सोळावा आठवडा






नासपती  एवढं झालंय बाळ आता !!
तुझं बाळ आता आपले हात हलवू शकते तसेच मूठ बंद करू शकतं . सोनोग्राफी मध्ये नाळे सोबत कसं खेळतंय बघ
आपले बाळ आता आपले हात हलवू शकते तसेच उघडझाप  करू शकते. खेळकर झालंय बघ तुझं पिल्लू .
त्याच्या  मानेचे स्नायू अधिक बळकट होत आहेत . झपाट्याने वाढ होण्याचे हे दिवस आहेत , पुढील तीन आठवड्यांमध्ये त्याचे वजन दुप्पटीने वाढेल.
१२ सेंटीमीटर आणि  १०० ग्रॅम वजनाचा आहे नासपती (पिअर) एवढा !!!
बाळाचे तयार होत असलेलं इवलुस हृदय चक्क २४ लिटर रक्त पम्प करतंय !!! 


जसा गर्भ मोठा होईल तसं ओटीपोटातील वेदना PGP जराश्या कमी होताना जाणवतील . हे असे होते कारण आपल्या गर्भाशयाला सपोर्ट  करणारे लिगामेंट .
कटीमधले (पेल्विक गर्डल) मधील स्नायू कमी अधिक ताणल्यामुळे हे दुखतंच
याला इंग्रजी मध्ये PGP वेदना म्हणतात पेल्विक गर्डल पैन . प्रेग्नन्सी मध्ये रीलॅक्सिन नावाचे हार्मोन संप्रेरक पेल्विक चे लिगामेंट ढिले करत असल्याने या वेदना होतात
कळा कश्या येतात आणि त्या सहन करण्यासाठी तुमची सहनशीलता कदाचित निसर्ग तयार करत असेल
जर ओटीपोटात वेदना खूप जास्त  असेल, वरच्या ओटीपोटात असेल किंवा पोटात क्रॅम्प येत असतील  तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा. प्रेग्नन्सी मधील या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.
नाकातून हिरड्यांतून रक्त येऊ  शकतं , उदासवाणं वाटू शकतं , डोकं दुखणं , ग्यासेस हे त्रास या आठवड्यात होऊ शकतात .
पोटऱ्या दुखत असतील ना ? जांघेतही थोडे दुखत असेल
डाव्या कुशीवर झोपायची सवय लावून घे 

या आठवड्यात तुझी भूक वाढू शकते , पण सहन होईल तेच खावे . तेलकट वगैरे खाऊ नये . 
आता मूड सिंग पण कमी होत असतील आता थोड्याच दिवसात पोटामध्ये गुदगुल्या करायला सुरुवात करेल प्रत्येकाच्या बाबतीत नाही होत काहींच्या तर विसाव्या आठवड्यापर्यंत सुद्धा कळत नाही . चेहऱ्यावर चमक येते ती याच आठवड्यात 

No comments:

Post a Comment