमोल ठरतील. हा प्लॅटफॉर्म सगळ्यांसाठी खुला करतांना समस्त महिला वर्गाला महिला दिनाच्या आरोग्यमय शुभेच्या.