शाळेत जाणाऱ्या मुलांच्या आईंना पडणारा नेहमीचा प्रश्न म्हणजे डब्यात काय देऊ? जेणेकरून मुलं पौष्टिक खातील आणि डबा पूर्ण खाल्ला जाईल. अशाच काही पाककृती मी खाली सांगत आहे ज्या माझ्या ३ वर्षांच्या मुलाला खूपच आवडतात. ज्यातून मी त्याला जास्तीत जास्त पौष्टिक खाऊ घालण्याचा प्रयत्न करते.
१. मँगो शिरा
साहित्य: रवा १ वाटी, तूप अर्धी वाटी, साखर अर्धी वाटी, मँगो पल्प अर्धी वाटी, दूध व पाणी यांचे समप्रमाणात मिश्रण १ वाटी, बदाम, काजू, पिस्ते, अक्रोड यांची बारीक पूड, वेलची पावडर.
कृती: जाड बुडाच्या पातेल्यात / कढईत तूप गरम करुन त्यावर रवा खमंग भाजून घ्यावा. त्यावर हळूहळू गरम दूध घालावे आणि रवा परतून घ्यावा. रवा छान फुलतो. ५ मिनिट झाकण ठेवून रवा चांगला शिजू द्यावा.
यात अर्धी वाटी मँगो पल्प आणि साखर घालून परतावे. वरून ड्रायफ्रुट्सची पूड आणि वेलची पावडर घालून परतावे. असा हा मँगो शिरा चवीला खूपच सुरेख लागतो.
(मुलांना ड्रायफ्रुट्सचे काप आवडत असतील तर पावडर न करता काप घातले तरी चालतील.)
२. मिश्र पिठाचे धपाटे
भाजणीच्या थालिपीठाप्रमाणे निरनिराळी पीठे वापरून बनवलेले धपाटे देखील छान लागतात आणि पौष्टिक असतात.
साहित्य: गव्हाचे पीठ १ वाटी, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणीचे पीठ प्रत्येकी अर्धी वाटी, बेसन पाव वाटी, किसलेले गाजर अर्धी वाटी, किसलेले बीट व दुधी प्रत्येकी पाव वाटी, बारीक चिरलेली मेथी व कोथिंबीर प्रत्येकी पाव वाटी, बारीक चिरलेला कांदा १, आले-लसूण पेस्ट १ मोठा चमचा, हिंग १ छोटा चमचा, धणे-जिरेपूड १ छोटा चमचा, चवीप्रमाणे लाल तिखट आणि मीठ, तूप.
कृती: गाजर, बीट, दुधी, मेथी, कोथिंबीर, कांदा सगळे एकत्र करून घ्यावे. त्यात सर्व पीठे घालावीत. हिंग, आले-लसूण पेस्ट, धणे-जिरेपूड, लाल तिखट व मीठ घालून, गरजेनुसार पाणी घालून साधारण घट्टसर मळून घ्यावे.
याचे छोटे गोळे बनवून लाटून घ्यावेत किंवा कापडावर थापून घ्यावेत. तव्यावर तूप घालून खमंग भाजावेत. हे धपाटे दही, लोणचे, टोमॅटो सॉस सोबत छान लागतात.
(कांद्याला पाणी सुटत असल्याने पीठ मळल्यावर लगेच धपाटे बनवावेत. यात आपल्या आवडीप्रमाणे पालक, कोबी देखील वापरू शकतो.)
३. पौष्टिक रवा अप्पे
साहित्य: रवा १ वाटी, दही १ वाटी, किसलेले गाजर अर्धी वाटी, वाफवलेले मटारचे दाणे पाव वाटी, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो प्रत्येकी १, चवीनुसार मीठ, तेल.
कृती: रव्यात १ वाटी दही घालून अर्धा तास मुरवत ठेवावे. त्यानंतर चांगले फेटून घ्यावे. त्यात वाफवलेले मटारचे दाणे, कांदा, टोमॅटो, किसलेले गाजर व चवीप्रमाणे मीठ घालून चांगले ढवळावे.
गरजेप्रमाणे पाणी घालून मिश्रण तयार करावे. अप्पेपात्र गरम करून त्यात थोडे तेल घालून वरील मिश्रण घालावे आणि अप्पे बनवावेत. दोन्ही बाजूने भाजावेत. हे पौष्टिक अप्पे खोबरे चटणी सोबत छान लागतात.
वरील मिश्रण इडलीपात्रात लावल्यास रंगीत व पौष्टिक इडली बनवता येते.
४. व्हेज रोल
साहित्य: तयार चपाती, रोल भाजायला तूप, कोणतीही तयार भाजी ( बटाटा, कोबी, फ्लॉवर इ.), शेंगदाण्याची भरड, टोमॅटो सॉस.
कृती: तयार चपातीला टोमॅटो सॉस लावावा. त्यावर एका कोपऱ्यात भाजी ठेवून त्यावर शेंगदाण्याची भरड घालावी. चपातीचा रोल करून तव्यावर तूप घालून खमंग भाजावा. छोटे तुकडे करून डब्यात द्यावा.
( रोल लगेच खायचा असल्यास त्यात बारीक चिरलेला कांदा देखील छान लागतो.)
५. ऑम्लेट पिझ्झा ( शाळेत अंड्याचा पदार्थ नेण्यास परवानगी असल्यास)
साहित्य: २ अंडी, तयार चपाती, चिमूटभर हळद, चवीपुरते मीठ, टोमॅटो सॉस, चीज, तेल.
कृती: एका वाटीत चिमूटभर हळद, मीठ घालून २ अंडी फेटून घ्यावी. तव्यावर तेल घालून अर्धे मिश्रण पसरावे. त्यावर चपाती ठेवावी. चपातीवर उरलेलं अंड्याचे मिश्रण घालावे. दोन्ही बाजूने छान भाजावे. वरून टोमॅटो सॉस लावावा. आवडत असल्यास वरून चीज घालावे. पिझ्झा प्रमाणे कापून खावे.
(आवडत असल्यास अंडी फेटताना बारीक चिरलेला कांदा व शिमला मिरची घालू शकता.)
६. टोमॅटो-बीट-गाजर-लाल भोपळा सूप
( हि रेसिपी मुलांच्या डब्यासाठी नाही. परंतु पौष्टिक असल्याने खाली देत आहे.)
साहित्य: १ टोमॅटो, १ बीट, १ गाजर, छोटासा लाल भोपळ्याचा तुकडा, २-३ लसणाच्या पाकळ्या , ३ काळी मिरी, १ लवंग, छोटासा दालचिनीचा तुकडा, जिरेपूड, तूप, साखर, चवीपुरते मीठ.
कृती: बीट, गाजर व लाल भोपळ्याचे साल काढून छोटे तुकडे करावेत. एका कुकरच्या भांड्यात टोमॅटो व वरील सर्व तुकडे, लसूण पाकळ्या, काळी मिरी, लवंग, दालचिनी घेऊन २ शिट्ट्या घ्याव्यात.
कुकर थंड झाल्यावर टोमॅटोची साल काढावी. सगळे मिश्रण मिक्सरला बारीक वाटावे. एका भांड्यात तूप गरम करून वरील वाटलेले मिश्रण उकळवावे. त्यात थोडी जिरेपूड, चवीपुरती साखर आणि मीठ घालावे. गरमागरम प्यायला द्यावे.
या सूपचा रंग खूप सुरेख येतो. चवीलाही अप्रतिम लागते. पौष्टिक आणि पोटभरीचे असल्याने अधूनमधून नक्की बनवून मुलांसोबतच सगळ्यांनी प्यावे.

सौ . सोनल दातीर हजारे
संचालिका- सोनल टूर्स आणि ट्रॅव्हल्स
Cont: 9049624196 / 9767874442Website - www.sonaltoursandtravels.com
Email: info@sonaltoursandtravels.com; hajare.sonal@gmail.com