चिया सीड्स खाण्याचे 7 फायदे




सर्वच प्रकारच्या बिया आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण महिलांच्या आरोग्याचा विचार करता चिया सीड्स (chia seeds) जास्त फायदेशीर असतात. पोषण तज्ज्ञ मेघा मुखीजा यांनी महिलांनी आहरात चिया सीड्सचा समावेश का करायला हवा याबाबत सविस्तर माहिती तर दिली आहेच शिवाय चिया सीड्सचा एक पौष्टिक पदार्थ देखील सांगितला आहे. चिया सीड्समध्ये ओमेगा 3 हे फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतं. तसेच यात फायबर, प्रथिनं, जीवनसत्वं, खनिजंही असतात. चिया सीड्समधील (chia seeds benefits) पोषक घटकांमुळे महिलांच्या आरोग्यास (chia seeds for women health) अनेक फायदे होतात.

चिया सीड्स महत्वाचे आहेत कारण... 

1. चिया सीड्समध्ये ओमेगा 3 हे फॅटी ॲसिड भरपूर असतं. महिलांमध्ये प्रामुख्यानं ओमेगा 3 या घटकाची कमतरता आढळते. ओमेगा 3 या घटकाची महिलांच्या शरीराला जास्त गरज असते. ओमेगा 3 हे फॅटी ॲसिड शरीरावरची सूज कमी करण्यास आणि ह्दयरोगाचा धोका कमी करण्यास फायदेशीर असतं.

2. सूज आणि दाहविरोधी गुणधर्मामुळे चिया सीड्स हदयाच्या आरोग्यासाठी महत्वाचे असतात. चिया सीड्समधील फायबर आणि ओमेगा 3 मुळे ट्रा इग्लिसराइड्स हा रक्तातील घटक अर्थात बॅड कोलेस्टेराॅल कमी होतं.

 3. वजन कमी करण्यासाठी आहारात चिया सीड्स अवश्य असायला हवेत. चिया सीड्समध्ये प्रथिनं आणि फायबर मोठ्या प्रमाणात असतात. हे दोन्ही घटक वजन कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. चिया सीड्समध्ये विरघळणारे फायबर असतात. यामुळे आतड्यातील चांगल्या जिवाणुंची वाढ होते. वजन कमी होण्यासाठी आतड्यांचं आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे. चिया सीड्स आतड्यांचं आरोग्य राखण्यास मदत करतात.  


4. मेनोपाॅजनंतर होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळे महिलांच्या हाडांच्या तक्रारी सुरु होतात. मेनोपाॅजनंतर हाडं मजबूत राखण्यासाठी चिया सीड्स महत्वाचे असतात. चिया सीड्समध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फाॅस्फरस या घटकांचं प्रमाण अधिक असतं. हे सर्व घटक हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचे असतात. चिया सीड्समधील सूजविरोधी घटक संधिवाताची समस्या रोखण्यास मदत करतात.

5. चिया सीड्समध्ये अल्फा लिनोलेइक ॲसिड भरपूर प्रमाणात असतं. या ॲसिडचा उपयोग स्तनांच्या कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी होतो. 6. शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत करण्यास चिया सीड्समधील ओमेगा 3 फॅटी ॲसिड उपयुक्त असतं. रक्तप्रवाह चांगला असल्यास त्वचेचा कोरडेपणा, सूज या समस्या दूर होतात. मॅनचेस्टर येथील एका अभ्यासानुसार ओमेगा 3 मुळे त्वचेचं सूर्याच्या अति नील किरणांपासून संरक्षण होतं. चिया सीड्समधील गुणधर्मांमुळे त्वचा सैल पडत नाही.


Source : www.lokmat.com

Top 5 lifestyle changes to improve your cholesterol in marathi

 हृदय निरोगी ठेवतील असा आहार घेणे 





नियमित व्यायाम 




धूम्रपान बंद करणे 



वजन कमी करणे 



औषधे 

होमिओपॅथी समज गैरसमज आणि बरंच काही ....

             होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीचे जनक डॅा सॅमुअल क्रिस्टिअन हेनिमन यांचा जन्मदिवस १० एप्रील १७५५ दिवस म्हणुन साजरा केला जातॊ. डॅा हेनिमन एम.डी. ऑलोपॅथीचे चिकिस्तक होते. ते ऒषध व रसायनशास्त्राच्या पुस्तकांचे लेखक व अनुवादक होते. त्याकाळातील आधुनीक चिकित्सापद्धती त्यांना अस्वस्थ करत होती. मुख्यत:उच्चरक्तदाब कमी करण्यासाठी रक्तवाहीनी कापुन कृत्रिमरीत्या रक्तस्त्राव होऊ देणे, अतीशय तीव्र औषधांचे डॊस, मरणयातना होईपर्यंत चिकित्सा  त्याकाळातील मुख्य ऑलोपॅथीचे गमक होते हे सर्व पाहुन त्यांनी त्यावेळी आधुनीक चिकित्सा पद्धतीने उपचार करणे सोडुन स्वत: ला पुर्णता एक लेखक व अनुवादक म्हणून समर्पीत केले.




             डॉ हेनिमन सन १७९० मध्ये डॅा विलियम कुलेन यांनी लिहीलेल्या “A TREASURE OF MATERIA MEDICA “पुस्तकाचे अनुवादन करत होते, त्यावेळी त्यातील एका वाक्याने त्यांचे आयुष्य बदलले, “ सिनकोना ह्या वनस्पतीपासुन क्वीनाईन हा अर्क मिळतो त्याने मलेरिया हा आजार बरा होतो कारण क्वीनाईन हे चवीला तुरट असते. त्यांच्या जिज्ञासु बुद्दीला हा शाब्दिक संकेत पटला नाही. कित्येक पदार्थ चवीला तुरट असतात ते सर्व मलेरीया बरा करत नाहीत. मग क्वीनाईन का करतो? ह्याचे उत्तर शॊधण्यासाठी त्यांनी स्वत: क्वीनाईन घ्यायला सुरुवात केली आणि काही दिवसात त्यांना मलेरीया या आजाराची लक्षणे दिसु लागली. हाच प्रयोग त्यांनी आपले मित्र व आप्तेष्तांवर केला, त्यांना देखील तसेच लक्षणे दिसली, अशाप्रकारे त्यांनी विविध औषधी वनस्पती व रसायने यांचे प्रयॊग करून परिक्षण नमुद केले, 6 वर्षानंतर ते एका निष्कर्षास पोहचले. 

           डॉ हेनिमन यांनी सन १७९६ साली नविन चिकित्सा पद्धतीचा शॊध लावला. जी पुर्णतः निसर्गाच्या नियमांवर आधारित होती. यापद्धतीनुसार औषध व आजार हे दोघेही सारखेच लक्षण दाखवतात म्हणुन एकमेकांना रद्द करतात व रुग्णाला पुन्हा निरोगी बनवतात. काट्याने काटा काढणे म्हणजेच“ सिमीलीया सिमीलीबस क्युरेन्टर” ह्या नवीन सिद्धांताचा शोध लावला. होमिओपॅथी ही चिकित्सा पद्धती पुर्णत:  निसर्गाच्या नियमावर अवलंबुन आहे. नियम हे नेहमी निश्चित असतात, म्हणूनच तर  २५० वर्षापुर्वी शोध लागलेल्या ह्या चिकित्सापद्धतीचा आजही त्याच नियमांच्या आधारांने योग्य वापर होत आहे. २५० वर्षात कित्येक नविन आजारांचा शोध लागला पण त्या आजारांच्या उपचारासाठी आजही होमीयोपॅथी सक्षम आहे. होमिओपॅथी औषध हे जिवंत मनुष्यांवर तपासली जातात तर ऑलोपॅथीची औषधे हि प्राण्यांवर तपासली जातात म्हणून त्यांच्यात फक्त शारीरिक लक्षणे मिळतात , पण मनाचे लक्षण मिळत नाही. त्यामुळेच मनुष्यां चा आजार पूर्णतः बरा करण्यासाठी होमिओपॅथी औषधांचा उपयोग होतो.  

              जागतिक आरोग्य संघटना (WHO) नुसार, आजार नसणे म्हणजे निरोगी असे नाही. तर आरोग्य म्हणजे माणसाची अशी अवस्था ज्यात मनुष्य शारीरिक , मानसिक आणि सामाजीक रित्या  पुर्णतः बरा असतो. आजार हा शरीरावर येतो हे जरी खरे असले तरी त्याचे मूळ हे मनातच असते व मनाला अनुसरुनच ह्या जगातील १०० % आजार आहे , म्हणून तर साधा ताप म्हटलं तरी तो मनाच्या अद्वैत रूपाचे प्रात्यक्षिक स्वरूप आहे. होमिओपॅथी व्यतिरिक्त इतर कुठल्याही पॅथीमध्ये रोगमुक्ती पूर्ण होऊच शकत नाही. अपघात (ACCIDENT) सोडून विश्वातील प्रत्येक आजार मनाचे वैफल्य होय. होमिओपॅथी आजाराच्या मुळाशी जाऊन वर्माला ठेच पोहचवून त्याला रोगमुक्त करण्यास उपयुक्त होते.                                                                                                      

               दिर्घकांलीन आजारांचे तणाव हे महत्वाचे कारण आहे, हे सत्य जवळ जवळ सर्वच उपचार पद्धतींनी मान्य केले आहे. तणाव शरीरातील काही संप्रेरके वाढवीतो उदाहणार्थ अड्रेनलीन , नोरॅड्रेनॅलीन व कॉर्टिकोस्टिरॉईड यामूळे श्वसनाची गती  वाढते, ह्रदयाचे स्पंदने वाढ़तात, आंत्रचालन म्हणजे आतड्यांच्या हलचाली वाढतात आणी स्नायु मधे तणाव येतॊ. जर तणाव जास्त काळ राहीला तर तॊ विविध व्याधींना आमंत्रण देतो. उदाहरणार्थ उच्च रक्तदाब, मधुमेह,  हृदयरोग, थायरॉईड,  कर्करोग , त्वचारोग़ , जठराची सुज , मानसीक आजार इत्यादी अनेक आजारांना तणाव कारणीभूत असतो. आधुनिक वैदक शास्रामुळे आजार तात्पुरता बरा होतो परंतु वारंवार होणाऱ्या आजारापासून रुग्णाला मुक्तता मिळत नाही यामुळे डॉ हेनिमन यांच्या जिज्ञासू बुद्धीने होमिओपॅथीचा शोध लावला आणि  रुग्ण एकाच वेळी मानसिक आणि शारीरिक व्याधीतून मुक्त होऊ लागले. 

               पूर्वीचे आरोग्य व आजच्या काळातील आरोग्यात खूप तफावत दिसून येते. ऑलोपॅथीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात संशोधन होऊन नवनवीन औषधांचा  शोध लागत असताना आयुष्मान कमी का झाले व जुन्याकाळातील एवढ्या आजारातूनही रोग कमी होऊन आयुष्मान १०० वर्षापर्यंत सहज का होते.  तरी पूर्वीच्या प्रमाणात आज आयुष्मान कमी का होत चाललेले आहे. यावर विचार करण्याची वेळ सध्या आली आहे आणि त्याला उत्तर म्हणजे अगदी सोपे ते म्हणजे आजारांपेक्षा औषधीच भयावह होत आहे. रुग्णालयात चालत जाणारा रुग्ण मृत्युशय्येवर परत येत आहे. कारण औषधांचा भडीमार आवश्यकतेपेक्षा जास्त होत आहे.


 होमिओपॅथी उपचारच का ?

1. होमिओपॅथी ही समग्र चिकित्सापद्धती आहे. व्याधीवर उपचार करताना व्यक्तीच्या मानसिक , शारिरीक सामाजिकह्या सर्व पातळीचा विचार केला जातॊ.

2. होमिओपॅथी औषधी वनस्पती, प्राणी ,रसायन , सूर्यचंद्राची किरणे, पूयविष पासून तयार केले जाते. मात्र ते तीव्रतेने पोटेंसिच्या माध्यमाने कमी केले जाऊन त्याची गुणवत्ता वाढवली जाते म्हणून ते अमृततुल्य विषाला मारणारे शास्त्र आहे.

3. होमिओपॅथी औषधी  शरीराची रोगप्रतिकारशक्तीचा विचार करून दिले जाते.


कल्पित कथा ..... (अपप्रचार)

1. होमिओपॅथी औषधांनी उपचारास  दीर्घ वेळ लागतो.

2. होमिओपॅथी औषधें घेण्यासाठी खूप प्रतिबंध आहे व खूप पदार्थ वर्ज्य करावे लागतात.

3. होमिओपॅथी औषधें नसून नुसत्या गोळ्या आहेत ज्या मानसिक समाधान देतात.

4. होमिओपॅथी गंभीर आजारांवर काम करत नाही.

5. होमिओपॅथी औषधांमध्ये स्टिरॉइड असते.

तथ्य ... 

1. होमिओपॅथी एकमेव उपचार पध्द्ती आहे जी तुरंत प्रभाव दाखवते.

2. होमिओपॅथी औषधें घेताना आजार सुरवातीला थोडा वाढतो  किंवा सर्दी, ताप, अंगावर खाज

येणे हे लक्षणे रुग्णांना दिसू शकता पण हे रुग्ण्याचा आजार पूर्णतः बरे करण्यासाठी चांगले आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.

3. होमिओपॅथी आजच्या काळातील सर्वाधिक सुरक्षित आणि योग्य चिकित्सा पद्धती आहे जी रुग्णाला सर्व व्याधीतून मुक्त करते.

            होमिओपॅथी  सूक्ष्म औषधी चिकित्सा पद्धती मनुष्याला देण ठरली आहे हे विशेष डॉ हॅनिमॅन यांच्या जयंती निमित्त सांगावेसे वाटते. म्हणून होमिओपॅथी प्लासिबो नसून एक सूक्ष्म अनुरुपी शक्ती आहे हे अनुभवले तरच कळेल.













लेखिका 

डॉ रत्ना चोपडे

Ph.D. Sch. M.D. (Homoeo), 

P.G.D.P.C. M.S. (Psychotherapy & Counseling)

डॉ. रत्नाज होमिओपॅथी

PH.NO. 9370813914

list of medical examinations to be conducted after thirty men and women

 तिशी  नंतरच्या वैद्यकीय  तपासण्या 

प्रिय मित्रानो , आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपण नेहमी व्यस्त असतो . आपल्या शरीराची हाक ऐकण्याची आपली तयारी नसते आणि तिशी नंतरचा कालावधी हा किती कमवू आणि किती नको कारण लाथ मारील तिथं पाणी काढील अशी आपली ऊर्जा असते . पण मध्येच ऐकू येतं अमुक हा गेला अरे फक्त ३८ चा होता , ४२ चा होता हे काय वय आहे का जाण्याचं ? तो एका दिवसात गेला का ? नक्कीच नाही .  गेल्यानंतर फक्त स्वर्गातल्या अप्सरा दिसतात , बायका पोरं नाही . मध्यंतरी मला जेवण करतांना घाम येऊ लागला आणि लक्ष्यात आलं काहीतरी बिघडलंय . व्यायाम सिरियसली चालू केला . खूप काही वजन कमी नाही झालंय पण प्रामाणिकपणे सुरुवात केलीय . 

तिशी नंतरच्या ७ टेस्ट पुढे पुढे सांगतो , करून घ्या पुरुष आणि महिलांनी सुद्धा 

१ ब्लड प्रेशर . अमेरिकन हार्ट असोशियन सांगते विशी नंतर दर दोन वर्षांनी ब्लड प्रेशर  टेस्ट केली पाहिजे आणि चाळिशीनंतर दर   वर्षी 

२ कोलेस्टेरॉल . दर सहा महिन्यांनी कोलेस्ट्रॉल चेक केलं पाहिजे 

त्यात माझ्या सारख्या अधिक वजनाच्या माणसांनी तर हलगर्जी करता कामा नये

३ ब्लड शुगर .  तिसरी महत्वाची टेस्ट म्हणजे शुगर ची .  डायबिटीस ची बीजे ३५ नंतर रुजली जातात . याबद्दल अधिक सांगावे लागणार नाही कारण भारतात चाळीशी नंतर दर  चौथ्या माणसाला शुगर आहे !! यावरून त्याची व्याप्ती लक्ष्यात यावी . 

४ hiv  लग्नापूर्वी आणि लग्नानंतर  असुरक्षित संबंध आले असतील तर HIV  टेस्ट करून घ्यावी. मग तुमचा रिस्क ग्रुप कुठलाही असो . 


हे सुद्धा वाचनीय आहे : नैसर्गिक गर्भधारणा कशी होते ?
                                       संभोग प्रणय की सेक्स?

५ cancer  स्त्रियांनी काखेत , स्तनांवर हाताने स्पर्श करून गाठ वगैरे लागते का बघावे . प्रेग्नन्सी नंतर गाठीसारखे लागणे ही वेगळी अवस्था आहे पण बाळाला दूध चालू नसतांना गाठ अली तर दुर्लक्ष्य करू नये . पुरुषांनी सुद्धा तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करत असाल आणि गाठ दिसली तर त्वरित तपासणी करून घ्यावी . महिलांनी पॅप स्मिअर नावाची टेस्ट असते , गर्भाशयाच्या कँसर साठीची ३० नंतर न विसरता करून घ्यावी .  

६ पॅनक्रिया:   डोके दुखणे तसेच सतत ऍसिडिटी असणे कुठलेही अन्न खाल्ले तर लगेच जळजळ होणे ही पॅनक्रिया मध्ये स्टोन असण्याची लक्षणे असू शकतात . पण कधीतरी महिना पंधरा दिवसातून ऍसिडिटी होणे कॉमन आहे . आपला आहार हा शक्यतो आठ वाजेच्या आत घ्यावा . नियमित झोप घ्यावी मग हा त्रास होत नाही . रात्रपाळी करणारे पोलीस नर्सेस  यांच्यामध्ये ही लक्षणे सर्रास आढळतात पण इनो करी काम तमाम म्हणून आम्ही सहा रुपयात अराम मिळवतो पण हा दीर्घकालीन शरीरासाठी धोका असू शकतो 

७ डेंटल प्राब्लेम :  सर्वात महत्वाचे म्हणजे दातांच्या तपासण्या . दात हे किडल्याशिवाय आपण त्यांच्याकडे बघत नाही पण त्यांचे आरोग्य खूप महत्वाचे आहे . आजकाल लहान मुलांच्या दातांच्या तक्रारी आहेत कारण तुमचे किंडर जॉय आणि बाटलीचे दूध !!! दातांचे आरोग्य तिशी नंतर खूप महत्वाचे आहे . दातांचे क्लिनिंग करून घेणे स्केलिंग म्हणतात ते करून घ्यावे . रोज दोन वेळ दात स्वछ करणे गरजेचे आहे . 




हे सुद्धा वाचनीय आहे  

बाळाला आईचेच दूध द्यावे का ?


safe and unsafe medicine during pregnancy in marathi

 प्रेग्नन्सी (गरोदरपणातील ) मधील  सेफ आणि अनसेफ औषधे . 

आपण काही औषधे सवयीने डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेतले जातात उदारणार्थ डोकेदुखी वगैरे साठी कोम्बिफ्लेम सर्रास घेतली जाते . पण जेव्हा हे नक्की होतं की तुम्ही गर्भवती आहात तेव्हा मात्र हीच औषधे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे धोकादायक ठरू शकते . 

या लेखात आपण कुठली औषधे सेफ आहेत आणि कुठली अगदी निषिद्ध आहेत हे बघूया 


कमी धोकादायक औषधे 

खोकल्यासाठी वापरले जाणारे बेनीड्रिल (अँटीहिस्टामाइन) 

सिट्रिझिन 

ऑट्रिव्हिन ( सर्दीसाठी नाकात टाकला जाणारा स्प्रे )

पॅरासिटोमोल 

आयमोडीम जुलाबासाठी वापरले जाते पण डिलिव्हरी नंतर मात्र अजिबात घेऊ नये . 

ऍसिडिटी साठी वापरली जाणारी जेलुसील /गॅव्हिस्कॉन 

zantac 

duphalac (लॅकटोज )

वरील औषधे जरी कमी धोकादायक असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात घेऊ नये . पहिल्या तिमाहीत जास्त काळजी घ्यावी 


हे सुद्धा वाचनीय आहे : नैसर्गिक गर्भधारणा कशी होते ?
                                       संभोग प्रणय की सेक्स?


जास्त धोकादायक औषधे . 

आयब्रुफेन  

कोम्बिफ्लेम (यात असलेले आयब्रुफेन गर्भातील बाळाच्या मेंदूवर परिणाम करते म्हणून अजिबातच नाही )

सल्फा ड्रग्स 

एड्स साठी घेतली जाणारी औषधे 

प्रॉलिक्सिन वगैरे सारखी स्किझोफ्रेनियात वापरली जाणारी औषधे 

ऍस्पिरिन (पण डॉक्टर ने सांगितले असल्यास घ्या )

अल्बुट्रोल 

यातील अनेक औषधे प्रिस्क्रिप्शन शिवाय जनरली घेतली जातात पण प्रेग्नन्सी मध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अजिबात घेऊ नये . 

फॉलिक ऍसिड ,  कॅल्सीमॅक्स , दुफास्टन वगैरे डॉक्टरांकडून दिली जातात लॅकटोज घ्यायला सांगितले जाते . ते लिहून दिलेल्या मात्रेत न चुकता घ्यावे . 

आमच्या वेळेस नव्हते असे काही औषधे या बिनडोक सल्ल्याकडे साफ दुर्लक्ष करावे .  


हे सुद्धा वाचनीय आहे : 

सिझेरिअन योग्य की अयोग्य

बहुगुणी शेवगा



आयुर्वेदिक दृष्ट्या शेवग्याची पाने ही औषधी असून यामध्ये अ, ब, क ही जीवनसत्त्वे, लोह कॅल्शियम सारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. आयुर्वेदात शेवग्याच्या पानांची पावडर करून त्याचा उपयोग कुपोषण रोखण्याकरिता पोषक आहारात केला जातो.

तोंड आल्यास शेवग्याची पाने चावून-चावून खावीत. तसेच शेवग्याची मुळे जंतनाशक असतात. शेवग्याच्या पानांच्या पावडरीचा उपयोग खरुज, उलटी होणे इ.वर होतो. तसेच जखमेवर पानांचा लगदा बांधल्यास आराम पडतो. कोवळ्या पानांच्या रसात मिरे घालून लेप लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो. पानंाच्या रसाने केसांतील कोंडा नाहीसा होतो.

शेवग्याचा पाला काहीसा तुरट असतो परंतु भाजी केल्यास उत्तम लागते. बरेच दिवसांच्या तापातून उठल्यास भ्ाूक पूर्ववत व्हावी म्हणून भाजी खावी तसेच शेवग्याच्या पानाचे पोषणमूल्य अनन्यसाधारण आहे. त्यामध्ये दुधापेक्षा चौपट पटीने अधिक कॅल्शियम आढळते. सहा ते सात संत्र्यांमध्ये जितके जीवनसत्त्व ‘क’ आढळते तितकेच या पानांमध्ये आढळते. शेवग्याच्या पानातील प्रथिने पाचक असतात. ३ केळ्यांपासून जितके पोटॅशिअम आपल्याला मिळेल तितकेच १ बाऊल भाजीत आपल्याला आढळते.

शेवग्याच्या शेंगा

शेवग्याच्या पानाइतकेच शेवग्याच्या शेंगानासुद्धा महत्त्व आहे. शेवग्याच्या शेंगेला वेगवेगळी नावे आहेत. जसे मोरंगा;म्हणजे आपला मुंगणा, इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक. आपल्याकडे काही भगात शेवगा देखील म्हणतात. याचेच बॉटनिकल नाव मोलिंगा ओलेयेरा असे आहे. मुंगण्याच्या किंवा शेवग्याच्या शेंगेत व त्याच्या बियांमध्ये व्हिटॅमीन ए, बी, बी २, बी ३, आणि सी, फोलिक ऍसिड, ऍस्कॉर्बिक ऍसीड; बीटाकॅरेटीन इत्यादी शरीर स्वास्थ्याचे घटक असल्यामुळे ‘बहुमूल्य’ आहेत.

याची खासीयत अशी आहे की भारताच्या कुठल्याही भौगोलिक ठिकाणी हे उपयोगी गुणी झाड सहजच उगवते. कुपोषणासारख्या राक्षसावर मात करण्यास हे बहुगुणी झाड ग्रामीण भागातील लोकांना आधारभ्ाूत आहे.

अफ्रिकेसारख्या देशात भ्बळीविरुद्ध लढा देण्याकरिता उत्कृष्ट आहार म्हणून शेवग्याच्या शेंगा, पाने, बिया यांचा समावेश करण्यात येतो. तसेच या व्यतीरिक्त एका संशोधनात असे सिद्ध झाले आहे की एचआयव्ही, एड्‌स यासारख्या रोगांवर रोगसंहारक व प्रतिबंधक म्हणून उपयोगही केला जातो.

वरील बाबींशिवाय शेवग्याची फळं म्हणजेच बिया पिण्याचे पाणी शुद्ध करतात. बियांचा लगदा गढूळ पाण्याला निर्जंतुक करून स्वच्छ करतो. तसेच बियांचा उपयोग तेल काढण्यासाठी होतो. त्याला ‘ब्रेन ऑईल’ असे म्हणतात.

शेवग्याच्या शेंगांच्या काही पाककृती

शेवग्याच्या शेंगांची काठीयावाडी भाजी –

ही भाजी काठीयावाड लोकांमध्ये जास्त प्रमाणात बनते.

साहित्य :- शेवग्याच्या ४ शेंगाचे काप, २ ते ३ टोमॅटो, ५ ते ६ लसूण कळ्या, १ इंच आलं, २ ते ३ हिरव्या मिरच्या, २ कांदे, १ चमचा धने पावडर, १ चमचा तिखट १/२ चमचा हळद, १ चमचा गोडा मसाला, फोडणीकरिता तेल, मोहरी, जिरे आणि हिंग, चवीनुसार मीठ, साखर.

कृती :- सर्वप्रथम कांदा बारीक चिरून घ्यावा, २ टोमॅटोची प्युरी करून घ्यावी व १ टोमॅटो बारीक चिरून घ्यावा, लसूण + आलं+ हिरवी मिर्ची ठेचून घ्यावी. कढईत फोडणीकरिता तेल घालून त्यात मोहरी, जिरे, हिंग घालून बारीक चिरलेला कांदा घालावा व परतून घ्यावा नंतर त्यात लसूण मिर्ची पेस्ट घालावी व परतून घ्यावी व सर्व मसाले एक-एक करीत घालावे व खमंग भाजून घ्यावेत व त्यांत चिरेलेल टोमॅटो व टोमॅटो प्युरी घालून शेवग्याच्या शेंगा घालाव्यात व चवीपुरते मीठ घालून भाजी परतवून घ्यावी व गरज भासल्यास पाण्याचा हबका देवून मंद आचेवर शिजवून घ्यावी. कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी.

शेवग्याच्या शेंगांचा वर्‍हाडी रस्सा –

साहित्य :- शेवग्याच्या शेंगा ४ ते ५, कांदा १ मोठा, लसूण ८ ते १० कळ्या, आलं २ इंच, हिरव्या मीर्च्या ३ ते ४, टोमॅटो १ मोठा आकाराचा, तेल फोडणीकरिता, मीठ चवीनुसार.

वाटण्याच्या मसाल्याचे साहित्य :- खसखस १ टे. स्पून, मोठी विलायची १, छोटी विलायची २ नग, जायफळ पाव तुकडा, जायपत्री १ नग, लवंग ५ ते ६, मिरे ७ ते ८, लाल मिर्च्या ५ ते ६, सुके खोबरे १ स्टे. स्पून, २ टे. स्पू. धने पावडर, २ टे. स्पून गरम मसाला, २ टे. स्पून तिखट, १ टी. स्पून हळद, फुटाण्याच्या डाळ्या १ चमचा, कर्णफूल १/२ (अर्धे), तेजपान १-३.

कृती :- सर्वप्रथम शेवग्याच्या शेंगांचे काप करून घ्यावेत व स्वच्छ पाण्यात घालावे, कांदा चिरून थोड्या तेलावर परतवून घ्यावा व बारीक वाटून घ्यावा, लसूण मिर्ची अद्रक वाटून घ्यावे व टोमॅटो प्युरी तयार करून घ्यावी. वाटणाचा सर्व मसाला थोड्या तेलावर एक-एक करीत भाजून घ्यावा व त्याची पाणी घालून मिक्सरमध्ये मुलायम पेस्ट करून घ्यावी.

कढईत तेल घालून त्यात तेजपान घालावे व लगेचच त्यात वाटलेला कांदा व वाटलेले लसूण अद्रक घालून परतवून घ्यावे व नंतर त्यात मसाल्याचे वाटण घालावे (वाटण जास्त वाटत असल्यास थोडे बाजूला करावे)

वाटण चांगले परतून घ्यावे तेल सुटल्यावर त्यात हळद, तिखट, धनेपावडर, गरम मसाला घालून परतवून घ्या व पाण्याचा हबका मारून मंद आचेवर वाफ घ्या व नंतर जेवढा रस्सा हवा असेल तितके भाजीत गरम पाणी घाला व भाजी शिजवून घ्या. कोथिंबीर घालून सर्व्ह करा. गरमा गरम भाजी, भाकरी किंवा पोळीसोबत उत्तम लागते.

शेवग्याच्या शेंगांचं पिठलं –

साहित्य :- शेवग्याच्या शेंगा २ ते ३ साधारण काप करून, डाळीचे पीठ (बेसन), १/२ वाटी, ५ ते ६ हिरव्या मीर्च्या, कांदा -१, १ टोमॅटो बारीक चिरलेला, १ वाटी आंबट दही , हळद, तिखट, मीठ, चवीनुसार, तेल फोडणीकरिता.

कृती- थोड्या पाण्यात शेवग्याच्या शेंगा वाफवून घ्याव्यात. कढईत तेल फोडणी घालून त्यात मोहरी हिंग, बारीक चिरलेला कांदा, हिरव्या मिरच्या घालून परतवून घ्या. त्यात हळद, तिखट, टोमॅटो बारीक चिरून घाला व फोडणी खमंग करून घ्या.

पाण्यातून शेंगा बाहेर काढून फोडणीत घाला व परतवून घ्या. परतल्यावर उरलेले पाणी त्यात घाला. बेसन आणि दही चंागले एकत्र घोटून घ्या व सरसरित करा. पाण्याला उकळी आल्यावर त्यांत चवीनुसार मीठ घालून बेसन आणि दह्याचे मिश्रण घाला व वाफ घेऊन शिजू द्या. कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

फोडणीच्या वरणात देखील शेवग्याच्या शेंगा घालून वरण करतात तेही उत्तम आणि पौष्टिक असतं.

शेवग्याच्या पानांच्या काही पाककृती

शेवग्याच्या पानांची भाजी –

साहित्य :- शेवग्याची कोवळी पाने (साधारण १ जुडी होईल एवढा पाला) मुगाची डाळ १/२ वाटी, कांदा १, हिरव्या मिर्च्या ३ ते ४, लसूण पाकळ्या ५ ते ६, फोडणी साठी तेल, मोहरी, हिंग, कोथिंबीर.

कृती – मुगाची डाळ स्वच्छ धुऊन एक ते दीड तास भिजत घालावी व नंतर निथळून घ्यावी. शेवग्याची पाने निवडून स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर बारीक चिरावीत. १ कांदा हीरवी मिर्ची चिरून घ्यावे. एका कढईत तेल घालून त्यात मोहरी, हिंग हळद घालून फोडणी तयार करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, बारीक केलेले लसूण घालून परतून घ्यावा. खमंग परतल्यावर त्यंात मुगाची डाळ, शेवग्याची पाने व मीठ घालून परतून घ्या व झाकण ठेवून वाफेवर भाजी शिजू द्यावी. गरज वाटल्यास पाणी घालावे व एक वाफ घ्यावी. गरमा गरम भाजी सर्व्ह करताना किसलेले ओले नारळ आणि कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी.

शेवग्याच्या पानांचे सूप –

हे सूप दक्षिण भारतात करतात. अतिशय रुचकर आणि लोहयुक्त असते.

साहित्य – शेवग्याची पाने २ वाट्या, शेवगा शेंगेतील दाणे १/२ वाटी, लिंबू , मीठ, साखर, काळीमीरी पावडर चवीनुसार.

कृती – शेवग्याची पाने स्वच्छ धुऊन घ्यावीत व त्यात शेवग्याचे दाणे आणि सात वाट्यया पाणी घालून उकळून व गाळून घ्यावे. पाणी थोडे आटल्यावर चवीनुसार मीठ, साखर, लिंबू, काळेमीरे पावडर घालून सर्व्ह करावे.

शेवग्याच्या पानांच्या वड्या –

साहित्य :- शेवग्याचा पाला, बेसन, तांदूळ पीठ, रवा, हिरवी मिरची पेस्ट, ओवा, मीठ , हळद, तेल दही.

कृती :- शेवग्याचा पाला बेसन, तांदूळ पीठ, रवा ओवा, हळद तेल मीठ हिरव्या मिर्चीची पेस्ट घालून दही घालून भिजवून घ्यावे. तेलाचा हात लावलेल्या थाळीत थापावे व कुकरमध्ये वाफवून घ्यावे. थंड झाल्यावर वड्या कापाव्यात. कढईत तेल घालुन तळाव्यात किंवा फोडणी करून परतवाव्यात. ओले नारळ, कोथिंबीर सर्व्ह कराव्यात.

https://tarunbharat.org


कोविड -१९ साठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी विषयक मार्गदर्शक सूचना


राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत सर्वसामान्यांसाठी कोविड -१९ साठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी विषयक मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.  या संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर, टास्क फोर्स ऑन आयुष्य फॉर कोविड-१९ गठीत करण्यात आला होता. त्यावेळी सर्वसामान्य नागरिकांना  प्रतिबंधात्मक उपाय तसेच अलक्षणिक  रुग्णांवरील उपचारासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या आहेत.
सामान्य प्रतिबंधात्मक उपाय:
१. वैयत्तिक स्वच्छतेचे पालन करणे.
२. वारंवार साबणाने हात २० सेकंदापर्यंत धुणे
३. खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावा
४. ज्या व्यक्ती आजारी आहेत किंवा ज्यांना सर्दी खोकला इत्यादी आजाराची लक्षणे आहेत, अशा व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळावा.
५. जिवंत प्राण्यांशी संपर्क व कच्चे न शिजवलेले मांस खाणे टाळा.
६. पशुपालन गृह तसेच जिवंत पशु विक्री केंद्र किंवा कत्तलखाने या ठिकाणी प्रवास टाळावा

आयुष उपाययोजना पुढीलप्रमाणे
१. ताजे, उष्ण व पचायला हलके भोजन घ्यावे. भोजनात अख्खी आणि ऋतूनुसार भाज्यांचा समावेश असावा
२. तुळशीची पाने, ठेचलेले आले व हळद ही द्रव्ये पाण्यात उकळून ते पाणी वारंवार पिणे फायदेशीर आहे.
३. सर्दी व खोकल्यासाठी चिमूटभर काळी मिरी, चूर्ण मधातून सेवन करणे फायदेशीर आहे.
४. कोविड-१९ लक्षणांमध्ये तुळस, गुळवेल, आले आणि हळद या सामान्य औषधी वनस्पती उपयुक्त आहेत.
५. थंड, फ्रिज मध्ये ठेवलेले व पचायला जाड असलेले पदार्थ टाळावे.
६. थंड वाऱ्याचा थेट संपर्क टाळावा.
७. विश्रांती व वेळेत झोप हितकारक आहे.
८. प्रशिक्षित योग्य तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योगासने व प्राणायाम करावे.
९. मुगाचे कढण / सूप / पाणी – मुगडाळ पाण्यात उकळून तयार केलेले मुगाचे गरम कढण / सूप / पाणी प्यावे, ते पोषक आहे.
१०. सुवर्ण दुग्ध / दुग्ध – १५० मिलीमीटर गरम दुधात अर्धा चमचा हळद व अर्धा चमचा सुंठीचे चूर्ण मिसळून हे दूध दिवसातून एकदा किंवा दोनदा प्यावे.

रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी व रोग प्रतिबंधासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार
आयुर्वेदिक औषधी
१. संशमनी वटी १ गोळी दिवसातून दोनदा असे १५ दिवस
२. तुळस चार भाग, सुंठ दोन भाग, दालचिनी दोन भाग व काळी मिरी एक भाग या द्रव्याच्या भरड चूर्ण तयार करणे. वरील औषधीचे तीन ग्रॅम भरड चूर्ण १०० मिलिलिटर उकळलेल्या पाण्यात मिसळून ५-७ मिनिटे ठेवणे व नंतर हे पाणी पिणे.
३. च्यवनप्राश १० ग्रॅम सकाळी सेवन करणे (मधुमेही रुग्णांनी साखरविरहित च्यवनप्राश सेवन करावे.  
४. सकाळ व संध्याकाळ दोन्ही नाकपुड्यांमध्ये तीळ तेल / खोबरेलतेल किंवा हे बोटाने लावावे.
५. तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळतेल/ खोबरेलतेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात व नंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चूळ भरावी असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे.

युनानी औषधी
१. बिहिदाना ५ ग्रॅम, बर्गे गावजबान ७ ग्रॅम, उन्नाब ७ दाने, , सपिस्तान ७ दाने, दालचिनी ३ ग्रॅम, बनपाशा ५ ग्रॅम यांचा काढा करून २५० मिलिलिटर पाण्यामध्ये १५ मिनिटे उकळावे व गरम असताना चहाप्रमाणे दिवसातून १ किंवा २ वेळा १५ दिवसांकरिता घ्यावे.
२. खमीरा मरवारीद दुधासोबत ५ ग्रॅम दिवसातून दोनदा घ्यावे. मधुमेही रुग्णांनी घेऊ नये.

होमिओपॅथी औषधी
१. आर्सेनिकम अल्बम ३० – ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्यावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करावा.

कोविड-१९ सारखी लक्षणे असणाऱ्या इतर आजारासाठी आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी उपचार

आयुर्वेदिक औषधी
१. टॅबलेट आयुष्य ६४ – (५०० मिलिग्रॅम)  दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे      
२. अगस्त्य हरितकी – ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्यावे.
३. अणुतेल – तीळतेल – दोन थेंब प्रतिदिन सकाळी नाकपुडीत टाकणे.
४. ताजी पुदिन्याची पाने किंवा ओवा पाण्यात उकळून त्याची वाफ दिवसातून एकदा किंवा दोनदा घ्यावी.
५. खोकला व घास खवखवत असल्यास साखर अथवा मध यामध्ये लवंग चूर्ण मिसळून दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावे.

युनानी औषधी
१. अर्धा ग्लास पाण्यामध्ये आरके अजिब ५ थेंब मिसळून गुळण्या कराव्यात, असे १५ दिवस करावे.
२. तिर्यक अर्बा – हब्बूल घर, ज्यूतिआना, मूर झरवंद तविल या सर्व घटकांचे चूर्ण तयार करून तुपामध्ये परतावे व मध गरम करून त्यामध्ये ही औषधे मिसळावीत. याचा वापर चूर्ण स्वरूपातही करता येतो, हे औषध १५ दिवस घ्यावे.

होमिओपॅथिक औषधी
१. आर्सेनिकम अल्बम ३० – ४ गोळ्या उपाशीपोटी दिवसातून दोनदा असे तीन दिवस सलग घ्यावे. एका महिन्याच्या अंतराने पुन्हा हा तीन दिवसांचा औषधांचा कोर्स करावा.  

२.तसेच ब्रायोनिया अल्वा, हस टॉक्सिको डेन्ड्रॉन, बेलॉडोना जेलसेमियम, युप्याटोरियम, परफॉलीएटम ही औषधे देखील सर्दी खोकला, फ्लू समान रोगांमध्ये चिकित्सेसाठी उपयुक्त्त ठरली आहेत.

(उपरोक्त सर्व औषधे तज्ञ  आयुर्वेदिक , युनानी आणि होमिओपॅथी  डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावीत )

कोविड-१९ पॉझिटिव्ह, अलक्षणिक, चिकित्सालयीन तपासणीनुसार स्थिर असणाऱ्या व इतर वर्तमान गंभीर व्याधीरहित रुग्णांकरिता प्रस्थापित चिकित्सेला पूरक आयुर्वेद व होमिओपॅथी उपचार

आयुर्वेदिक औषधी
१. टॅबलेट आयुष्य ६४ – (५०० मिलिग्रॅम)  दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे किंवा टॅबलेट सुदर्शन घनवटी – २५० मिलिग्रॅम दोन गोळ्या दिवसातून दोन वेळा असे १५ दिवस घ्यावे.
२. अगस्त्य हरितकी – ५ ग्रॅम दिवसातून दोन वेळा गरम पाण्यासोबत १५ दिवस घ्यावे.
३. अणुतेल – तीळतेल – दोन थेंब प्रतिदिन सकाळी व संध्याकाळी नाकपुडीत टाकणे.  
४. तोंडामध्ये एक मोठा चमचा तीळतेल/ खोबरेलतेल घ्यावे व हे तेल न गिळता दोन ते तीन मिनिटे गुळण्या कराव्यात व नंतर हे तेल थुंकावे व गरम पाण्याने चूळ भरावी असे दिवसातून एकदा किंवा दोनदा करावे.
५. गरम पाण्याची वाफ दोनदा किंवा तीनदा घ्यावी.

होमिओपॅथिक औषधी
१.कोविड -१९ समान रोगांच्या लक्षणांच्या चिकीत्सेकरिता नमूद औषधांचा वापर हा प्रस्थापित चिकीत्सेस पूरक चिकित्सा म्हणून केला जाऊ शकतो. त्यामुळे सर्व औषधे तज्ञ आयुर्वेदिक व होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच घ्यावे.

कोविड -१९ या संसर्गजन्य आजाराची लक्षणे जाणविल्यास तात्काळ चाचणी करून घेणे व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेणे आवश्यक राहील

आईच्या दुधाचे फायदे


बाळाला कधी पाजावे ?
बाळ जन्मल्याबरोबर अर्ध्यातासातच स्तनपान करावे. फक्त सिझेरियन झाले असल्यास आईची भूल उतरल्यावर म्हणजेच चार तासांनी लगेचच स्तनपान करावे. नवजात बालकास रोग होण्याची भीती जास्त असते. बाळ जन्माला येते त्याचवेळी त्याला चोखण्याची क्रिया माहित असते. पहिल्या तसत त्याची चोखण्याची शक्ती जास्त असते. नंतर ती थोडी कमी होते. जन्मानंतर मूल सुमारे पहिला तासभर जागे असते. मग ते झोपी जाते. म्हणून मुलाला जन्मानंतर अर्ध्या तासातच आईने अंगावर पाजावे त्यामुळे गर्भाशय पुन्हा मुळ आकारात यायलाही मदत होते.

बाळ जन्मल्याबरोबर अर्ध्या तासात केलेले स्तनपान म्हणजे बाळाचे पहिले लसीकरण आहे.
चीक घट्ट दुधासारखा असतो. त्याचा रंग लिंबाच्या रंगासारखा पिवळसर हिरवा असतो. दुधामध्ये पहिले तीन ते सहा दिवस हा चीक असतो. चीकातील रोगप्रतिबंधक शक्तीमुळे बाळाचे अनेक रोगांपासून संरक्षण होते. उदा. जुलाब, सर्दी, पडस, खोकला, कान फुटणे, पोलियो, दमा इत्यादी आजारांपासून बाळाचा बचाव होतो. हा चीक पोटात गेल्यामुळे बाळाला शौचास साफ होते आणि पोटातील काळी घाण शौचावाटे आपोआपच बाहेत पडते. चीक जरी घट्ट असला तरी पचायला तो हलका असतो. या चीकामुळे आतड्यात पाचकरस तयार होण्यास मदत होते. चीक व दुधातील अन्न घटक बाळाला पोषक ठरतात. तरीही काही माता तो चीक काढून टाकतात ते चुकीचे आहे. तसेच काही माता तीन दिवस बाळाला पाजातच नाही तेही अगदीच चुकीचं आहे.

आईच्या दुधाचे फायदे कोणते आहेत ?
आईचे दूध हाच बाळाचा सर्वात उत्तम आहार आहे. आईचे दूध निर्जंतुक असते. आईच्या दुधात प्रथिने स्निग्ध पदार्थ तसेच जीवनसत्त्वे, क्षार आणि रोगप्रतिबंधक घटक असतात म्हणूनच आईच्या दुधाची तुलना इतर कुठल्याही दुधाशी होणार नाही. आईचे दूध पचायला हलके असते. बाळाच्या वाढीस जरूर असणारे सर्व पोषक घटक योग्य त्या प्रमाणात असतात. आईच्या दुधाचे तापमान बाळास योग्य असते. मुख्य फायदा म्हणजे स्तनपानामुळे आई व मुलात शारीरिक आणि भावनिक नाते निर्माण होते. त्यामुळे परस्परातील प्रेम वात्सल्य वाढते. आईने रोज स्वच्छ आंघोळ करून स्तनपान वेळेवर करणे गरजेचे आहे. बाळाला स्तनपान दिल्याने त्याच्या चोखण्यामुळे दूध तयार होण्यास मदत होते.

दूध पिऊन झाल्यावर मुले कधी कधी उलटी का करतात ?
बऱ्याचवेळा दुध पिताना हवाही पोटात जाते आणि त्यामुळे धेकाराबरोबर उलटीही होते. त्याकरिता दूध पाजून झाल्यावर बाळाला खांद्यावर घेऊन थोपटावे म्हणजे ढेकाराच्या स्वरुपात हवा निघून जाईल व बाळाला उलटी होणार नाही. जर उलटीमधून दूध किंवा दह्यासारखा पदार्थ पडत असल्यास काळजी करू नये पण बाळ अचानकपणे उलटी करू लागले व उलटी हिरवी पिवळी असल्यास ताप असल्यास मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

बाळाला दूध कसे पाजावे ?
दूध पाजण्यापूर्वी हात आणि स्तनांची बोंडे पाण्यानं स्वच्छ करावी. बाळाला पाजताना आईने अवघडून बसू नये. मंदी घालून बसवेल. बाळाचे डोकं वर आपल्या कोपरावर घ्यावे व दुसऱ्या हाताने स्तनाचे बोंड त्याच्या तोंडात दयावे. निजून दूध पाजण्यास हरकत नाही. पण आई व बलाने कुशीवर निजावे. स्तनाचा दाब नाकावर पडल्यास बाळाचा जीव घाबरा होईल. स्तनांची स्वच्छता आईने चांगली ठेवायला हवी. अन्यथा बाळाला व आईला जंतूदोष होऊ शकतो. स्तनांमध्ये गळू झाला असेल तर तिला स्तनांमध्ये दुखू शकते, सूज येते व तापही येत असेल तर डॉक्टरांना  दाखवावं. बाळाला पाजण्याच्या आधी व नंतर स्तन व बोंडे नीट पुसून घ्यायला हवीत.

बाळाला किती वेळा पाजावे ?
बाळास त्याच्या भुकेप्रमाणे पहावे. आईला भरपूर दूध येत असेल तर बाळ पोटभर दूध पिऊन झोपते. स्तनात उरलेलं दूध काढून टाकावं नाहीतर स्तनात गाठ येऊन स्तनास सूज येते व त्यामुळे बाळास दूध पाजण्यास अडथळा येतो. प्रत्येक स्तनातून दहा मिनिटे दूध पाजावे. बाळाची शांत झोप हे पोटभर दुध पिऊन झाल्याचे लक्षण समजावे.

बाळाला किती दिवस अंगावर पाजावे ?
बाळाला जास्तीत जास्त दिवस अंगावर पाजावे. पहिले सहा महिने तर आईचे दूध हेच बाळाचे अन्न व पाणी असते. पण निदान बाळ दिड ते दोन वर्षाचे होईपर्यंत त्याला अंगावर पाजावे. अंगावर पाजणाऱ्या आईने स्वतःच्या आहाराची काळजी घेतली पाहिजे. तिच्या जेवणात पालेभाज्या, दूध,  फळे, मोड आलेली कडधान्ये ह्या गोष्टी असाव्यात. बाळ आनंदी असेल, त्याला शी व्यवस्थित होत असेल व झोपही चांगली येत असेल तर त्याला पुरेसं दूध मिळते असे समजावे.



स्त्रोत : बालसंगोपन, माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

Corona information in marathi

कोरोनाच्या भीतीने लोक सैरावैरा गावाकडे पळत सुटले रेल्वे बसेस खचाखच भरून पुण्यामुंबईच्या बाहेर जाताय , काय वेडेपणा आहे. दुर्दैवाने एक जरी कोरोना बाधित आपल्या बस किंवा ट्रेन च्या डब्ब्यात असला तर हा साधा विचारही करत नाहीत का लोक ? ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी सुखरूप राहावे किंवा जायचं झाल्यास स्वतःच्या साधनाने जावे हा सुरक्षित पर्याय नाही का ??
आणि तुमचा वानोळा बिचाऱ्या गाव खेड्यातील लोकांना कशाला नेताय ??
ज्यांच्या हातावर शिक्के मारले आहेत ते ट्रेन किंवा बस ने प्रवास करताय यांना कोळदांडा घालून ठेवले पाहिजे . आणि ढुंगण सुजोस्तोवर फटके दिले पाहिजे.  स्वतः सोबत इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या कणिका सारखे बिनडोक आणि परदेश वारी करून आलेले लगेच पार्टीला भुकेले या मूर्खांना  मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल झाले पाहिजे .
इटली चीन यांची उदाहरणे काय सांगताय ?
सातत्याने कोरोना संदर्भात वाचन करून काही गोष्टी समजल्या त्या शेअर करतोय
1 बातम्यांच्या बिनडोक वाहिन्या फक्त तुम्हाला भीती घालवत असतात , उदाहणार्थ एक वाहिनी बातमी चालवत आहे महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक एकाच दिवसात 12 रुग्ण
वास्तविकता ही आहे की 12 पैकी 8 जण बाहेरून परवा आलेत आणि बाधीत आहेत  , 3 जण त्यांचेच नातेवाईक आहेत आणि एक माणसाला संसर्ग झालाय
बातम्या बघा फक्त सरकारचे धोरण समजून घेण्यासाठी. मुख्यमंत्री आरोग्य मंत्र्यांच्या पत्रकार परिषदा बघण्यासाठी
2 व्हाट्सऍप युनिव्हर्सिटी चे विद्यार्थी आणि त्यांचे फॉरवर्ड बहाद्दर तज्ञ यांच्या खरंतर पोटऱ्या झोडल्या पाहिजे कशात काही नाही आणि कडुलिंबाच्या पानाने शेणाने गोमूत्राने कोरोना बरा होतो दारू पिल्याने बरा होतो यांच्या घशात कोरोना सोडला पाहिजे आणि उपाय म्हणून गोमूत्र पाजले पाहिजे
कुठल्याही फॉरवर्ड वर विश्वास ठेवू नका भीती वाटल्यास किंवा काही माहिती हवी असलयास who corona सर्च करा
3 विनाकारण प्रवास टाळा मग ट्रेन असो किंवा बस
4 बाहेरून आलात तर कपडे लगेच धुवायला टाका हात पाय तोंड आणि केस स्वच्छ करा (हेल्मेट तुमच्या आधीच्या सात पिढ्या घातलं नसेलच ). शक्यतो कुठल्याही सर्फेस ला स्पर्श करू नका . उदा. रेलिंग, भिंत , कट्टा . रुमाल एकदा वापरला की लगेच धुवायला टाका . आणि जोपर्यंत हात पाय धूत नाहीत तोपर्यंत तोंडाचा रुमाल वा मास्क काढू नका
5 लहान मुले वृद्ध माणसं यांची विशेष काळजी घ्या . त्यांना घराबाहेर पडू देऊ नका
6 पॅनिक होऊ नाका नाहीतर कोरोना ऐवजी ब्लड प्रेशर किंवा मानस रोगाने ग्रासून जाल . कोरोनाचे एकूण रुग्ण सगल्या वाहिन्या सांगत असतात पण ऍक्टिव्ह रुग्ण त्यापेकशा कमी असतात उदारणार्थ चीन मध्ये फक्त 3000 कोरोनाचे रुग्ण आहेत जेव्हाकी वाहिन्या 80000 दाखवत आहेत
7 घरच्यांसोबत मस्त पत्ते खेळा वाचन करा मुवि बघा आनंदी राहा
8 भरपूर पाणी प्या हेल्दी राहा आजारी पडणार नाही याची काळजी घ्या
9 हात लावून ताप बघू नाका तर थर्मामिटर वापरून बघा आणि 101 F पेक्षा जास्त असेल तर सर्दी खोकला असेल तर आणि खूप डोकं दुखत असेल तर लगेच दवाखान्यात जा

10 डॉक्टरांवर नर्सेस वर विश्वास ठेवा

प्रा महेंद्र शिंदे
*सखी तुझ्यासाठी*  ब्लॉग
iSEARCH माध्यमातून

Animmiya information in marathi

शरीरातील रक्त कमी झाले कसे ओळखाल? रक्तवाढीसाठी काय कराल?

शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असणे ही आता सामान्य समस्या झाली आहे. ही समस्या पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त दिसून येते. जेव्हा रक्ताची कमतरता भासते तेव्हा शरीरात हिमोग्लोबिन कमी असते.
हिमोग्लोबिन हे एक प्रकारचे प्रोटीन आहे त्यामुळे शरीरातील ऑक्सीजनच्या प्रसारणाचे काम पार पडते. त्याच्या कमतरतेमुळे अ‍ॅनिमिया नावाचा आजार होतो. अ‍ॅनिमियाचे प्रमुख तीन प्रकार आहेत.

1- शरीतरात रक्ताचे प्रमाण कमी असणारा अ‍ॅनिमिया
2- हेमोलायसिस अ‍ॅनिमिया
3- रक्तात पेशींचे प्रमाण कमी असल्याने होणारा अ‍ॅनिमिया

अ‍ॅनिमियाचे कारण

4- लोह्याच्या तत्वाची कमतरता
5- व्हिटॅमिन बी 12ची कमतरता 
6- फोलिक अ‍ॅसिडचे कमी प्रमाण 
7- गरजेपेक्षा जास्त रक्त असल्यानंतरसुध्दा ही समस्या उद्भवते. 8- पोटात इन्फेक्शन झाल्यास
9- धुम्रपान केल्यास
10- रक्ताची कमतरता
11- वृध्दत्व
12- काही औषधांचे अतिसेवन

अ‍ॅनिमियाचे लक्षण
1- जास्त झोप येणे
2- थकवा जाणवणे.
3- अस्वस्थता
4- श्वास घेण्यास त्रास होणे.
5- भिती वाटणे.
6- सर्दीमुळे जास्त संवेदनशिल होणे.
7- पाय आणि हातावर सुज
8- क्रोनिक हार्ट बर्न
9- जास्त घाम येणे

उपाय -
मध
मध अनेक आजारांचे औषध आहे. अ‍ॅनिमियाचे रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर असते. 100 ग्रॅम मधामध्ये 0.42 मिली ग्रॅम आयर्न असते. म्हणून हे खाल्यास रक्ताच्या प्रमाणात वाढ होते.

कसा खावा मध
एका लिंबूच्या रसात एक ग्लास पाणी मिसळा. त्यानंतर एक चमचा मध मिसळा. रोज असे एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरात रक्ताची वाढ होईल.

पालक -
पालकाची भाजी अ‍ॅनिमियासाठी औषधासारखे काम करते. यामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन ए, बी9, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन सी, फायबर, बीटा केरोटीनचा सामावेश असतो. अर्धा कप उकळलेल्या पालकामध्ये 3.2 मि.ग्रा. आयर्नचा सामावेश असतो. याचे एकदा सेवन केल्यास महिलांच्या शरीरातील 20 टक्के आयर्नची कमतरता पूर्ण करते.

कशी खावी पालकाची भाजी
हिरव्या भाज्यांमध्ये पालक टाकून खावे. सोबतच, सलाडच्या रुपातसुध्दा याचे सेवन केले जाऊ शकते. पालकाला उकळून त्याचे सूप बनवले जाऊ शकते. याचे सूप पिल्यास रक्ताचे प्रमाण वाढते.

बीट
बीटला अ‍ॅनिमियासाठी एक रामबाण उपाय मानले जाते. हे लोह तत्वपूर्ण फळ आहे. बीट हे रक्त पेशींना उर्जी देण्याचे काम करते. रक्त पेशी अ‍ॅक्टीव्ह झाल्यास त्या पूर्ण शरीरात ऑक्सीजन परवण्यास मदत करतात. म्हणून अ‍ॅनिमियामुळे त्रस्त लोकांनी आपल्या रोजच्या डायटमध्ये याचा सामावेश करणे गरजेचे आहे.

कसे खावे बीट
बीटला शिमला मिरची, गाजर, टोमॅटोसारख्या भाज्यांमध्ये मिक्स करून खावे.
याव्यतिरिक्त बीटला सलाडच्या रुपात किंवा ज्यूस तयार करूनसुध्दा खाऊ शकता.

पनीर बटर
पनीर बटर हे प्रोटीनयुक्त असते. म्हणून पनीर बटरचा आपल्या रोजच्या डायटमध्ये सामावेश करण्याचा प्रयत्न करावा. रोज पंचवीस ग्रॅम शेंगादाणे खाल्याससुध्दा अ‍ॅनिमियापासून आराम मिळतो. दोन चमचे पनीर बटरमध्ये 0.6 मिली ग्रॅम आयर्नचा सामावेश असतो.

कसे खावे पनीर बटर
रोज सकाळी ब्रेडवर पनीर बटर लावून खावे. त्यानंतर संत्र्याचे ज्यूस पिल्यास शरीराला आयर्न मिळण्यास मदत होते.
कोणत्याही पदार्थात याचे सेवन केल्यास फायदा होऊ शकतो.

टोमॅटो
टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि लायकोपिनचे प्रमाण आढळून येते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आयर्नला एब्जार्ब करण्याते काम करते. सोबतच, यामध्ये बीटा केरोटीन आणि व्हिटॅमिन ई यांचासुध्दा सामावेश असतो. म्हणून हे शरीरासाठी नॅचरल कंडिशनरचे काम करते.

कसे खावे टोमॅटो
टोमॅटोला सलाडच्या रुपात खाऊ शकता. याव्यतिरिक्त ज्यूस किंवा सूप बनवून त्याचे सेवन करू शकता.
सोयाबीन
सोयाबीन आयर्न आणि व्हिटॅमिनयुक्त असते. याचे सेवन केल्यास लो फॅटसह जास्त प्रमाणात आयर्न मिळण्यास मदत मिळते. म्हणून अ‍ॅनिमिया रुग्णांसाठी खूप लाभदायक आहे.

कसे खावे सोयाबीन
सोयाबीनला रात्री कोमट पाण्यात भिजवावे. त्यानंतर उन्हात वाळवून घ्यावेत.
गहू आणि सोयाबिन एकत्र दळून त्याच्या चपाती तयार कराव्या.
याव्यतिरिक्त सोयाबीनला उकळून त्याचेसुध्दा सेवन करता येऊ शकतो

चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर हिरवी मूग


चांगल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर हिरवी मूग, वजन कमी करण्यासोबत ‘या’ आजारांचा धोका करतात कमी
आपलले शरीर चांगले राहावे यासाठी मोठ्या प्रमाणात पौष्टिक तत्व असणाऱ्या हिरव्या मूग डाळचा आपल्या आहारात वापर करावा. हिरवी मूग डाळ ही आपले वजन कमी करण्यापासून मधुमेहापर्यंतच्या अनेक रोगांचा धोका कमी करते.
आपण संपूर्ण हिरवी मूग डाळ म्हणून खाऊ शकता आणि त्याबरोबर त्याची भाजीही बनवू शकता. बर्‍यापैकी लोक हिरवी मूग डाळ भिजवून त्याला कढईत कांदा आणि हिरव्या मिरचीसोबत बनविल्यानंतर स्नॅक्स म्हणून खातात.
हिरव्या मूगमध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. हे आपल्या पाचन तंत्रासाठी एकदम फायदेशीर आहे. हिरव्या मूगमध्ये अँटीफंगल आणि अँटीमाइक्रोबियल हे गुणधर्म असतात. आणि मधुमेह असणाऱ्या रूग्णांसाठी देखील ते खूप फायदेशीर आहे कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवतात.
बर्‍याच संशोधनात असे दिसून आले आहे की. हिरवा मूग उच्चरक्तदाबाच्या समस्येपासून मुक्तता देते. मूग डाळेत रक्तदाब नियंत्रित करण्याचे गुणधर्म आहे आणि बीपी रुग्णांसाठी देखील फायदेशीर आहे.हिरवी मूगमध्ये अँटि कॅन्सर आणि अँटी ट्यूमर गुणधर्मदेखील आहेत.
आणि याबरोबरच जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर मूग तुमच्यासाठी एकदम फायदेशीर आहे कारण ते मेटाबॉलिज्म रेट वाढवून वजन कमी करण्यास मदत करतात. तसेच ते हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. यात पोटॅशियम आणि लोहासारखे घटक असतात.
मूग हृदयाचे ठोके नियमित आणि संतुलित ठेवण्यास देखील मदत करते. हिरवा मूग एक कमी ग्लाइसेमिक इंडेक्स फूड आहे. याचा अर्थ असा की मूग खाल्ल्याने शरीरात इन्सुलिन, रक्तातील साखर आणि चरबीची पातळी कमी होते. ज्यामुळे आपली रक्ताभिसरण पातळी सुधारते.
Copied from houdeviral.in

importance of water in diet

डाएट डायरी : पाणी माहात्म्य!

गायत्री बर्वे-गोखले
कधी कधी आपल्याला अवेळी खूप जांभया येतात, कधी विनाकारण चिडचिड होते. कधी कधी बारीक डोकं दुखतं, कसं तरीच होतंय असं आपण म्हणतो. याचं कारण दुसरं तिसरं काही नसून आपल्या मेंदूतील पेशींना होणारा ऑक्सिजनपुरवठा कमी झालेला असतो. अशा वेळी शांत बसून ग्लासभर, वाटल्यास अधिक पाणी प्यायल्यास आपल्याला थोडय़ाच वेळात बरं वाटल्याचं जाणवेल.
गेल्या आठवडय़ात माझी मैत्रीण भेटली जी खूप अशक्त दिसत होती, कारण विचारल्यावर म्हणाली की सिव्हियर डिहायड्रेशनमुळे हॉस्पिटलला अ‍ॅडमिट करावं लागलं होतं. डिहायड्रेशनमुळे चक्क तीन दिवस हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्हावं लागणं यावरून आपल्या शरीराला पाण्याची किती गरज आहे हे लक्षात येऊ  शकतं. डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाण्याची आणि त्याबरोबर स्वाभाविकच इतर इलेक्ट्रोलाइट्सची पातळी अतिशय कमी होणे. असं होण्यामागची कारणं अनेक आहेत, पण मुद्दा हा आहे की, शरीराला पाणी / द्रव पदार्थाची नितांत गरज आहे त्याशिवाय आपलं शरीर कोणत्याही क्रिया करू शकत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे.
पाण्यामुळे आपल्या शरीराचं तापमान नियंत्रित केलं जातं. आपल्या शरीरातील अनावश्यक पदार्थ उत्सर्जित केले जातात, ज्यामुळे आपण होणाऱ्या इन्फेक्शन्स्पासून दूर राहतो. आपल्या सांध्यांमध्ये नीट हालचाल होण्यासाठी पाण्याची गरज असते. पाणी प्यायल्यामुळे आपण उत्साही राहतो. श्वसन, उत्सर्जन आणि व्यायाम करताना शरीरातील पाणी कमी होते याशिवाय काही इन्फेक्शनमुळे जेव्हा डायरियासारखे आजार होतात अशा वेळीसुद्धा पाण्याची पातळी कमी होऊन डिहायड्रेशन होते. डोकेदुखी, सतत दमल्यासारखे वाटणे, झोप न येणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, चिडचिड होणे हीसुद्धा डिहायड्रेशन झाल्याची लक्षणे आहेत. ती ओळखून योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.
प्रत्येक व्यक्तीने सरासरी अडीच ते तीन लिटर पाणी (किंवा चार ते पाच लिटर द्रव पदार्थ म्हणजेच पाणी आणि इतर अन्नातील द्रव पदार्थ) पिणे गरजेचे आहे. इतर द्रव पदार्थ म्हणजेच आपण रोज पीत असलेले चहा, कॉफी, दूध, ताक, सरबत, सुप्स, फळांचे आणि भाज्यांचे ज्यूस आणि इतर पेय पदार्थ.
आपल्या शरीरातल्या सगळ्या पेशींच्या आतमध्ये आणि दोन पेशींच्या मधल्या जागेत द्रव पदार्थ असतो ज्यासाठी पाण्याची गरज असते. याच पाण्यातून पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा होत असतो. कधी कधी आपल्याला अवेळी खूप जांभया येतात, कधी विनाकारण चिडचिड होते. कधी कधी बारीक डोकं दुखतं, कसंतरीच होतंय असं आपण म्हणतो. याचं कारण दुसरं तिसरं काही नसून आपल्या मेंदूतील पेशींना होणारा ऑक्सिजनचा पुरवठा कमी झालेला असतो. अशा वेळी शांत बसून ग्लासभर, वाटल्यास अधिक पाणी प्यायल्यास आपल्याला थोडय़ाच वेळात बरं वाटल्याचं जाणवेल. ज्या वेळी अवेळी भूक लागलीये असं वाटतं अशा वेळी आपण कधी कधी लागलेली तहान आणि भूक यामध्ये गल्लत करतो. म्हणून भूक लागलीये असं वाटलं की, आधी एक ग्लास पाणी प्यावं, त्यांनंतरसुद्धा वाटलं तर मग काही तरी खावं. याचप्रमाणे जेव्हा जेव्हा तहान लागेल तेव्हा पाणी प्यावं. जेवताना पाणी पिऊ  नये, जेवणाच्या आधी अर्धा तास व जेवल्यानंतर एक तास पाणी पिणे चांगले. यामुळे अन्नपचन नीट होण्यास मदत होईल.
याशिवाय कोणकोणते द्रव पदार्थ आपण सेवन करू शकतो आणि ते शरीरास कसा फायदा-तोटा करतात हे पाहू.
सॉफ्ट ड्रिंक्स / काबरेनेटेड बेव्हरेजेस :
बाजारात असंख्य प्रकारची सोडा असलेली ड्रिंक्स मिळतात, जी लहान मुलं आणि मोठे अगदी चवीने पितात. कधी तरी अशी पेय पिणे हानिकारक नसले तरी सतत या ड्रिंक्सचा वापर टाळावा. यात फारशी काहीही पोषक तत्त्वे नसून मोठय़ा प्रमाणात साखर आणि कार्बनडाय ऑक्साईड असतो जो शरीरास चांगला नाही. याशिवाय यात असलेले कृत्रिम रंग आणि प्रिझव्‍‌र्हेटिव्हज् घातक ठरू शकतात. लहान मुलांमध्ये ओबेसिटी वाढण्याचं मुख्य कारण अशी ड्रिंक्स सतत पिणं हे आहे.
चहा / कॉफी : चहा-कॉफीमध्ये असलेल्या कॅफेनमुळे मेंदूला तरतरी येते. दिवसातून दोन वेळा चहा कॉफी घेण्यास हरकत नाही, पण त्याहून अधिक कॅफेन पोटात गेल्यास झोप न लागणे, उच्च रक्तदाब यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. ग्रीन टी हा चहा-कॉफीला एक चांगला पर्याय ठरू शकतो. यात साखर नसल्याने कमी कॅ लरीज पोटात जातात. यातील फ्लेवनोइड्स आणि अँटीऑक्सिडन्ट्स शरीरातील पेशींचं ऑक्सिडेशन होण्यापासून रोखतात आणि मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करतात.
दूध / ताक : लाखो वर्षांपासून दूध हे आपल्या अन्नाचा अविभाज्य घटक आहे. पण नवीन आलेल्या ‘वेगन’ होण्याच्या ट्रेण्डमुळे अनेकांनी डेअरी प्रॉडक्ट्स घेणं बंद केल्याचं आपण पाहतो. खरंतर दूध / ताक हे शाकाहारी लोकांच्या जेवणातील प्रोटिन्सचा एक मुख्य स्रोत आहे. याउपर सुरू असलेल्या ए १ आणि ए २ मिल्कच्या वादात सामान्य व्यक्तीला नक्की कोणतं दूध प्यावं याचा संभ्रम पडलेला दिसतो. ए २ मिल्कबद्दल विस्तृतपणे पुन्हा कधी तरी लिहीनच, पण रोजच्या वापरात उकळून साय काढलेले गाईचे दूध किंवा टोण्ड / डबल टोण्ड   मिल्क हे कमी फॅट कन्टेन्टमुळे वापरास योग्य आहे. तसेच दह्यापेक्षा पातळ ताक हे पचायला हलके असल्याने त्याचासुद्धा आहारात समावेश आवश्यक आहे. उन्हाळ्यात पातळ ताकात चिमूटभर हिंग आणि जिरे पावडर घालून प्यायल्यास गॅसेस, अ‍ॅसिडिटीचा त्रास टाळता येईल, पण मीठ घालून ताक पिणे मात्र टाळावे.
सीझनल पेय : ऋतुमानाप्रमाणे आपल्याकडे अनेक पेय बनवली आणि प्यायली जातात. उन्हाळ्यात लिंबू सरबत, कोकम सरबत, आवळा सरबत, नारळ पाणी, कैरीचे पन्हे ही उष्णता कमी करणारी, पित्तशामक आणि अँटीऑक्सिडंन्ट्सनी भरपूर अशी पेय आहेत. ज्यात साखर असली तरी कोणतेही कृत्रिम रंग, प्रिझव्‍‌र्हेटिव्हज् वापरले जात नाहीत. याशिवाय यात मोठय़ा प्रमाणात व्हिटामिन सी असल्याने ते शरीरासाठी उत्तम आहे.
डिटॉक्स / इंफ्युज्ड वॉटर :
हल्ली आपण पाहतो की, अनेक जण भाज्या-फळांचे तुकडे घातलेले हे इन्फ्युजड वॉटर पिताना दिसतात. असे पाणी पिण्यात काहीच गैर नाही. यातून सगळी इसेन्शियल मिनरल्स पोटात जाण्यास मदत होईल. परंतु आधी म्हटल्याप्रमाणे आपला दिवसभरातील फळे आणि भाज्यांचा इनटेक माफक असल्यास असे पाणी पिण्याची गरज नाही. ही व्हिटामिन्स आणि मिनरल्स वॉटर सोल्युबल असतात. ती अधिक प्रमाणात घेतल्यास शरीराला आवश्यक तेवढी शोषली जाऊन उरलेली शरीराबाहेर फेकली जातात. त्यामुळे त्यांचा अतिरेक करण्यात काहीच फायदा नाही.
एकंदरीत भरपूर पाणी प्यायल्याने आपला मूड चांगला राहतो आणि आपण उत्साही राहतो. त्यामुळे कधीही चिडचिड होतेय असं वाटल्यास आधी एक ग्लास पाणी प्यावे मगच पुढील काम करावे. काही विशिष्ट आजार जसे किडनी किंवा लिव्हरचे आजार असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्याने योग्य तेवढय़ाच पाण्याचे सेवन करावे. कोणतेही आजार नसलेल्या व्यक्तींनी ठरावीक वेळाने पाणी प्यायची सवय लावून घ्यायला हवी. ऑफिसमध्ये एसीमध्ये बसलेले असताना नकळत शरीरातील पाणी कमी होत असते, परंतु थंड हवेत ते जाणवत नाही, तहान लागत नाही. अशा वेळी हल्ली उपलब्ध असलेल्या अनेक अ‍ॅप्सचा वापर करून पाणी पिण्यासाठी रिमाइंडर लावून योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन केले जाऊ  शकते. कामाच्या जागी पाण्याने भरलेली बाटली समोर ठेवावी ज्यामुळे कामात असताना उठावे लागणार नाही. पाणी पिण्याबरोबरच दिवसेंदिवस आपण फेस करत असलेल्या पाण्याच्या टंचाईचा विचार करून कमीत कमी पाणी वाया घालवणेसुद्धा आवश्यक आहे. उदा. हॉटेलमध्ये जेवताना हवे तेवढेच पाणी मागून घेणे. पुढच्या पिढीला अधिक गंभीर समस्यांना सामोरं जावं लागू नये यासाठी आपण सर्वानी प्रयत्नशील राहणं गरजेचं आहे. शेवटी पाणी हे जीवन आहे आणि पाण्याशिवाय जगणं मुश्कील आहे. म्हणून आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या पर्यावरणाची काळजी घेणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे.
सुप्स, फळांचे ज्यूस आणि भाज्यांचे रस
सुप करून पिण्याची आपली संस्कृती नसली तरी अधून मधून घरी तयार के लेली भाज्यांची सुप्स प्यायला हवीत. यातून मिळणारे मिनरल्स आणि फायबर हे सुंदर त्वचा, केस यासाठीसुद्धा आवश्यक आहे.
भाज्यांचे रस पिण्याचा ट्रेण्ड सध्या ‘इन’ आहे. आपल्या रोजच्या जेवणात आपण दोन वेळा भाजी आणि कोशिंबीर / सॅलड खात असू तर अशा रसांची आपल्याला विशेष आवश्यकता नाही. त्यातही हे रस जर गाळून प्यायले जात असतील तर त्यातील फायबर फेकलं जात असल्याने त्यांचा म्हणावा तसा काहीच उपयोग शरीराला होणार नाही. हेच झालं फळांच्या बाबतीत. फळांमध्ये बऱ्याच प्रमाणात पाणी असते. कलिंगड, टरबूज, द्राक्ष या फळांमध्ये तर जवळजवळ ७० टक्के पाणी आहे. त्यामुळे ही फळे खाल्यास आपोआपच शरीराला पाणी मिळते. एक ग्लास संत्र्याचा ज्यूस बनवायला कमीत कमी ५ ते ६ संत्री लागतात, पण संत्री खायची झाली तर एका वेळी आपण दोन संत्र्याच्या वर खाऊ  शकत नाही. याचं कारण संत्र खाताना त्यात असलेलं फायबर पोटात जाऊन ते आपल्याला पोट भरल्याची जाणीव करून देतं पण ज्यूस काढताना सगळं फायबर फेकलं गेल्याने कितीही ज्यूस प्यायला तरी भूक भागत नाही. शिवाय त्यात असलेली अनावश्यक साखर पोटात जाते. डायबेटीस आणि ओबेसिटी होण्यामागच्या कारणांमध्ये सतत ज्यूस पिणे हे एक प्रमुख कारण आहे. तेव्हा जास्तीत जास्त फळं खावीत आणि भाज्यांचे ज्यूस प्यायचे झाल्यास ते न गाळता प्यावेत.
viva@expressindia.com

सम विषम तिथीला संग, मुलगा की मुलगी आणि विज्ञान



सध्या हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर त्यांच्या वादग्रस्त विधानाने चर्चेत आहेत . सम तिथीला संभोग केल्यास मुलगी आणि विषम तिथीला संभोग केल्याने मुलगा . निवृत्ती महाराज एक कीर्तनकार प्रबोधनकार म्हणून निश्चितच आदरणीय आहे पण त्यांच्या वरील वाक्याला कोणताही वैज्ञानिक आधार नाही .  कीर्तनकार म्हणून महाराजांचा आदर जरूर करा पण चुकीच्या गोष्टींना समर्थन कृपया करून करू नका .  आयुर्वेद महान आहे पण म्हणतेतही काही कमतरता असतेच ना ? आयुर्वेद हे शास्त्र आहे आणि शास्त्र कधीच परिपूर्ण नसते ते प्रत्येकवेळी दुरुस्त होत जाते . आपण आधुनिक भाषेत त्याला रिसर्च म्हणतो तो झालाच नाही तर शास्त्र निरुपयोगी होऊन जाते कालबाह्य होते हे ध्यानात घ्या .
आयुर्वेद म्हणाल तर कित्येक गोष्टी या आयुर्वेदात दिलेल्या विज्ञानाने सिद्ध केले आहे की चुकीच्या आहेत . जुने बरोबर असेल ते ठेवा चुकीचे असेल तर दुरुस्त करा असे विज्ञान सांगते .
1. मुळात ज्या तिथीला संभोग झाला त्या तिथीला स्त्रीबीज बाहेर पडले असेलच असे नसते .
2. असंख्य शुक्राणू वेगाने गर्भाशयाच्या दिशेने सरकतात आणि त्यातील सर्वात प्रथम ज्याचे मिलन होते त्यानुसार गर्भधारणा होते
3. संतती कशी निपजेल हे तर सर्वस्वी घरातील वातावरण मुलाची सांगत यावर अवलंबून आहे .
4. मुलगा व्हावा यासाठी कुठलाही मंत्र तंत्र उपचार अस्तित्वात नाही आणि तो करूही नये
5. मुलगा आणि मुलगी दोघेही निसर्गाने दिलेले तुमच्या प्रेमाचे मूर्त रूप आहे त्याचा आनंदाने स्वीकार करावा
6. ज्यांना अपत्य नाही त्यांना विचारा मुलगा की मुलगी .
7. वंशाला दिवाच पाहिजे हा 18 व्या शतकातला विचार सोडा , कितीतरी मुलींनी आपल्या वडिलांच्या किर्तीध्वजाची काठी उत्तुंग शिखरी नेली आहे
8. असा विचार करण्याआधी आपली आई आठवा बहीण आठवा  बायको आठवा त्यांच्याशिवाय तुमचे जीवन परिपूर्ण आहे का ?
9. इंदुरीकर महाराजांच्याच भाषेत सांगतो खुळ्याहो लोटांगण घालतो पण वंशाला दिवाच पाहिजे हा हट्ट सोडा . आजकाल दिवे काय दिवे लावताय हे महाराज स्वतःच सांगतात . कधीतरी देवघरातील समयी साठी सुद्धा परमेश्वराकडे प्रार्थना करा

कुठल्याही कीर्तनकार महाराजांवर टीका करण्याची माझी पात्रता नाही पण जे विज्ञाननिष्ठ मनाला पटले नाही त्याचे समर्थनही माझ्याकडून होणार नाही

जय जिजाऊ जय अहिल्यादेवी जय सावित्रीमाई जय रमाई 

आयुर्वेद व सौंदर्य

आयुर्वेद व सौंदर्य

सौंदर्य म्हणजे सुन्दरता .सुंदरतेचा भाव म्हणजे सौंदर्य. सौंदर्यामुळे शरीराला व मनाला सुख व आनंद होतो .

   असे हे सौंदर्य  , शरीराचे आणि मनाचे असे दोन्ही प्रकारचे असावे लागते . केवळ दिसावयास सुंदर असणे ,

 एवढयाने  सौंदर्य प्राप्त होत नाही तर गीतेत सांगितल्याप्रमाणे योग्य आहारविहार किंवा वागणूक ही सौंदर्य प्राप्त

करून देणारी मुख्य साधने आहेत . आयुर्वेदात स्वस्थ किंवा सुस्थितीत असलेल्या व्यक्तीसच  सुंदर म्हटले आहे

व ही सुंदरता किंवा सौंदर्य प्राप्त होण्यासाठी शरीराचे मूळ घटक दोष (वात,पित्त ,कफ), धातु (रसादि) व

मळ( स्वेद , मूत्र, मल ,आदि) या घटकांचे योग्य तऱ्हेने परिवर्तन पोषण करणारा अग्नी या सर्वांची योग्य  सातत्याने

होत राहणे व ते सुस्थितीत असणे तसेच त्या व्यक्तीचे मन ,आत्मा आणि सर्व बुद्धीं द्रिये व कर्मेंद्रिये प्रसन्न असणे

 आवश्यक आहे .  यामुळेच व्यक्तीचे सौंदर्य खुलते व वाढते .

     शरीराचे सौंदर्य म्हणजे केवळ गोरेकाय शरीर असणे हे नव्हे तर शरीराचे सर्व अवयव रेखीव असणे .

शरीराचा एकूण बांधा सुडौल असणे (समसुविभक्त )हे फार महत्त्वाचे आहे.

     मनाच्या दृष्टीने व्यक्तीचे सौंदर्य हे सत्व वृत्तीचे किंवा प्रकृतीचे मन असणे, हे सौंदर्य वाढविते .

सतत आनंदी, हसतमुख असणे , सुखदुःख ला सहजपणे सामोरे जाणे ,(लोभेषांरागमत्सयादि ) राग  ,

लोभ ,मत्सर नसणे .प्रियवादीत्व ,सहिष्णुत्व,पावित्र स्मृतीवान  वगैरे असणे. या मानसिक सौंदर्य खुलविणारी

गोष्टी आहेत .अशा तऱ्हेने शारीर - सौंदर्य असणारी व्यक्ती ही उत्तमोत्तम सौंदर्य असणारी समजली जाते .

   शरीराचा हा व्यापक विचार लक्षात घेतल्यावर सौंदर्य राखण्यासाठी प्रत्येक स्त्री-पुरुषाने नित्य

नियमाने काळजी घेतली पाहिजे. ही काळजी घेताना आपल्या शरीराचे सर्वसामान्य आरोग्य राखणे

याबरोबरच खास करून सातत्याने केश, स्वतःचा चेहरा, डोळे ,दात  स्तन , नखे वगैरेची निगा राखणे व

खुलून दिसणे अगर सुंदर दिसणे याबाबत सतत जागरूक राहणे आवश्यक आहे .यायोगेच प्रत्येकाला सौंदर्य

प्राप्त होईल व त्यायोगे स्वतःला तसेच सभोवतालच्या

व्यक्तीलाही सुखकर व आनंददायी असे होईल .

      आयुर्वेद शास्त्राचे मुख्य ध्येय स्वस्थत्स स्वास्थरक्षणम् ।  हे सांगितले आहे या स्वास्थ्यरक्षणासाठी

शरीराचे आरोग्य कशाप्रकारे उत्तम राखता येईल याचे वर्णन केलेले आहे .अशा तऱ्हेने शरीराचे पर्यायाने

शरीर अवयवांचे स्वास्थ राखताना त्यांचे सौंदर्य कसे वाढेल व कसे टिकेल याचे मार्गदर्शन या आयुर्वेद

ग्रंथातून सापडते .नाक डोळे इत्यादी अवयव हे चांगले व सौंदर्यपूर्ण असणे हे आपल्या हातात नसते .

पण ते आरोग्यपूर्ण राखणे हे मात्र सर्वस्वी आपल्याच हातात असते .त्यामध्ये शरीराची त्वचा ही अत्यंत

महत्त्वाची .आपण त्वचेचा विचार करताना चेहर्‍याच्या त्वचेचा विचार अधिक करतो परंतु सार्वदेहिक

त्वचाही विचारात घेतली पाहिजे .आपल्या सर्व शरीरात मज्जेचा स्नेह सर्व त्वचेवर असतो .हा मज्जेचा स्नेह

आपण अनेक प्रकारचे साबण ,शाम्पू , क्रीम वगैरे वापरून घालवितो .त्यामुळे त्वचेला जास्त रुक्षता येते .

परंतु प्राचीन ऋषींनी आपल्याला या आयुर्वेदशास्त्र द्वारा त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी अनेक औषधी सांगितल्या

आहेत तसेच काही नियमही सांगितले आहेत. रोज शरीरास तेलाचा अभ्यंग करावा त्यात सुद्धा विशेष करून

डोके ,कान आणि पाय (तळपाय )ह्यांना विशेष . त्यामुळे दृष्टी स्वच्छ होते ,त्वचा सुकुमार होते व शरीर कणखर

 होते. याशिवाय अभ्यंगाने झोपही व्यवस्थित होते .पूर्वी स्नान करण्याआधी अंगाला नेहमी उटणे लावण्याची

पद्धत होती.  उटणे लावल्याने कांती  तेजस्वी होते आणि शरीरातील मेदही त्याने झडतो .

        अशाच प्रकारचे स्नानाचे गुणही त्वचेच्या दृष्टीने फारच उपयुक्त असतात . डोक्यावरून स्नान करताना

कधीही फार गरम पाणी वापरू नये त्यांनी डोळ्यास इजा पोहोचते .अशा तऱ्हेने दिनचर्या मध्ये रोज कसे

वागावे हे सांगितले आहे आणि निरोगी राहण्यासाठी या दिनचर्येला अतिशय महत्त्व असून पर्यायाने निरोगी

शरीर असणे हेच सौंदर्याचे मूळ आहे. निरोगी शरीर असेल तर त्या मानसाची त्वचा ही तेजस्वी सुकुमार

आपोआप दिसते .

 रषोघ्न  द्रव्यांमध्ये वेखंड हे मौल्यवान औषध असून लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे त्वचेचे रक्षण करते .

हल्लीच्या ब्युटीपार्लरमध्ये सध्या जे हर्बल पँक ( फेशियल साठी) वापरतात ते फार पूर्वीपासून या शास्त्रात

 सांगितले आहे उदाहरणार्थ अनंता , मंजिष्ठा , हरिद्रा ,चंदन ,कमळ, ज्येष्ठमध , दूर्वा , विदारीकंद या वनस्पतीचे

वर्णन केवळ वर्ण्य द्रव्य म्हणून केलेले आहे . आयुर्वेद शास्त्रात त्यासाठी घरच्या घरी करण्यासारखे उपचार

सांगितलेले आहेत . त्यामध्ये

१)रक्तचंदन

२)जायफळ

३) मिरी

४)चंदन

५)मसूरडाळ

    या द्रव्यांचा लेप तोंडावरील मुरूमे नाहीशी करतो.

 त्वचेनंतर आवडता विषय म्हणजे केस .आता केसांचे विकार कोणते ते पाहू .१)केस गळणे ,२)केस पिकणे,

३)कोंडा होणे, ४)चाई पडणे इत्यादी विकार आपणास व्यवहारात रोज पाहण्यात येतात. त्यांचे कारण म्हणजे

हाडातील शक्ती कमी होते. मीठ जास्त खाल्ल्याने सुद्धा केस पिकतात खूप घाम येतो, आजारपणाने ,स्थूल

प्रकृतीने ,मानसिक कारणाने त्याशिवाय आम्लपित्त जास्त असणे ,जास्त विचार करणे ,मासिक पाळीच्या

तक्रारी असणे ,कृत्रिम सेंट ,तेल लावणे इत्यादी कारणे घडतात केसांच्या रक्षणासाठी शिकेकाई, रिठे ,

गव्हळा ,कचोरा ,मुस्ता, आवळकाठी इत्यादी द्रव्ये सांगितली  आहेत .







डॉ. ज्योती गणेश पवार  
आयुर्मंत्रा हेल्थ क्लिनिक स्त्रीरोग ,
त्वचा व केस तज्ञ ,
शिवगणेश चौक, 
पिंपळे गुरव ,पुणे ६१






लहान मुलांमधील नैराश्य

लहान मुलांनी निराश होणं  किंवा चिडचिड करणं ,  वेळोवेळी वाईट मूड मध्ये  राहणे अगदी सामान्य आहे. परंतु जेव्हा नकारात्मक भावना आणि नकारात्मक
 विचार बराच काळ टिकून राहतात आणि मुलाची नैसर्गिक पणे खेळण्याची अभ्यास करण्याची किंवा दैनंदिन कामं  करण्याची क्षमता मर्यादित होते कमी होते तेव्हा ते  नैराश्य असू शकते.

डिप्रेशन  हा एक प्रकारचा मूड डिसऑर्डर आहे. जेव्हा मुले दुःखी,किंवा   निराश आठवडे, महिने किंवा त्याहूनही अधिक काळ असतात तेव्हा ही  चिन्हे गंभीर असतात , सतत स्वतःला कमी लेखने
उदास वाटणे , एकाग्रता नसने , झोप  आणि भूक सतत डिस्टर्ब् होणं . शाळेत मन रमत नाही , थकल्यासारखे वाटेल,  मित्र किंवा कुटूंबापासून दूर जावे.हे सुद्धा काही प्रारंभिक लक्षणे आहेत .

जेव्हा मुल नैराश्यात असतात , तेव्हा ते त्यांच्या आवडीच्या गोष्टी करत असतांना सुद्धा त्या त्यांना कठीण जाचक  वाटू शकतात  . डिप्रेशन मुले मुलांना आपण कुठल्याच कामाचे नाही अगदीच नालायक आहोत ,आपल्यावर कुणीही प्रेम करत नाही असे वाटू शकते वाटते. यामुळे दिन्चार्येही  कठीण वाटू शकते . जेव्हा नैराश्य तीव्र होते, तेव्हा यामुळे मुलांना स्वत: ला हानी पोहचविण्याचा किंवा आत्महत्येचा विचार येऊ शकतो  अश्या वेळेस त्याला
पाठिंबा द्या आणि आपल्या मुलाबद्दल आपल्या प्रेमाची आणि काळजीने  आपुलकीच्या  स्नेहाच्या  भावनेने जवळ घ्या . विश्वास द्या कि आम्ही आहोत ना , काळजीचे करू नकोस

डिप्रेशन ओळखणे
जेव्हा मूल उदास असते तेव्हा पालक आणि इतर लोकांना हे कळणे कठीण असते. मुलं  अचानक चिडचिडे बनली   किंवा रागीट बनली  , सतत  मूड  बदलतोय  , तुमच्या विषयी किंवा एकंदर वडीलधाऱ्या मंडळींबद्दल  अनादर करतोय . कुठल्याच गोष्टींत  उत्साह  आणि इंटरेस्ट  नसणे , एकलकोंडा बनणे  पालक आणि मुले ( किशोरवयीन) यांना हे लक्षातही  येऊ शकत नाही की ही नैराश्याची चिन्हे असतील . डिप्रेशन वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त होतं

डिप्रेशन आणि इतर मूड डिसऑर्डरचे निदान

डिप्रेशन आणि मूड डिसऑर्डरचे निदान करताना, डॉक्टर किंवा समुपदेशक  वेगवेगळ्या प्रकारांचा वापर करतात.

मेजर डिप्रेशन : दीर्घकाळ उदास मनःस्थिती ही डिप्रेशन अवस्था कमीतकमी 2 आठवडे टिकली कि म्हटली जाते . कुणा जवळच्या व्यक्तीच्या अचानक  जाण्याने , प्रेमभंग , व्यावसायिक तोटा किंवा आजारपण यामुळे मेजर डिप्रेशन येतं
.
क्रॉनिक डिप्रेशन  (ज्याला डायस्टिमिया देखील म्हणतात) स्लो डिप्रेशन आहे जी हळूहळू विकसित होते आणि 2 वर्ष किंवा त्याहून अधिक काळ टिकते . याची करणे मुख्यत्वेकरून अनुवांशिक असतात

ऋतुपरत्वे बदलणारं डिप्रेशन :  डिसऑर्डर एक प्रकारचा डिप्रेशन आहे  जो ऋतुमानाशी संबंधित आहे . प्रकाश किती आहे याच्याशी संबंधित आहे. जेव्हा दिवसाचे तास लहान असतात तेव्हा हे विकसित होते; उदाहरणार्थ, हिवाळ्यातील महिन्यांमध्ये.

डिस्ट्रपटिव्ह मूड  डिसऑर्डर आक्रमकता आणि रागाचा उद्रेक नेहमी चिडचिड  अशी मनःस्थिती 6 वर्षांपेक्षा मोठ्या मुलामध्ये कमीतकमी एक वर्ष टिकली कि म्हटली जाते
.

योग्य लक्ष आणि काळजी घेऊन डिप्रेशन आणि इतर मूड डिसऑर्डर चांगले होऊ शकतात. परंतु त्यांच्यावर योग्य वेळी  उपचार न केल्यास समस्या कायम राहू शकतात किंवा आणखी वाईट होऊ शकतात.

जर आपल्याला असे वाटले  की आपल्या मुलास डिप्रेशन  असेल किंवा मूडची समस्या आहे तर :

आपल्या मुलाशी डिप्रेशन आणि मनःस्थितीबद्दल बोला. मुले कदाचित दुर्लक्ष करतात,लपवतात  किंवा बऱ्याचदा लक्षातही येत नाही त्यांच्या ..  त्यांच्याशी तरीही बोला. ऐका, आपला आधार द्या आणि प्रेम द्या .
आवश्यकता असल्यास डॉक्टर ला भेट द्या
. डॉक्टर कदाचित संपूर्ण शारीरिक तपासणी करतील . डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या मुलाच्या  आरोग्याच्या तपासणी करून घ्या  जर डॉक्टरांना असे वाटले की आपल्या मुलाला डिप्रेशन किंवा तत्सम मूड डिसऑर्डर आहे, तर तो आपल्याला  उपचारांसाठी एखाद्या तज्ञाकडे पाठवू शकता .

मनोविकार तज्ज्ञांशी संपर्क साधा. डिप्रेशन रिकव्हर होऊ शकते. परंतु मदतीशिवाय हे दीर्घकाळ टिकू शकते किंवा आणखी वाईट होऊ शकते.  मनोचिकित्सक किंवा मानसशास्त्रज्ञ आपल्या मुलाचे मूल्यांकन करू शकतात आणि उपचारांची शिफारस करतात. मनोविकार तज्ज्ञांकडे जावं लागलं म्हणजे वेड लागलं तरच जावं लागतं हा ग्रह मनातून काढा . मुलांच्याही मनातून काढा . कुठल्याही माणसाला आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर मानवोपचार तज्ज्ञाची आवश्यकता असते . खेळाडूंच्या फिजिओ च्या टीम सोबत कायम एक मानसोपचार तज्ज्ञ असतो . कुणाला वेड लागलं तर म्हणून नाही तर त्यांच्या मनस्थितीची काळजी घेण्यासाठी .

पालक समुपदेशन देखील बर्‍याचदा उपचारांचा एक भाग असतो. हे निराशेने ग्रस्त असलेल्या मुलाला किंवा किशोरवयीन मुलाला पालक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतात

मदत करण्याचे आणखी मार्ग


आपल्या मुलास पौष्टिक पदार्थ खातात, पुरेशी झोप मिळेल आणि दररोज शारीरिक व्यायाम मिळेल मिळेल असे बघा . याचा मूडवर सकारात्मक परिणाम होतो.

एकत्र वेळ घालवा . दोघे आनंद घेऊ शकता अशा गोष्टी करण्यात आपल्या मुलासह वेळ घालवा. फिरायला जा, एखादा खेळ खेळा, स्वयंपाक करा, हस्तकला बनवा, एक मजेदार चित्रपट पहा. सकारात्मक भावना आणि मनःस्थितीला हळूहळू प्रोत्साहित करा (जसे की आनंद, विश्रांती, करमणूक आणि आनंद) हळूहळू डिप्रेशन चा एक भाग असलेल्या निराश मनोवृत्तीवर मात करण्यात मदत करू शकते.


डॉ योगिनी सावंत 

healthy recipes for kids

शाळेत जाणाऱ्या मुलांच्या आईंना पडणारा नेहमीचा प्रश्न म्हणजे डब्यात काय देऊ? जेणेकरून मुलं पौष्टिक खातील आणि डबा पूर्ण खाल्ला जाईल. अशाच काही पाककृती मी खाली सांगत आहे ज्या माझ्या ३ वर्षांच्या मुलाला खूपच आवडतात. ज्यातून मी त्याला जास्तीत जास्त पौष्टिक खाऊ घालण्याचा प्रयत्न करते.



 १. मँगो शिरा



साहित्य: रवा १ वाटी, तूप अर्धी वाटी, साखर अर्धी  वाटी, मँगो पल्प अर्धी वाटी, दूध व पाणी यांचे समप्रमाणात मिश्रण १ वाटी, बदाम, काजू, पिस्ते, अक्रोड यांची बारीक पूड, वेलची पावडर.



कृती: जाड बुडाच्या पातेल्यात / कढईत तूप गरम करुन त्यावर रवा खमंग भाजून घ्यावा. त्यावर हळूहळू गरम दूध घालावे आणि रवा परतून घ्यावा. रवा छान फुलतो. ५ मिनिट झाकण ठेवून रवा चांगला शिजू द्यावा.

        यात अर्धी वाटी मँगो पल्प आणि साखर घालून परतावे. वरून ड्रायफ्रुट्सची पूड आणि वेलची पावडर घालून परतावे. असा हा मँगो शिरा चवीला खूपच सुरेख लागतो.

(मुलांना ड्रायफ्रुट्सचे काप आवडत असतील तर पावडर न करता काप घातले तरी चालतील.)



२. मिश्र पिठाचे धपाटे



भाजणीच्या थालिपीठाप्रमाणे निरनिराळी पीठे वापरून बनवलेले धपाटे देखील छान लागतात आणि पौष्टिक असतात.



साहित्य: गव्हाचे पीठ १ वाटी, तांदूळ, ज्वारी, बाजरी, नाचणीचे पीठ प्रत्येकी अर्धी वाटी, बेसन पाव वाटी, किसलेले गाजर अर्धी वाटी, किसलेले बीट व दुधी प्रत्येकी पाव वाटी, बारीक चिरलेली मेथी व कोथिंबीर प्रत्येकी पाव वाटी, बारीक चिरलेला कांदा १, आले-लसूण पेस्ट १ मोठा चमचा, हिंग १ छोटा चमचा, धणे-जिरेपूड १ छोटा चमचा, चवीप्रमाणे लाल तिखट आणि मीठ, तूप.



कृती: गाजर, बीट, दुधी, मेथी, कोथिंबीर, कांदा सगळे एकत्र करून घ्यावे. त्यात सर्व पीठे घालावीत. हिंग, आले-लसूण पेस्ट, धणे-जिरेपूड, लाल तिखट व मीठ घालून, गरजेनुसार पाणी घालून साधारण घट्टसर मळून घ्यावे.

       याचे छोटे गोळे बनवून लाटून घ्यावेत किंवा कापडावर थापून घ्यावेत. तव्यावर तूप घालून खमंग भाजावेत. हे धपाटे दही, लोणचे, टोमॅटो सॉस सोबत छान लागतात.

(कांद्याला पाणी सुटत असल्याने पीठ मळल्यावर लगेच धपाटे बनवावेत. यात आपल्या आवडीप्रमाणे पालक, कोबी देखील वापरू शकतो.)



३. पौष्टिक रवा अप्पे



साहित्य: रवा १ वाटी, दही १ वाटी, किसलेले गाजर अर्धी वाटी, वाफवलेले मटारचे दाणे पाव वाटी, बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो प्रत्येकी १, चवीनुसार मीठ, तेल.



कृती: रव्यात १ वाटी दही घालून अर्धा तास मुरवत ठेवावे. त्यानंतर चांगले फेटून घ्यावे. त्यात वाफवलेले मटारचे दाणे, कांदा, टोमॅटो, किसलेले गाजर व चवीप्रमाणे मीठ घालून चांगले ढवळावे.

        गरजेप्रमाणे पाणी घालून मिश्रण तयार करावे. अप्पेपात्र गरम करून त्यात थोडे तेल घालून वरील मिश्रण घालावे आणि अप्पे बनवावेत. दोन्ही बाजूने भाजावेत. हे पौष्टिक अप्पे खोबरे चटणी सोबत छान लागतात.

        वरील मिश्रण इडलीपात्रात लावल्यास रंगीत व पौष्टिक इडली बनवता येते.



४. व्हेज रोल



साहित्य: तयार चपाती, रोल भाजायला तूप, कोणतीही तयार भाजी ( बटाटा, कोबी, फ्लॉवर इ.), शेंगदाण्याची भरड, टोमॅटो सॉस.



कृती: तयार चपातीला टोमॅटो सॉस लावावा. त्यावर एका कोपऱ्यात भाजी ठेवून त्यावर शेंगदाण्याची भरड घालावी. चपातीचा रोल करून तव्यावर तूप घालून खमंग भाजावा. छोटे तुकडे करून डब्यात द्यावा.

( रोल लगेच खायचा असल्यास त्यात बारीक चिरलेला कांदा देखील छान लागतो.)



५. ऑम्लेट पिझ्झा ( शाळेत अंड्याचा पदार्थ नेण्यास परवानगी असल्यास)



साहित्य: २ अंडी, तयार चपाती, चिमूटभर हळद, चवीपुरते मीठ, टोमॅटो सॉस, चीज, तेल.



कृती: एका वाटीत चिमूटभर हळद, मीठ घालून २ अंडी फेटून घ्यावी. तव्यावर तेल घालून अर्धे मिश्रण पसरावे. त्यावर चपाती ठेवावी. चपातीवर उरलेलं अंड्याचे मिश्रण घालावे. दोन्ही बाजूने छान भाजावे. वरून टोमॅटो सॉस लावावा. आवडत असल्यास वरून चीज घालावे. पिझ्झा प्रमाणे कापून खावे.

(आवडत असल्यास अंडी फेटताना  बारीक चिरलेला कांदा व शिमला मिरची घालू शकता.)



६. टोमॅटो-बीट-गाजर-लाल भोपळा सूप



( हि रेसिपी मुलांच्या डब्यासाठी नाही. परंतु पौष्टिक असल्याने खाली देत आहे.)



साहित्य: १ टोमॅटो, १ बीट, १ गाजर, छोटासा लाल भोपळ्याचा तुकडा, २-३ लसणाच्या पाकळ्या , ३ काळी मिरी, १ लवंग, छोटासा दालचिनीचा तुकडा, जिरेपूड, तूप, साखर, चवीपुरते मीठ.



कृती: बीट, गाजर व लाल भोपळ्याचे साल काढून छोटे तुकडे करावेत. एका कुकरच्या भांड्यात टोमॅटो व वरील सर्व तुकडे, लसूण पाकळ्या, काळी मिरी, लवंग, दालचिनी घेऊन २ शिट्ट्या घ्याव्यात.

         कुकर थंड झाल्यावर टोमॅटोची साल काढावी. सगळे मिश्रण मिक्सरला बारीक वाटावे. एका भांड्यात तूप गरम करून वरील वाटलेले मिश्रण उकळवावे.  त्यात थोडी जिरेपूड, चवीपुरती साखर आणि मीठ घालावे. गरमागरम प्यायला द्यावे.



      या सूपचा रंग खूप सुरेख येतो. चवीलाही अप्रतिम लागते. पौष्टिक आणि पोटभरीचे असल्याने अधूनमधून नक्की बनवून मुलांसोबतच सगळ्यांनी प्यावे.

















सौ . सोनल दातीर हजारे
संचालिका-  सोनल टूर्स आणि ट्रॅव्हल्स

D:\AMIT DATIR TRAVELS\IMAGE SONAL TOUR\final-sonal-logo-2.jpg





Cont: 9049624196 / 9767874442Website - www.sonaltoursandtravels.com
Email: info@sonaltoursandtravels.com; hajare.sonal@gmail.com


सुजाण पालकत्व

आपण पालक होतो हा एक प्रकारचा बहुमानच आपल्याला मुल झाल्यामुळे मिळालेला असतो. म्हणजे अप्रत्यक्षपणे आपण त्या मुलाचे आभार मानायला हवेत. त्याचामुलेच आपण आई किंवा बाबा झालेलो असतो. जसे “तुझ्यामुळे मी झाले आई , बाळा होऊ कशी उतराई” हे तर ऐकूण काय मुलं आणि पालक या नात्यातील अंतर



कमीतकमी असायला हवं. हे नाते संबंध पाळताना काय-काय गोष्टी अपेक्षित आहेत ते पाहू .



        मुलांचा सर्वप्रथम पहिला शिक्षक “आई” हाच असतो . किंवा पालक जो कोणी असतो तो . आई असल्याचा विलक्षण अभिमान तिला असतो . नकळतच तिचं हे जगनेपन आनंदमयी होऊन गेलेले असते . त्याच्या “आई” ह्या संबोधनाने पुकारण्याचा त्या कोवळ्या जीवावरून ती आपला जीव ओवाळून टाकत असते . ह्याच उच्यारांसाठी तिचे कान आतुरलेले असतात . ती धन्य झालेली असते . भूक लागली कि रडायचे हे काय आई किंवा पालक शिकवीत नाही . प्रेमाचा आणि मायेचा स्पर्श आपण मुलांना देतो . तो ओळखायला ती अंतप्रेरणेने शिकतात . त्याच अंतप्रेरणेतून ती ईतरही गोष्टी शिकतात . मुख्य म्हणजे पालकांनी आपल्या पाल्याचा Iq. ओळखून मुलांच्याकडून त्या प्रमाणात अपेक्षा केली पाहिजे . मुलांच्या मेंदूची वाढच मुले ३ वर्ष होईपर्यंत झालेली नसते . हे ओळखून त्याच्या शरीरिक वाढीसाठी आणि मग मानसिक वाढीसाठी प्रयत्न करायला पाहिजे . ३ वर्षापर्यंत तरी मुलं डोक्यावती पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे . सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत सतत पाठपुरावा , धाकदाखून शिकवू पाहणारे पालक , आणि प्रथम आपण कृती करून त्यातून चांगल्या गोष्टी उचलणारे मुलं ह्या दोन्ही परस्पर्विरोधी गोष्टी आहेत . परंतु मुले आपल्या कृतीतूनच घडत असतात . उत्तम मुल , उत्तम विद्यार्थी , किंवा उत्तम नागरिक म्हणून कलागुण त्याचे जोपासायचे असतील तर आपल्या चांगल्या गोष्टीचे अनुकरण ती करत असतात . आपल्या सर्व गोष्टींचे मुलं निरीक्षण , बारकाईने आपल्या सर्व गोष्टी मुलं न्यहाळत असतात . आणि त्यातूनच मुलं घडत असतात . त्या निरीक्षणातूनच त्यांच्यातला खरे-खोटेपणा सिद्ध होत असतो . म्हणजेच पर्यायाने आपली जबाबदारी फारच वाढलेली असते . आपली प्रत्येक कृती , मग ती अगदी छोटोशीच का असो . चांगल्याची , पवित्रपनाची, प्रमानिकपणाची, प्रेमाची, स्नेहाची , त्यागाची, बुद्धीची असायला हवी . मुख्य म्हणजे त्यांचा सदगुण वाढीस लावणे हे पालकांनी करायला हवे . खऱ्या अर्थाने सद्गुणांचा विकास म्हणजेच मानवतेचा विकास आहे . ह्या गुणामुळे तो मोठा होतोच पण सामाज्यासाठी आणि देशासाठी त्याच्याकडून चांगले कार्य घडते . त्या गुणामुळेच सहवासात येणाऱ्या प्रत्येकाला तो हवाहवासा वाटतो . त्याच्या सहवासात आनंदच मिळतो . हे कशामुळे शक्य झालेले असते तर चांगल्या गुणांची जोपासना करायला हवी . पालकांनी मुलांचे बालपण हिरावून घेऊ नये . कारण त्यांचे हे दिवस परत येनारे नसतात . त्यांना फक्त प्रेमानेच जिंकायचे असते . कावळा दिसला कि हातातले बिस्कीट पुढे करणारे मुल हे उपजतच अंतप्रेरनेने होत असते . हि त्यांची भावना वाढीस लावण्याचे काम पालकांनी करावयाचे असते . एक तीळ सात जणांनी वाटून खायचा हे जपणारी आपली संस्कृती पालकांनी आपल्या मुलांकडून चालू ठेवायची , दिल्याने आनंद वाढतो हे पालकांनीच मुलांना शिकवायचे असते . अगदीच हटी् मुलं असेल तर रागवायचे पण ते कौशल्याने त्यांचा अहंकार दुखावणार नाही या बेताने खरं म्हणजे निरोगी मन असते . शरीर आधी निरोगी असायला हवे . तरच मन प्रसन्न ताजे-तावाने राहते . आणि ते शरीर निरोगी ठेवायची जबाबदारी पालकांची असते . मुलांचा सर्वांगीण विकास व्हायला हवा असेल तर शारीरिक सुदृढता हवी . सर्व प्रकारचे अन्न घटक शरीरात गेल्यामुळे मन व शरीर सुदृढ बनते . असे आयुर्वेदाचे म्हणणे आहे . त्यांना सगळ्या चवींची गोडी लावण्याचे काम आईचे आहे . ॠतुमानानुसार खाण्यात बदल करायला हवा . थंडीच्या दिवसात तेलाचे करायला हवे . थंडीचा ४ महिन्यात जर लक्षपूर्वक आहार विहार ठेवला तर पुढचे ८ महिने निर्धास्त राहायला हरकत नाही . अशी जुनी पिढी सांगत असते . त्यांच्या सांगण्याचं तथ्य तसेच “झोप” विश्रांती हि सुद्धा पूर्ण झालेली असेल तरच ते मुल तरतरीत दिसते . नाहीतर ते अथरुनातूनच रडत उठते . म्हणजे त्यांचे काहीतरी बिघडलेले असते हे पालकांनी ओळखायला हवे . निरोगी विचारच पुढच्या आयुष्यातील काम सोपे करतात . मुलांच्या मनात जिव्हाळा आणि कृतक्षता या दोन्ही भावना वाढीस लावायच्या त्या रुजवल्या कि आपोआप वाढीस लागतात . कारण या दोन भावनाच आपल्या संबंधात आलेल्या व्यक्तीशी, सामाजाशी आणि पर्यायाने विश्वाशी नातेसंबंध जिवंत ठेऊ शकतात . माणुसकीने वागल्यामुळे त्याचे थोरपण ठरत असते . आणि मग ते मुल कुणाचे आहे , याची विचारणा होते . पर्यायाने संस्कारातून या गोष्टी पुढे जाऊ शकतात . उत्तम संस्कार माणसाला मोठे करतात . शिक्षणाने जसा अज्ञानाचा अंधकार दूर होतो . तसे माणसाने आपल्यातले माणूसपण टिकवायचे असते . माणुसकी हि खरी जात आहे . हे माणसाला कळले पाहिजे .



       एकविसाव्या शतकातली गतिमानता नवीन नवीन रोगांना आमंत्रण देते . एवढेच नव्हे तर पूर्वी म्हतारपणी होनारे रोग तरुणपणात व्हायला लागलेत . तेव्हा चंगळवादामुळे हे घडते . आळसामुळे रोगाची मुळे शरीरात जोर धरू लागतात . आहार-विहार आणि विचाराला धरबंध नसेल तर पुढील पिढीत असेच चित्र दिसेल . म्हणूनच आताच्या शिशूंना शिस्तीचे स्वावलंबनाचे वेळापत्रक असणे आवश्यक आहे . आणि ते आपल्यापासूनच ॠढ व्हायला हवे . ताण-तणाव नको म्हणून आई वडिलांचे निकोप नाते हवे . कारण मुल जास्त वेळ घरात असते . तीथें ते निर्भय असते . त्यांचा कोणत्याही तऱ्हेचा कोंडमारा होता कामा नये . नंतर मोठे झाल्यावर त्यांची मित्र-मंडळी कशी आहेत , याच्यावर पालकांचे लक्ष हवे . ती सुदधा चांगल्या संस्कारांच्या घरांतील मुले आहेत कि नाही हे पालकांनी तपासायला हवे . मुळे खोटं बोलत नाही ना ? कोणत्याही प्रकारची लबाडी मुळे करत नाही ना ? याकडे पालकांचे विशेष लक्ष पाहिजे . वडिलांचे मुलाशी मित्रासारखे नाते हवे . आईचे मुलीशी मैत्रीनिसारखे नाते हवे . पालकांचे वागणे पारदर्शी पाहिजे. / मुळे आपोआप शहाणी होतात . आनंद देतात . त्यांच्यातला कलागुण ओळखून त्याला योग्य तऱ्हेने वाव देणे पालकांचे कर्तव्य आहे . त्यांच्या चुकांबद्दल योग्य समज देणे , चांगल्या कामगीरीबद्धल शाबासकी देणे . या दोन्हींचा मेळ घालता आला पाहिजे . मुलांना आई वडिलांचा अभिमान वाटला पाहिजे . आपले आदरयुक्त प्रेम असेल तर मुळे अपोअपच पालकांना आपले आदर्श मानतात .



        दिवसभर नोकरी आणि संध्याकाळी मुल यात गुरफटलेली स्त्री आपल्या मुलाकडे न थकता लक्ष देते . हे तिचे खरे कौशल्य आहे . त्याच्या चौकसबुद्धीला खात-पाणी घालते . मुळे फक्त अभ्यासात हुशार असली पाहिजे असे नव्हे , तर त्याच्यातला छंद मुलांना जोपासता आला पाहिजे . व्यवहार चतुर कशी होतील हे सुजान पालकांनी शिकवले पाहिजे . त्यांचा अपमान करू नये . त्यांना चांगल्या शब्दात समाज द्यावि . मोठ्या माणसांशी कसे वागावे हे लहानपणीच शिकवावे .



आई हि सुसंस्कारांची जननि आहे . आईच्या प्रत्येक कृतीत , प्रत्येक शब्दात , प्रत्येक सल्ला व उपदेशात सुसंस्कार व नैतिक मूल्य भरलेली असतात . आई, वडील, शाळा, गुरु हे संस्कारांचे अधिष्ठान आहे . गुरु, विद्या संभाषन नेतृत्व असे विविध पैलू शिष्यावर पाडत असतो . चांगल्या नेतृत्वाची समाज्यात गरज आहे . आणि चांगल्या नेतृत्वाची समाज कदर पण करतो . समाज जर समृद्ध आणि सकस हवं असेल तर हे बाळकडू लहानपणीच मुलाना पाजावे लागेल . घरातील नात्यामधील जिव्हाळा, एकमेकांशी सुसंवाद , सुसंस्कार आपलेपणा , एकमेकांसाठी करत राहण्याची वृत्ती यामधून मुलानमध्ये आनंदाचे झाड जागवण्याचा प्रयत्न प्रत्येक पालकांनी केला पाहिजे . मुलांनी खूप मोठ्मोटया पदव्या घेऊन खूप पैसे कमावण्यापेक्षा साधे राहून एकमेकांवर प्रेम करून दुसऱ्यांच्या गरजेला साहाय्य करून ,धाउन जाऊन अशा आशीर्वादात जगलं पाहिजे . अलीकडे एकमेकांशी सुसंवाद संपल्याची खंत वाटते ,त्यामुळे स्वभावात तुटकता अलयाचे जाणवते , एकटेपणा आवडतो , त्यामुळे स्वार्थी दृष्टी बनते . हे पालकांनी सांभाळले पाहिजे . तुकाराम महाराज म्हणतात “मना करा रे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण” , मन मुळात प्रसन्न पाहिजे मग जग जिंकल्याचा अनंद मिळेल . उत्साह, सकारात्मक जगण्याची वृत्तीच आनंदि ठेवते . उपासना कशासाठी आहे, मनाच्या स्वास्थासाठी कोणतीही उपासना करा . मन स्थिर आणि आनंदी राहण्यासाठी या गोष्टी आहेत . जसे योग आणि ध्यानधारणा यासुद्धा आनंदी जीवनासाठी उत्तम आहेत . मुलांमध्ये या आवडी लहानपणापासूनच लावल्या पाहिजेत . वाचनाची आवड रुजवली पाहिजे . शिस्त , काटकसर , वेळेचे नियोजन या गुणांमुळे मुले नकिच यशस्वी होतील . मुलांकडून मिळणाऱ्या आनंदापेक्षा पालकांना आणि कशाचीच अपेक्षा नसते . आपली ऐपत असली तरी मुलांना मागितली वस्तू कि लगेच देऊ नये . त्यांना पैशाची , वस्तूची किंमत राहत नाही . अपण सारेच आपल्या मुलांवर प्रेम करत असतो . त्यांच्या सुखासाठी क्षण-क्षण वेचीत असतो . त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी आपला प्रत्येक आनंद सुख बलिदान करीत असतो . तेच आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी केलेले असते . याची जाणीव ठेऊन त्यांच्या आयुष्याच्या सायंकाळी त्यांना आपुलकी , प्रेम , सुरक्षा मिळणे हाच त्यांचा अधिकार असतो . तो देणे आपले कर्तव्य आहे . आजी आजोबांचे प्रेम त्यांना मिळावे हि धडपड प्रत्येक आई वडिलांनी केली पाहिजे . ते सुधा आपल्याच कुटुंबाचा एक भाग असतात. सोईच्या दृष्टीने ते वेगळे राहत असले तरी त्यांच्याशिवाय आपले कुटुंब अर्धावर आहे . अपुरे आहे . याची जाणीव हवी . आपल्या मुलांना वाढवताना त्यांच्या गरजा पूर्ण करण्याकडे जसे लक्ष देता तसेच आपल्या आई वडिलांच्या मानसिक गरजा भागविणे त्यांची देखभाल करणे त्यांना सुखी व आनंदी ठेवणे हे आपले कर्तव्य आहे .



नाती वडिलांकडील किंवा आईकडील असो . सारीच मैत्रीची असावीत जीवनासाठी ती गरजेची आहे . उत्तम व्यक्तिमत्व निर्मितीसाठी योग्य मानसिक विकासासाठी सख्,शांती,समाधानासाठी,सर्वांशी उत्तम संबंध असणे आवश्यक आहे . शेजारी-पाजारी तसेच इतर नातेवाईक सर्वांशी प्रेमाने असावे म्हणूनच अडूपण विसरून सर्वांशी स्नेहसंबंध मजबूत करायला हवे . मुलांना हे नात्याचे मोल समजून द्यायला हवे . आणि सकारात्मक दृष्टीकोन हाच सुखी जीवनाचा आहार आहे . भारतीय संस्कृती जगात श्रेष्ठ आहे. ती वाढविणे आणि तिची जोपासना करणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे



                                          सौ. रजनी विश्वास पाटणकर

                                               मो. ९८५०९११२९९

मोबाईल शिवाय तुमचं बाळ मोठं होऊ शकतं !! हो हे अगदीच शक्य आहे



काळ वेगाने बदलत आहे आणि ४०-४५ वर्षाच्या लोकांपेक्षा अधिक स्मार्ट पद्धतीने ३-४ वर्षांची मुले मोबाईल हाताळतांना दिसतात . त्याला प्ले स्टोअर मधून आवडीच्या गेमचं अँप पण डाउनलोड करता येतं असं पालक अभिमानाने सांगतात . तो पटापट इंग्लिश मधील ऱ्हाइम गातो अगदी कोकोमेलन किंवा चुचु टीव्ही च्या कॅची जिंगल टोंन सकट . छान छान चाललंय सगळं . बाबा टीसीएस आणि आई इन्फोसिस मध्ये . घरी आल्या आल्या आई स्वयंपाक घरात काम करतेय तिनेही कोपऱ्यात मोबाईल ठेवलाय मधुराने नवी रेसिपी टाकलीय आनंदाने बनवते आहे . मस्स्स्त झाली आहे अगदी!!! बाबा ऑफिस चं काम घरी घेऊन आलाय , आजी आजोबा मस्त सिरीयल बघताय माझ्या नवऱ्याची बायको . आणि या सगळ्या साम्राज्याचे एकुलते एक नवाब बाबांचा मोबाईल घेऊन युट्यूब लावून जमिनीवर ओणवे पडून अगदी गोजिरवाणा ससा दिसतोय हो.
सगळ्या घरात एक चित्रमय शांतता . आजच्या तंत्र युगातील घरोघरचे हे प्रातिनिधिक चित्र. सुखावह !!!
किराणा दुकानात जाण्याची गरज नाही , आम्ही ऑनलाईन मागवतो . खेळणी ऑनलाईन ,
पुस्तक किंडल वर वाचतो . अभ्यास युडेमी !! युट्युब !! बायजु !! ईडीएक्स !!!
आम्ही डेट सुद्ध टिंडर वर करतो अजून काय पाहिजे !!
नशीब पोटात लागलेली भूक , नैसर्गिक विधी आणि संभोग या गोष्टींना ऑनलाईन पर्याय नाहीत .
त्यात खातांना हातात मोबाईल , आणि कमोड वर बसून सुद्धा मोबाईल वर ऑनलाईन असणारी महाभाग आहेत , वर त्यांचं कॉम्प्लिमेंट आहे की शांततेत मोबाईल कमोडवर असलो की मगच बघता येतो .
आणि पॅराडॉक्स म्हणजे हा लेख वाचणारी ८५% जनता मोबाईल वर वाचत आहे .
गालातल्या गालात हसत आहे आणि फॉरवर्ड वर क्लिक करून आज मस्त लेख वाचायला मिळाला ,
तुम्ही पण वाचा म्हणून पुढच्या ग्रुपवर पाठवतील . मला तुमचे फॉरवर्ड नकोय . तुमची आणि माझी अंतर्मुखता हवीय .हे सगळं कुठं घेऊन जाणार आहे आपल्याला ? पर्यायाने आपल्या लेकरांना !!!
मोबाईल शिवाय जगता येतं , खरंच !! विश्वास ठेवा . मोबाईल शिवाय मुलांना शिकवता येतं ,
माझा यावर विश्वास आहे . तो ऐकतच नाही मोबाईल द्यावाच लागतो नाहीतर खूप रडतो , माझा विश्वास नाही . त्याला रडू द्या . त्यातही आनंद आहे . मुलाला शांत केल्यानंतर जे समाधान भेटतं तेवढं नक्कीच माझ्या फोटोला किती लोकांनी लाईक केलं हे बघण्यापेक्षा जास्त आहे .

काही जगमान्य उपाय सांगतो जे मी काही दिवसापूर्वी अंमलात आणले ज्यांनी मोबाईल पासून दूर जात येतं

१) मोबाईल मध्ये ठराविक तेवढेच अप्लिकेशन ठेवा . फोटो रिलेटेड सगळे उडवून लावा
२) सगळ्या सोशल मीडिया अँप्लिकेशन चे नोटिफिकेशन बंद करा .
३) गजराचं घड्याळ घ्या , मोबाईलच्या अलार्मची सवय मोडा . पंधरा हजारांचा मोबाईल काय अलार्म लावायला घेतलाय का ?
4) झोपतांना मोबाईल दूर ठेवा आणि उपडा करून ठेवा
5) मेसेजचे नोटिफिकेशन बंद करा आणि घरच्यांना महत्वाचं असेल तर कॉल करण्याची शिकवण द्या
6) स्क्रीन लॉक पॅटर्न काढून टाका आणि त्याजागी कमीत कमी ८ अंकांचा कोड टाका .
7) दिवसभरात ३ वेळा मेल चेक करा . तुम्ही महामहिम राष्ट्रपती नाही ज्यांना दिवसभरात ५०-६० मेल येतील
8) आठवड्यातून एक दिवस मोबाईल घरी विसरत चला
9) लहान मुल कुठल्या प्रकारचे व्हिडीओ बघतंय त्यानुसार घरात त्याला प्रत्यक्ष गोष्टी द्या

उदारणार्थ माझ्या मुलाला प्राणी आवडतात मी खोटे ५०-६० प्राणी एकाच वेळेस आणून दिले ,
त्याला मोबाईल दिला तरी घेत नाही अशी अवस्था आली , काही दिवसांनी आता परत मोबाईल मागायला लागला , त्याला जेंगा चा बॉक्स आणून दिला , कधी क्ले कधी स्लाईम त्याचा मोबाईल वरचा फोकस नेहमी हालता ठेवला . मुले मोबाईल मागणारच , त्याला पर्याय एकच , त्यापेक्षा जास्त आवडीचे त्यांना दिले की बरोबर गुंतून बसतात .

फक्त कटाक्षाने गेमिंग पासून दूर ठेवा . त्याला सध्या तरी पर्याय नाही


10 ) ३-४ वर्षांच्या मुलाला एक तासाहून अधिक स्क्रीन टाइम नसावा ,

म्हणजेच टीव्ही मोबाईल लॅपटॉप सगळं मिळून दिवसात १ तास पेक्षा जास्त नको




ता क : तुम्ही म्हणाल लहान मुलांना मोबाईल पासून दूर कसे ठेवू हे सांगा , आम्ही आमचं बघून घेऊ , तर ताई आणि दादा तुमचं पोर आणि पोरगी अगदी तुमच्यावर गेलंय हो , तुम्ही जसं वागता तसं कार्ट वागतंय तेव्हा तुम्ही सुधारला की पोरगं सुधारलं म्हणून समजा


प्रा. महेंद्र प्रभाकर शिंदे 
अध्यक्ष , 
iSEARCH - INDIA