सम विषम तिथीला संग, मुलगा की मुलगी आणि विज्ञान



सध्या हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर त्यांच्या वादग्रस्त विधानाने चर्चेत आहेत . सम तिथीला संभोग केल्यास मुलगी आणि विषम तिथीला संभोग केल्याने मुलगा . निवृत्ती महाराज एक कीर्तनकार प्रबोधनकार म्हणून निश्चितच आदरणीय आहे पण त्यांच्या वरील वाक्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही .  कीर्तनकार म्हणून महाराजांचा आदर जरूर करा पण चुकीच्या गोष्टींना समर्थन कृपया करून करू नका .  आयुर्वेद महान आहे पण म्हणतेतही काही कमतरता असतेच ना ? आयुर्वेद हे शास्त्र आहे आणि शास्त्र कधीच परिपूर्ण नसते ते प्रत्येकवेळी दुरुस्त होत जाते . आपण आधुनिक भाषेत त्याला रिसर्च म्हणतो तो झालाच नाही तर शास्त्र निरुपयोगी होऊन जाते कालबाह्य होते हे ध्यानात घ्या .
आयुर्वेद म्हणाल तर कित्येक गोष्टी या आयुर्वेदात दिलेल्या विज्ञानाने सिद्ध केले आहे की चुकीच्या आहेत . जुने बरोबर असेल ते ठेवा चुकीचे असेल तर दुरुस्त करा असे विज्ञान सांगते .
1. मुळात ज्या तिथीला संभोग झाला त्या तिथीला स्त्रीबीज बाहेर पडले असेलच असे नसते .
2. असंख्य शुक्राणू वेगाने गर्भाशयाच्या दिशेने सरकतात आणि त्यातील सर्वात प्रथम ज्याचे मिलन होते त्यानुसार गर्भधारणा होते
3. संतती कशी निपजेल हे तर सर्वस्वी घरातील वातावरण मुलाची सांगत यावर अवलंबून आहे .
4. मुलगा व्हावा यासाठी कुठलाही मंत्र तंत्र उपचार अस्तित्वात नाही आणि तो करूही नये
5. मुलगा आणि मुलगी दोघेही निसर्गाने दिलेले तुमच्या प्रेमाचे मूर्त रूप आहे त्याचा आनंदाने स्वीकार करावा
6. ज्यांना अपत्य नाही त्यांना विचारा मुलगा की मुलगी .
7. वंशाला दिवाच पाहिजे हा 18 व्या शतकातला विचार सोडा , कितीतरी मुलींनी आपल्या वडिलांच्या किर्तीध्वजाची काठी उत्तुंग शिखरी नेली आहे
8. असा विचार करण्याआधी आपली आई आठवा बहीण आठवा  बायको आठवा त्यांच्याशिवाय तुमचे जीवन परिपूर्ण आहे का ?
9. इंदुरीकर महाराजांच्याच भाषेत सांगतो खुळ्याहो लोटांगण घालतो पण वंशाला दिवाच पाहिजे हा हट्ट सोडा . आजकाल दिवे काय दिवे लावताय हे महाराज स्वतःच सांगतात . कधीतरी देवघरातील समयी साठी सुद्धा परमेश्वराकडे प्रार्थना करा

कुठल्याही कीर्तनकार महाराजांवर टीका करण्याची माझी पात्रता नाही पण जे विज्ञाननिष्ठ मनाला पटले नाही त्याचे समर्थनही माझ्याकडून होणार नाही

जय जिजाऊ जय अहिल्यादेवी जय सावित्रीमाई जय रमाई 

No comments:

Post a Comment