प्रतीक्षा संपली .. आला आपला दिवाळी अंक






नमस्कार , दिवाळीच्या आगमनाने सर्वत्र उत्साह संचारला आहे. पण घरोघरच्या माताभगिणी फराळ साफसफाई पाहूनचार आदी करुन अगदी दमून गेल्या असतांना त्यांच्या आरोग्याची काळजी करणारा हा दिवाळी अंक तुमच्या हाती देतांना मला विशेष आनंद होत आहे.लहानपणापासून आईला स्वयंपाकघरात काम करतांना पाहिलं पण तिला मदत करायला कधी धजावलो नाही , ती तिची नोकरी संभाळत आमचा सांभाळ करत होती. लग्न झाल्यावर मात्र स्त्रियांचं भावविश्व माझ्यासमोर बायकोच्या माध्यमातून उभं राहिलं. आई व बहिण यांच्या कष्टाची तिव्र जाणिव झाली. मातृत्वाचं निसर्गदत्त आणि नितांतसुंदर देणं फक्त स्त्रिला बहाल करतांना हार्मोन्स निराळी दुनिया निसर्गाने निर्माण केली. पण त्यात होणारी होरपळ पुरुषाला कधीच कळणार नाही . माझ्या आजुबाजुला काम करणाय्रा समस्त महिला वर्गाबद्दल मला विशेष आदर आहे. निसर्गदत्त अश्या शारिरिक व मानसिक त्रासांमधुन मुलांची माता, नवय्राची सहचारीनी , आदर्श सुन  घरच्या तसेच कामाच्या ठिकाणच्या आपल्या जबाबदाय्रा पार पाडणाय्रा महिला कुठली सहनशक्तिची कवच कुंडले घेऊन आल्या तो परमेश्वर जाणो !!! मला स्त्रियांकडे पाहण्याचा नवा दृटिकोण देणाय्रा समस्त माता भगिणींना  हा दिवाळी अंक अर्पण

 डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा