नववा आठवडा


अक्काबाई या आठवड्यात तुझी झुबीडुबी चक्क  द्राक्षांचा आकारएव्हढी झालीय चांगली  एक इंच आहे आणि साधारण दीड ग्रॅम वजनाची . तिच्या  शरीराचे  आवश्यक भाग विकसित झालेले आहेत. इतर बदल मोठ्या प्रमाणात आहेत: तिचे हृदय चार चेंबरमध्ये विभागले आहे आणि झडपा विकसित होताय - बाळाची "शेपटी " पूर्णपणे संपली आहे. तुमच्या बाळाचे अवयव, स्नायू वेगाने विकसित होत आहेत. बाह्य लैंगिक अवयव विकसित झालेय परंतु अजून काही आठवड्यांसाठी मुलगा किंवा मुलगी म्हणून फरक करू शकत नाही. बाळ आता माणसाचा आकार घेऊ लागलंय  . बाळाचे डोळे पूर्णपणे तयार झाले आहेत, परंतु तिच्या पापण्यांच्या  झडपा  बंद झाल्या आहे आणि 27 व्या आठवड्यापर्यंत उघडणार नाही. बाळाकडे लहान अर्बुदे आहेत, आणि तिचे तोंड, नाक आणि नाक व्यवस्थित दिसत आहेत. हार्मोन्स तयार करण्याच्या  महत्त्वपूर्ण कामासाठी प्लॅसेन्टा आता पुरेसा विकसित झाला आहे. आता आपल्या बाळाची मूलभूत बाह्यरुप आकार घेत  आहे, छकुलीचे वजनही आता वेगाने वाढत आहे.

आपले कमरेचा आकार थोडासा वाढला असला तरीही तरीही आपण गर्भवती दिसालाच असे  नाही. करण अजून पोट आलेले नसेल . बर्याच स्त्रियांसाठी मॉर्निंग सिकनेस आणि इतर शारीरिक लक्षणे लवकर जाणवत नाही. आणि काही स्त्रियांमध्ये खूप जास्त मळमळ उलट्या हा त्रास या आठवड्यात होतो  काळजी करण्याचे करण नाही. सतत मूड बदलणे हे सुद्धा प्रेग्ननसी मध्ये कॉमन आहे.
 तुमची मनाची अवस्था  बदलणे आता नेहमीचे  आहे - मूड स्विंग !! . बर्याच स्त्रिया मध्ये दिसून येते की 6 ते 10 आठवड्यापर्यंत  भावनांचा आवेग वाढतो , रडायला येतं , एकट वाटतं सगळं नॉर्मल आहे , दाजींनाच कौन्सिलर ची आवश्यकता आहे  तुला नाही . दुसऱ्या तिमाहीत हे कॉमन आहे नंतर कमी होत जाऊन पुन्हा  प्रेग्नसी च्या शेवटच्या टप्प्यात बाईची नाटके नवऱ्याला सहन करावी लागतात.


No comments:

Post a Comment