होमिओपॅथी समज गैरसमज आणि बरंच काही ....

             होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीचे जनक डॅा सॅमुअल क्रिस्टिअन हेनिमन यांचा जन्मदिवस १० एप्रील १७५५ दिवस म्हणुन साजरा केला जातॊ. डॅा हेनिमन एम.डी. ऑलोपॅथीचे चिकिस्तक होते. ते ऒषध व रसायनशास्त्राच्या पुस्तकांचे लेखक व अनुवादक होते. त्याकाळातील आधुनीक चिकित्सापद्धती त्यांना अस्वस्थ करत होती. मुख्यत:उच्चरक्तदाब कमी करण्यासाठी रक्तवाहीनी कापुन कृत्रिमरीत्या रक्तस्त्राव होऊ देणे, अतीशय तीव्र औषधांचे डॊस, मरणयातना होईपर्यंत चिकित्सा  त्याकाळातील मुख्य ऑलोपॅथीचे गमक होते हे सर्व पाहुन त्यांनी त्यावेळी आधुनीक चिकित्सा पद्धतीने उपचार करणे सोडुन स्वत: ला पुर्णता एक लेखक व अनुवादक म्हणून समर्पीत केले.




             डॉ हेनिमन सन १७९० मध्ये डॅा विलियम कुलेन यांनी लिहीलेल्या “A TREASURE OF MATERIA MEDICA “पुस्तकाचे अनुवादन करत होते, त्यावेळी त्यातील एका वाक्याने त्यांचे आयुष्य बदलले, “ सिनकोना ह्या वनस्पतीपासुन क्वीनाईन हा अर्क मिळतो त्याने मलेरिया हा आजार बरा होतो कारण क्वीनाईन हे चवीला तुरट असते. त्यांच्या जिज्ञासु बुद्दीला हा शाब्दिक संकेत पटला नाही. कित्येक पदार्थ चवीला तुरट असतात ते सर्व मलेरीया बरा करत नाहीत. मग क्वीनाईन का करतो? ह्याचे उत्तर शॊधण्यासाठी त्यांनी स्वत: क्वीनाईन घ्यायला सुरुवात केली आणि काही दिवसात त्यांना मलेरीया या आजाराची लक्षणे दिसु लागली. हाच प्रयोग त्यांनी आपले मित्र व आप्तेष्तांवर केला, त्यांना देखील तसेच लक्षणे दिसली, अशाप्रकारे त्यांनी विविध औषधी वनस्पती व रसायने यांचे प्रयॊग करून परिक्षण नमुद केले, 6 वर्षानंतर ते एका निष्कर्षास पोहचले. 

           डॉ हेनिमन यांनी सन १७९६ साली नविन चिकित्सा पद्धतीचा शॊध लावला. जी पुर्णतः निसर्गाच्या नियमांवर आधारित होती. यापद्धतीनुसार औषध व आजार हे दोघेही सारखेच लक्षण दाखवतात म्हणुन एकमेकांना रद्द करतात व रुग्णाला पुन्हा निरोगी बनवतात. काट्याने काटा काढणे म्हणजेच“ सिमीलीया सिमीलीबस क्युरेन्टर” ह्या नवीन सिद्धांताचा शोध लावला. होमिओपॅथी ही चिकित्सा पद्धती पुर्णत:  निसर्गाच्या नियमावर अवलंबुन आहे. नियम हे नेहमी निश्चित असतात, म्हणूनच तर  २५० वर्षापुर्वी शोध लागलेल्या ह्या चिकित्सापद्धतीचा आजही त्याच नियमांच्या आधारांने योग्य वापर होत आहे. २५० वर्षात कित्येक नविन आजारांचा शोध लागला पण त्या आजारांच्या उपचारासाठी आजही होमीयोपॅथी सक्षम आहे. होमिओपॅथी औषध हे जिवंत मनुष्यांवर तपासली जातात तर ऑलोपॅथीची औषधे हि प्राण्यांवर तपासली जातात म्हणून त्यांच्यात फक्त शारीरिक लक्षणे मिळतात , पण मनाचे लक्षण मिळत नाही. त्यामुळेच मनुष्यां चा आजार पूर्णतः बरा करण्यासाठी होमिओपॅथी औषधांचा उपयोग होतो.  

              जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुसार, आजार नसणे म्हणजे निरोगी असे नाही. तर आरोग्य म्हणजे माणसाची अशी अवस्था ज्यात मनुष्य शारीरिक , मानसिक आणि सामाजीक रित्या  पुर्णतः बरा असतो. आजार हा शरीरावर येतो हे जरी खरे असले तरी त्याचे मूळ हे मनातच असते व मनाला अनुसरुनच ह्या जगातील १०० % आजार आहे , म्हणून तर साधा ताप म्हटलं तरी तो मनाच्या अद्वैत रूपाचे प्रात्यक्षिक स्वरूप आहे. होमिओपॅथी व्यतिरिक्त इतर कुठल्याही पॅथीमध्ये रोगमुक्ती पूर्ण होऊच शकत नाही. अपघात (ACCIDENT) सोडून विश्वातील प्रत्येक आजार मनाचे वैफल्य होय. होमिओपॅथी आजाराच्या मुळाशी जाऊन वर्माला ठेच पोहचवून त्याला रोगमुक्त करण्यास उपयुक्त होते.                                                                                                      

               दिर्घकांलीन आजारांचे तणाव हे महत्वाचे कारण आहे, हे सत्य जवळ जवळ सर्वच उपचार पद्धतींनी मान्य केले आहे. तणाव शरीरातील काही संप्रेरके वाढवीतो उदाहणार्थ अड्रेनलीन , नोरॅड्रेनॅलीन व कॉर्टिकोस्टिरॉईड यामूळे श्वसनाची गती  वाढते, ह्रदयाचे स्पंदने वाढ़तात, आंत्रचालन म्हणजे आतड्यांच्या हलचाली वाढतात आणी स्नायु मधे तणाव येतॊ. जर तणाव जास्त काळ राहीला तर तॊ विविध व्याधींना आमंत्रण देतो. उदाहरणार्थ उच्च रक्तदाब, मधुमेह,  हृदयरोग, थायरॉईड,  कर्करोग , त्वचारोग़ , जठराची सुज , मानसीक आजार इत्यादी अनेक आजारांना तणाव कारणीभूत असतो. आधुनिक वैदक शास्रामुळे आजार तात्पुरता बरा होतो परंतु वारंवार होणाऱ्या आजारापासून रुग्णाला मुक्तता मिळत नाही यामुळे डॉ हेनिमन यांच्या जिज्ञासू बुद्धीने होमिओपॅथीचा शोध लावला आणि  रुग्ण एकाच वेळी मानसिक आणि शारीरिक व्याधीतून मुक्त होऊ लागले. 

               पूर्वीचे आरोग्य व आजच्या काळातील आरोग्यात खूप तफावत दिसून येते. ऑलोपॅथीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात संशोधन होऊन नवनवीन औषधांचा  शोध लागत असताना आयुष्मान कमी का झाले व जुन्याकाळातील एवढ्या आजारातूनही रोग कमी होऊन आयुष्मान १०० वर्षापर्यंत सहज का होते.  तरी पूर्वीच्या प्रमाणात आज आयुष्मान कमी का होत चाललेले आहे. यावर विचार करण्याची वेळ सध्या आली आहे आणि त्याला उत्तर म्हणजे अगदी सोपे ते म्हणजे आजारांपेक्षा औषधीच भयावह होत आहे. रुग्णालयात चालत जाणारा रुग्ण मृत्युशय्येवर परत येत आहे. कारण औषधांचा भडीमार आवश्यकतेपेक्षा जास्त होत आहे.


 होमिओपॅथी उपचारच का ?

1. होमिओपॅथी ही समग्र चिकित्सापद्धती आहे. व्याधीवर उपचार करताना व्यक्तीच्या मानसिक , शारिरीक सामाजिकह्या सर्व पातळीचा विचार केला जातॊ.

2. होमिओपॅथी औषधी वनस्पती, प्राणी ,रसायन , सूर्यचंद्राची किरणे, पूयविष पासून तयार केले जाते. मात्र ते तीव्रतेने पोटेंसिच्या माध्यमाने कमी केले जाऊन त्याची गुणवत्ता वाढवली जाते म्हणून ते अमृततुल्य विषाला मारणारे शास्त्र आहे.

3. होमिओपॅथी औषधी  शरीराची रोगप्रतिकारशक्तीचा विचार करून दिले जाते.


कल्पित कथा ..... (अपप्रचार)

1. होमिओपॅथी औषधांनी उपचारास  दीर्घ वेळ लागतो.

2. होमिओपॅथी औषधें घेण्यासाठी खूप प्रतिबंध आहे व खूप पदार्थ वर्ज्य करावे लागतात.

3. होमिओपॅथी औषधें नसून नुसत्या गोळ्या आहेत ज्या मानसिक समाधान देतात.

4. होमिओपॅथी गंभीर आजारांवर काम करत नाही.

5. होमिओपॅथी औषधांमध्ये स्टिरॉइड असते.

तथ्य ... 

1. होमिओपॅथी एकमेव उपचार पध्द्ती आहे जी तुरंत प्रभाव दाखवते.

2. होमिओपॅथी औषधें घेताना आजार सुरवातीला थोडा वाढतो  किंवा सर्दी, ताप, अंगावर खाज

येणे हे लक्षणे रुग्णांना दिसू शकता पण हे रुग्ण्याचा आजार पूर्णतः बरे करण्यासाठी चांगले आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.

3. होमिओपॅथी आजच्या काळातील सर्वाधिक सुरक्षित आणि योग्य चिकित्सा पद्धती आहे जी रुग्णाला सर्व व्याधीतून मुक्त करते.

            होमिओपॅथी  सूक्ष्म औषधी चिकित्सा पद्धती मनुष्याला देण ठरली आहे हे विशेष डॉ हॅनिमॅन यांच्या जयंती निमित्त सांगावेसे वाटते. म्हणून होमिओपॅथी प्लासिबो नसून एक सूक्ष्म अनुरुपी शक्ती आहे हे अनुभवले तरच कळेल.













लेखिका 

डॉ रत्ना चोपडे

Ph.D. Sch. M.D. (Homoeo), 

P.G.D.P.C. M.S. (Psychotherapy & Counseling)

डॉ. रत्नाज होमिओपॅथी

PH.NO. 9370813914