गर्भाशयाचा कॅन्सर म्हणजे काय?
गर्भाशयाच्या आतील आवरणामधील पेशींमध्ये बदल होतो. त्या पेशी फार भरभर वाढायला लागतात. तसेच त्यांच्या रचनेतही बदल होतो. हळूहळू त्या इतक्या संख्येने वाढतात की, गर्भाशयाच्या स्नायूंमध्ये, गर्भाशयाच्या मुखाजवळ (सर्व्हिक्स) तसेच रक्तवाहिन्यांद्वारा शरीरात इतर ठिकाणी पसरत जातात. अशा प्रकारच्या रोगाला गर्भाशयाचा कॅन्सर असे म्हणतात.
याची लक्षणे कोणती?
• कॅन्सरच्या अगदी प्राथमिक अवस्थेत दुर्दैवाने फारशी बाह्य लक्षणे दिसून येत नाहीत. या आवरणाचा सूक्ष्मदर्शक यंत्राने तपास केला (हिस्टोपॅथॉलॉजिकल एक्झामिनेशन) तर कॅन्सरच्या पेशी आढळून येऊ शकतात.
• मासिक पाळी पूर्ण बंद झाल्यानंतर परत रक्तस्राव झाल्यास कॅन्सरची शक्यता असू शकते.
• मासिक पाळीमध्ये अचानक रक्तस्राव होणे, खूप जास्त रक्तस्राव होणे, शरीरसंबंधानंतर रक्तस्राव होणे ही लक्षणे आढळून येतात.
उपाययोजना कशावर अवलंबून असते?
• कॅन्सर कुठपर्यंत पसरला आहे? (स्टेज ऑफ डिसीज)
• कॅन्सरच्या पेशी किती प्रमाणात बदललेल्या आहेत? (ग्रेड)
• इतर काही आजार आहेत का?
• वय किती आहे?
• मुख्यत: स्टेज आणि ग्रेड यांच्यावर दिली जाणारी उपाययोजना अवलंबून असते.
कॅन्सरची शक्यताकधी जास्त असते?
l मूल न झालेल्या स्त्रियांमध्ये हा रोग जास्त आढळतो.
l मासिक पाळी वयाच्या 55 वर्षांनंतर बंद झाल्यास.
l अनेक वष्रे इस्ट्रोजेनच्या गोळ्या घेतल्यास.
l सर्वात पहिली मासिक पाळी वयाच्या 12व्या वर्षाआधी सुरू झाल्यास व खूप उशिरा बंद झाल्यास.
l जर आई, मावशी, बहीण किंवा मुलगी यांपैकी कोणाला गर्भाशयाचा कॅन्सर झालेला असल्यास.
l ओटीपोटात काही कारणासाठी रेडिएशन थेरपी घेतली असल्यास.
l स्तनांच्या कॅन्सरसाठी टॅमॉक्सिफेन नावाचे औषध अनेक दिवस घेतल्यास.
l या सर्व संख्याशास्त्राच्या आधारे असलेल्या शक्यता आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.
कोणत्या उपाययोजना आहेत?
शस्त्रक्रिया, रेडिओथेरपी, केमोथेरपी, हार्मोनल थेरपी इत्यादी उपाययोजना कराव्या लागतात. यापैकी कोणत्या उपाययोजना कधी करायच्या हे तज्ज्ञ डॉक्टर ठरवतात. प्रत्येक पेशंटच्या निदानावर ते अवलंबून असते.
कोणत्या तपासण्या करून
निदान करता येते?
• तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णाची तपासणी सर्वप्रथम करून घ्यावी.
• पॅप स्मियर - गर्भाशयाच्या तोंडावरील (सर्विक्स) स्राव तपासून कॅन्सरच्या पेशी बघता येतात.
• पेल्विक सोनोग्राफी - अगदी सहज करता येणारा हा तपास निदानासाठी खूप मदत करतो.
• आतील आवरण काढून त्याचा सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपास (एंडोमेट्रियल बायोप्सी विथ हिस्टोपॅथॉलॉजी)
• दुर्बिणीद्वारे तपासणी (हिस्टेरोस्कोपी) - कोणता भाग संशयास्पद वाटतो आहे इ. दुर्बिणीने बघता येते.
• एमआरआय - कॅन्सर कुठपर्यंत पसरला आहे याचे अचूक निदान यात करता येते.
• छाती, यकृत आदींचे एक्स-रे - हे तपास कॅन्सर पसरला असल्यास व शस्त्रक्रियेपूर्वी करावे लागतात.

No comments:
Post a Comment