लहान मुलांमधील नैराश्य

लहान मुलांनी निराश होणं  किंवा चिडचिड करणं ,  वेळोवेळी वाईट मूड मध्ये  राहणे अगदी सामान्य आहे. परंतु जेव्हा नकारात्मक भावना आणि नकारात्मक
 विचार बराच काळ टिकून राहतात आणि मुलाची नैसर्गिक पणे खेळण्याची अभ्यास करण्याची किंवा दैनंदिन कामं  करण्याची क्षमता मर्यादित होते कमी होते तेव्हा ते  नैराश्य असू शकते.

डिप्रेशन  हा एक प्रकारचा मूड डिसऑर्डर आहे. जेव्हा मुले दुःखी,किंवा   निराश आठवडे, महिने किंवा त्याहूनही अधिक काळ असतात तेव्हा ही  चिन्हे गंभीर असतात , सतत स्वतःला कमी लेखने
उदास वाटणे , एकाग्रता नसने , झोप  आणि भूक सतत डिस्टर्ब् होणं . शाळेत मन रमत नाही , थकल्यासारखे वाटेल,  मित्र किंवा कुटूंबापासून दूर जावे.हे सुद्धा काही प्रारंभिक लक्षणे आहेत .

जेव्हा मुल नैराश्यात असतात , तेव्हा ते त्यांच्या आवडीच्या गोष्टी करत असतांना सुद्धा त्या त्यांना कठीण जाचक  वाटू शकतात  . डिप्रेशन मुले मुलांना आपण कुठल्याच कामाचे नाही अगदीच नालायक आहोत ,आपल्यावर कुणीही प्रेम करत नाही असे वाटू शकते वाटते. यामुळे दिन्चार्येही  कठीण वाटू शकते . जेव्हा नैराश्य तीव्र होते, तेव्हा यामुळे मुलांना स्वत: ला हानी पोहचविण्याचा किंवा आत्महत्येचा विचार येऊ शकतो  अश्या वेळेस त्याला
पाठिंबा द्या आणि आपल्या मुलाबद्दल आपल्या प्रेमाची आणि काळजीने  आपुलकीच्या  स्नेहाच्या  भावनेने जवळ घ्या . विश्वास द्या कि आम्ही आहोत ना , काळजीचे करू नकोस

डिप्रेशन ओळखणे
जेव्हा मूल उदास असते तेव्हा पालक आणि इतर लोकांना हे कळणे कठीण असते. मुलं  अचानक चिडचिडे बनली   किंवा रागीट बनली  , सतत  मूड  बदलतोय  , तुमच्या विषयी किंवा एकंदर वडीलधाऱ्या मंडळींबद्दल  अनादर करतोय . कुठल्याच गोष्टींत  उत्साह  आणि इंटरेस्ट  नसणे , एकलकोंडा बनणे  पालक आणि मुले ( किशोरवयीन) यांना हे लक्षातही  येऊ शकत नाही की ही नैराश्याची चिन्हे असतील . डिप्रेशन वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त होतं

डिप्रेशन आणि इतर मूड डिसऑर्डरचे निदान

डिप्रेशन आणि मूड डिसऑर्डरचे निदान करताना, डॉक्टर किंवा समुपदेशक  वेगवेगळ्या प्रकारांचा वापर करतात.

मेजर डिप्रेशन : दीर्घकाळ उदास मनःस्थिती ही डिप्रेशन अवस्था कमीतकमी 2 आठवडे टिकली कि म्हटली जाते . कुणा जवळच्या व्यक्तीच्या अचानक  जाण्याने , प्रेमभंग , व्यावसायिक तोटा किंवा आजारपण यामुळे मेजर डिप्रेशन येतं
.
क्रॉनिक डिप्रेशन  (ज्याला डायस्टिमिया देखील म्हणतात) स्लो डिप्रेशन आहे जी हळूहळू विकसित होते आणि 2 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ टिकते . याची करणे मुख्यत्वेकरून अनुवांशिक असतात

ऋतुपरत्वे बदलणारं डिप्रेशन :  डिसऑर्डर एक प्रकारचा डिप्रेशन आहे  जो ऋतुमानाशी संबंधित आहे . प्रकाश किती आहे याच्याशी संबंधित आहे. जेव्हा दिवसाचे तास लहान असतात तेव्हा हे विकसित होते; उदाहरणार्थ, हिवाळ्यातील महिन्यांमध्ये.

डिस्ट्रपटिव्ह मूड  डिसऑर्डर आक्रमकता आणि रागाचा उद्रेक नेहमी चिडचिड  अशी मनःस्थिती 6 वर्षांपेक्षा मोठ्या मुलामध्ये कमीतकमी एक वर्ष टिकली कि म्हटली जाते
.

योग्य लक्ष आणि काळजी घेऊन डिप्रेशन आणि इतर मूड डिसऑर्डर चांगले होऊ शकतात. परंतु त्यांच्यावर योग्य वेळी  उपचार न केल्यास समस्या कायम राहू शकतात किंवा आणखी वाईट होऊ शकतात.

जर आपल्याला असे वाटले  की आपल्या मुलास डिप्रेशन  असेल किंवा मूडची समस्या आहे तर :

आपल्या मुलाशी डिप्रेशन आणि मनःस्थितीबद्दल बोला. मुले कदाचित दुर्लक्ष करतात,लपवतात  किंवा बऱ्याचदा लक्षातही येत नाही त्यांच्या ..  त्यांच्याशी तरीही बोला. ऐका, आपला आधार द्या आणि प्रेम द्या .
आवश्यकता असल्यास डॉक्टर ला भेट द्या
. डॉक्टर कदाचित संपूर्ण शारीरिक तपासणी करतील . डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या मुलाच्या  आरोग्याच्या तपासणी करून घ्या  जर डॉक्टरांना असे वाटले की आपल्या मुलाला डिप्रेशन किंवा तत्सम मूड डिसऑर्डर आहे, तर तो आपल्याला  उपचारांसाठी एखाद्या तज्ञाकडे पाठवू शकता .

मनोविकार तज्ज्ञांशी संपर्क साधा. डिप्रेशन रिकव्हर होऊ शकते. परंतु मदतीशिवाय हे दीर्घकाळ टिकू शकते किंवा आणखी वाईट होऊ शकते.  मनोचिकित्सक किंवा मानसशास्त्रज्ञ आपल्या मुलाचे मूल्यांकन करू शकतात आणि उपचारांची शिफारस करतात. मनोविकार तज्ज्ञांकडे जावं लागलं म्हणजे वेड लागलं तरच जावं लागतं हा ग्रह मनातून काढा . मुलांच्याही मनातून काढा . कुठल्याही माणसाला आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर मानवोपचार तज्ज्ञाची आवश्यकता असते . खेळाडूंच्या फिजिओ च्या टीम सोबत कायम एक मानसोपचार तज्ज्ञ असतो . कुणाला वेड लागलं तर म्हणून नाही तर त्यांच्या मनस्थितीची काळजी घेण्यासाठी .

पालक समुपदेशन देखील बर्‍याचदा उपचारांचा एक भाग असतो. हे निराशेने ग्रस्त असलेल्या मुलाला किंवा किशोरवयीन मुलाला पालक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतात

मदत करण्याचे आणखी मार्ग


आपल्या मुलास पौष्टिक पदार्थ खातात, पुरेशी झोप मिळेल आणि दररोज शारीरिक व्यायाम मिळेल मिळेल असे बघा . याचा मूडवर सकारात्मक परिणाम होतो.

एकत्र वेळ घालवा . दोघे आनंद घेऊ शकता अशा गोष्टी करण्यात आपल्या मुलासह वेळ घालवा. फिरायला जा, एखादा खेळ खेळा, स्वयंपाक करा, हस्तकला बनवा, एक मजेदार चित्रपट पहा. सकारात्मक भावना आणि मनःस्थितीला हळूहळू प्रोत्साहित करा (जसे की आनंद, विश्रांती, करमणूक आणि आनंद) हळूहळू डिप्रेशन चा एक भाग असलेल्या निराश मनोवृत्तीवर मात करण्यात मदत करू शकते.


डॉ योगिनी सावंत 

healthy recipes for kids

शाळेत जाणाऱ्या मुलांच्या आईंना पडणारा नेहमीचा प्रश्न म्हणजे डब्यात काय देऊ? जेणेकरून मुलं पौष्टिक खातील आणि डबा पूर्ण खाल्ला जाईल. अशाच काही पाककृती मी खाली सांगत आहे ज्या माझ्या ३ वर्षांच्या मुलाला खूपच आवडतात. ज्यातून मी त्याला जास्तीत जास्त पौष्टिक खाऊ घालण्याचा प्रयत्न करते.



 १. मँगो शिरा



साहित्य: रवा १ वाटी, तूप अर्धी वाटी, साखर अर्धी  वाटी, मँगो पल्प अर्धी वाटी, दूध व पाणी यांचे समप्रमाणात मिश्रण १ वाटी, बदाम, काजू, पिस्ते, अक्रोड यांची बारीक पूड, वेलची पावडर.



कृती: जाड बुडाच्या पातेल्यात / कढईत तूप गरम करुन त्यावर रवा खमंग भाजून घ्यावा. त्यावर हळूहळू गरम दूध घालावे आणि रवा परतून घ्यावा. रवा छान फुलतो. ५ मिनिट झाकण ठेवून रवा चांगला शिजू द्यावा.

        यात अर्धी वाटी मँगो पल्प आणि साखर घालून परतावे. वरून ड्रायफ्रुट्सची पूड आणि वेलची पावडर घालून परतावे. असा हा मँगो शिरा चवीला खूपच सुरेख लागतो.

(मुलांना ड्रायफ्रुट्सचे काप आवडत असतील तर पावडर न करता काप घातले तरी चालतील.)



२. मिश्र पिठाचे धपाटे



भाजणीच्या थालिपीठाप्रमाणे निरनिराळी पीठे वापरून बनवलेले धपाटे देखील छान लागतात आणि पौष्टिक असतात.



साहित्य: गव्हाचे पीठ १ वाटी, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणीचे पीठ प्रत्येकी अर्धी वाटी, बेसन पाव वाटी, किसलेले गाजर अर्धी वाटी, किसलेले बीट व दुधी प्रत्येकी पाव वाटी, बारीक चिरलेली मेथी व कोथिंबीर प्रत्येकी पाव वाटी, बारीक चिरलेला कांदा १, आले-लसूण पेस्ट १ मोठा चमचा, हिंग १ छोटा चमचा, धणे-जिरेपूड १ छोटा चमचा, चवीप्रमाणे लाल तिखट आणि मीठ, तूप.



कृती: गाजर, बीट, दुधी, मेथी, कोथिंबीर, कांदा सगळे एकत्र करून घ्यावे. त्यात सर्व पीठे घालावीत. हिंग, आले-लसूण पेस्ट, धणे-जिरेपूड, लाल तिखट व मीठ घालून, गरजेनुसार पाणी घालून साधारण घट्टसर मळून घ्यावे.

       याचे छोटे गोळे बनवून लाटून घ्यावेत किंवा कापडावर थापून घ्यावेत. तव्यावर तूप घालून खमंग भाजावेत. हे धपाटे दही, लोणचे, टोमॅटो सॉस सोबत छान लागतात.

(कांद्याला पाणी सुटत असल्याने पीठ मळल्यावर लगेच धपाटे बनवावेत. यात आपल्या आवडीप्रमाणे पालक, कोबी देखील वापरू शकतो.)



३. पौष्टिक रवा अप्पे



साहित्य: रवा १ वाटी, दही १ वाटी, किसलेले गाजर अर्धी वाटी, वाफवलेले मटारचे दाणे पाव वाटी, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो प्रत्येकी १, चवीनुसार मीठ, तेल.



कृती: रव्यात १ वाटी दही घालून अर्धा तास मुरवत ठेवावे. त्यानंतर चांगले फेटून घ्यावे. त्यात वाफवलेले मटारचे दाणे, कांदा, टोमॅटो, किसलेले गाजर व चवीप्रमाणे मीठ घालून चांगले ढवळावे.

        गरजेप्रमाणे पाणी घालून मिश्रण तयार करावे. अप्पेपात्र गरम करून त्यात थोडे तेल घालून वरील मिश्रण घालावे आणि अप्पे बनवावेत. दोन्ही बाजूने भाजावेत. हे पौष्टिक अप्पे खोबरे चटणी सोबत छान लागतात.

        वरील मिश्रण इडलीपात्रात लावल्यास रंगीत व पौष्टिक इडली बनवता येते.



४. व्हेज रोल



साहित्य: तयार चपाती, रोल भाजायला तूप, कोणतीही तयार भाजी ( बटाटा, कोबी, फ्लॉवर इ.), शेंगदाण्याची भरड, टोमॅटो सॉस.



कृती: तयार चपातीला टोमॅटो सॉस लावावा. त्यावर एका कोपऱ्यात भाजी ठेवून त्यावर शेंगदाण्याची भरड घालावी. चपातीचा रोल करून तव्यावर तूप घालून खमंग भाजावा. छोटे तुकडे करून डब्यात द्यावा.

( रोल लगेच खायचा असल्यास त्यात बारीक चिरलेला कांदा देखील छान लागतो.)



५. ऑम्लेट पिझ्झा ( शाळेत अंड्याचा पदार्थ नेण्यास परवानगी असल्यास)



साहित्य: २ अंडी, तयार चपाती, चिमूटभर हळद, चवीपुरते मीठ, टोमॅटो सॉस, चीज, तेल.



कृती: एका वाटीत चिमूटभर हळद, मीठ घालून २ अंडी फेटून घ्यावी. तव्यावर तेल घालून अर्धे मिश्रण पसरावे. त्यावर चपाती ठेवावी. चपातीवर उरलेलं अंड्याचे मिश्रण घालावे. दोन्ही बाजूने छान भाजावे. वरून टोमॅटो सॉस लावावा. आवडत असल्यास वरून चीज घालावे. पिझ्झा प्रमाणे कापून खावे.

(आवडत असल्यास अंडी फेटताना  बारीक चिरलेला कांदा व शिमला मिरची घालू शकता.)



६. टोमॅटो-बीट-गाजर-लाल भोपळा सूप



( हि रेसिपी मुलांच्या डब्यासाठी नाही. परंतु पौष्टिक असल्याने खाली देत आहे.)



साहित्य: १ टोमॅटो, १ बीट, १ गाजर, छोटासा लाल भोपळ्याचा तुकडा, २-३ लसणाच्या पाकळ्या , ३ काळी मिरी, १ लवंग, छोटासा दालचिनीचा तुकडा, जिरेपूड, तूप, साखर, चवीपुरते मीठ.



कृती: बीट, गाजर व लाल भोपळ्याचे साल काढून छोटे तुकडे करावेत. एका कुकरच्या भांड्यात टोमॅटो व वरील सर्व तुकडे, लसूण पाकळ्या, काळी मिरी, लवंग, दालचिनी घेऊन २ शिट्ट्या घ्याव्यात.

         कुकर थंड झाल्यावर टोमॅटोची साल काढावी. सगळे मिश्रण मिक्सरला बारीक वाटावे. एका भांड्यात तूप गरम करून वरील वाटलेले मिश्रण उकळवावे.  त्यात थोडी जिरेपूड, चवीपुरती साखर आणि मीठ घालावे. गरमागरम प्यायला द्यावे.



      या सूपचा रंग खूप सुरेख येतो. चवीलाही अप्रतिम लागते. पौष्टिक आणि पोटभरीचे असल्याने अधूनमधून नक्की बनवून मुलांसोबतच सगळ्यांनी प्यावे.

















सौ . सोनल दातीर हजारे
संचालिका-  सोनल टूर्स आणि ट्रॅव्हल्स

D:\AMIT DATIR TRAVELS\IMAGE SONAL TOUR\final-sonal-logo-2.jpg





Cont: 9049624196 / 9767874442Website - www.sonaltoursandtravels.com
Email: info@sonaltoursandtravels.com; hajare.sonal@gmail.com